भारताचे पंतप्रधान
भारत सरकारचे प्रमुख | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | सार्वजनिक कार्यालय, पंतप्रधान | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ | ||
स्थान | भारत | ||
कार्यक्षेत्र भाग | भारत | ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
भारतामधील राजकारण |
---|
भारताचे पंतप्रधान हे भारत देशामधील केंद्र सरकार चे प्रमुख व देशाच्या राष्ट्रपतीचे प्रमुख सल्लागार आहेत. पंतप्रधान, भारताच्या मंत्रीमंडळाचा व संसदेमधील बहुमत मिळालेल्या राजकीय पक्षाचा नेता आहे. भारत सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा तो प्रमुख आहे.
पंतप्रधान बनणाऱ्या व्यक्तीला संसदेच्या लोकसभा व राज्यसभा ह्या दोन भवनांपैकी एकाचा सदस्य असणे बंधनकारक आहे. विद्यमान राष्ट्रपतीने नियुक्ती केलेला भारताचा पंतप्रधान देशामधील सर्वात बलाढ्य नेता समजला जातो. सरकारची स्थापना, मंत्रीमंडळाची निर्मिती, मंत्र्यांना पदे नियुक्त करणे इत्यादी महत्त्वाचे अधिकार पंतप्रधानाला आहेत. पंतप्रधानाचा मृत्यू अथवा राजीनाम्यानंतर मंत्रीमंडळ बरखास्त केले जाते.
नरेंद्र मोदी हे भारताचे विद्यमान पंतप्रधान आहेत.
मूळ
[संपादन]भारताला १९४७ साली [ ब्रिटिश भारत ]ब्रिटिश राजवटीपासून भारताचा स्वातंत्र्यलढा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने युनायटेड किंग्डम ब्रिटनमधील संसदीय प्रजासत्ताक ह्या प्रकारच्या सरकारचे अंगीकरण केले. ह्यामध्ये राष्ट्रप्रमुखाला केवळ औपचारिक अधिकार असून बव्ह्ंशी महत्त्वाचे निर्णय पंतप्रधानाद्वारे घेतले जातात.
नियुक्ती
[संपादन]भारतामध्ये साधारणपणे दर पाच वर्षांनी लोकसभा निवडणुका घेतल्या जातात. ह्या निवडणुकांमध्ये लोकसभेमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला भारताचे विद्यमान राष्ट्रपती सरकार स्थापनेचे आमंत्रण देतात. ह्या राजकीय पक्षामधील प्रमुख नेत्याची पक्षातर्फे पंतप्रधान म्हणून निवड केली जाते. सरकार स्थापन केल्यानंतर ठराविक काळामध्ये त्याला बहुमत सिद्ध करणे बंधनकारक आहे. ह्यासाठी सरकार स्थापन करणारा पक्ष इतर पक्षांचा पाठिंबा घेऊ शकतो.
पात्रता
[संपादन]भारताच्या संविधानाच्या ७५ व्या व ८४व्या कलमांनुसार पंतप्रधान बनण्यासाठी खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.
- भारत देशाचे नागरिकत्व
- लोकसभा अथवा राज्यसभेचा खासदार. सरकार स्थापनेच्या वेळेला जर ही अट पूर्ण झाली नसेल तर त्या व्यक्तीला ६ महिन्यांच्या आत खासदार पद मिळवावे लागते.
- लोकसभेचा सदस्य असल्यास किमान वय २५ वर्षे व राज्यसभेचा सदस्य असल्यास किमान वय ३० वर्षे.
- केंद्रीय सरकार, राज्य सरकार इत्यादी सरकारी कार्यालयामध्ये फायदा असलेल्या पदावर नसणे.
शपथ
[संपादन]पंतप्रधानपद ग्रहण करण्यापूर्वी पंतप्रधानाला राष्ट्रपतीच्या उपस्थितीमध्ये खालील शपथा घ्याव्या लागतात: (इंग्लिश मजकूर)
पदाची शपथ:
I, <नाव>, do swear in the name of God/solemnly affirm that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, that I will faithfully and conscientiously discharge my duties as prime minister for the Union and that I will do right to all manner of people in accordance with the Constitution and the law, without fear or favour, affection or ill-will.
— भारताचे संविधान, तिसरी अनुसूची, भाग १
गुप्ततेची शपथ:
I, <नाव>, do swear in the name of God/solemnly affirm that I will not directly or indirectly communicate or reveal to any person or persons any matter which shall be brought under my consideration or shall become known to me as prime minister for the Union except as may be required for the due discharge of my duties as such Minister.
— भारताचे संविधान, तिसरी अनुसूची, भाग २
वेतन
[संपादन]पंतप्रधान व मंत्रीमंडळाचे वेतन संसदेद्वारे ठरवले जाते व त्यात वेळोवेळी बदल केले जातात. जुलै २०१२ मध्ये पंतप्रधानाचे मासिक वेतन ५०००० व भत्ते ह्यांची रक्कम एकूण १६०००० (१.६ लाख) इतकी आहे.
यादी
[संपादन]क्रम | चित्र | नाव (जन्म–मृत्यू); मतदारसंघ |
पदग्रहण | पद सोडले | कार्यकाळ | निवडणुक (लोक सभा) |
नियुक्ती | राजकीय पक्ष | संदर्भ |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | जवाहरलाल नेहरू (इ.स.१८८९–इ.स.१९६४) फूलपूरचे खासदार |
१५ ऑगस्ट १९४७ |
२७ मे १९६४ [†] |
१६ वर्षे, २८६ दिवस | – | लॉर्ड माउंटबॅटन | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | [१] | |
१९५२ (१) | राजेंद्र प्रसाद | ||||||||
१९५७ (२) | |||||||||
१९६२ (३) | |||||||||
– | गुलजारी लाल नंदा (१८९८-१९९८) साबरकांठाचे खासदार |
२७ मे १९६४ |
९ जून १९६४ |
१३ दिवस | – (३) | सर्वपल्ली राधाकृष्णन | [२] | ||
२ | लाल बहादूर शास्त्री (१९०४-६६) अलाबाबादचे खासदार |
९ जून १९६४ |
११ जानेवारी १९६६ [†] |
१ वर्ष, २१६ दिवस | – (३) | [३] | |||
– | गुलजारी लाल नंदा (१८९८-१९९८) साबरकांठाचे खासदार |
११ जानेवारी १९६६ |
२४ जानेवारी १९६६ |
१३ दिवस | – (३) | [२] | |||
3 | इंदिरा गांधी (१९१७-८४) रायबरेलीच्या खासदार |
२४ जानेवारी १९६६ |
२४ मार्च १९७७ |
११ वर्षे, ५९ दिवस | – (३री) | [४] | |||
१९६७ (४थी) | |||||||||
१९७१ (५वी) | व्ही.व्ही. गिरी | ||||||||
४ | मोरारजी देसाई (१८९६-१९९५) सुरतचे खासदार |
२४ मार्च १९७७ |
२८ जुलै १९७९ [RES] |
२ वर्षे, १२६ दिवस | १९७७ (६वी) | बी.डी. जत्ती | जनता पक्ष | [५] | |
५ | चौधरी चरण सिंह (१९०२-८७) बागपतचे खासदार |
२८ जुलै १९७९ |
१४ जानेवारी १९८० [RES] |
० वर्षे, १७० दिवस | – (६वी) | नीलम संजीव रेड्डी | जनता पार्टी (धर्मनिरपेक्ष) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबत |
[६] | |
(3) | इंदिरा गांधी (१९१७-८४) रायबरेलीच्या खासदार |
१४ जानेवारी १९८० [§] |
३१ ऑक्टोबर १९८४[†] |
४ वर्षे, २९१ दिवस | १९८० (७वी) | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) | [७] | ||
६ | राजीव गांधी (१९४४-९१) अमेठीचे खासदार |
३१ ऑक्टोबर १९८४ |
२ डिसेंबर १९८९ |
५ वर्षे, ३२ दिवस | – (७वी) | झैल सिंग | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | [८] | |
१९८४ (८वी) | |||||||||
७ | व्ही.पी. सिंग (१९३१-२००८) फतेहपूरचे खासदार |
२ डिसेंबर १९८९ |
१० नोव्हेंबर १९९० [NC] |
० वर्षे, ३४३ दिवस | १९८९ (नववी) | आर. वेंकटरमण | जनता दल (राष्ट्रीय आघाडी) |
[९] | |
८ | चंद्रशेखर (१९२७-२००७) बल्लियाचे खासदार |
१० नोव्हेंबर १९९० |
२१ जून १९९१ |
० वर्षे, २२३ दिवस | – (नववी) | समाजवादी जनता पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबत |
[१०] | ||
९ | पी.व्ही. नरसिंह राव (१९२१-२००४) नंद्यालचे खासदार |
२१ जून १९९१ |
१६ मे १९९६ |
४ वर्षे, ३३० दिवस | १९९१ (१०वी) | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | [११] | ||
१० | अटल बिहारी वाजपेयी (जन्म:१९२४-२०१८) लखनौचे खासदार |
१६ मे १९९६ |
१ जून १९९६[RES] |
१६ दिवस | १९९६ (११वी) | शंकर दयाळ शर्मा | भारतीय जनता पक्ष | [१२] | |
११ | एच.डी. देवेगौडा (जन्म १९३३) कर्नाटकचे खासदार (राज्यसभा) |
१ जून १९९६ |
२१ एप्रिल १९९७[RES] |
० वर्षे, ३२४ दिवस | – (११वी) | जनता दल (संयुक्त आधाडी) |
[१२] | ||
१२ | इंद्रकुमार गुजराल (१९१९-२०१२) बिहारचे खासदार (राज्यसभा) |
२१ एप्रिल १९९७ |
१९ मार्च १९९८ |
० वर्षे, ३३२ दिवस | – (११वी) | [१३] | |||
(10) | अटल बिहारी वाजपेयी ( १९२४-२०१८) लखनौचे खासदार |
१९ मार्च १९९८ [§] |
२२ मे २००४ |
६ वर्षे, ६४ दिवस | १९९८ (१२वी) | के.आर. नारायणन | भारतीय जनता पक्ष (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) |
[१४] | |
१९९९ (१३वी) | |||||||||
१३ | मनमोहन सिंग (जन्म १९३२) आसामचे खासदार (राज्यसभा) |
२२ मे २००४ |
२६ मे २०१४ |
१० वर्षे, ४ दिवस | २००४ (१४वी) | ए.पी.जे. अब्दुल कलाम | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (संयुक्त पुरोगामी आघाडी) |
[१५] | |
२००९ (१५वी) | प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी | ||||||||
१४ | नरेंद्र मोदी (जन्म १९५०) वाराणसीचे खासदार (लोकसभा) |
२६ मे २०१४ |
सद्य | १० वर्षे, १३२ दिवस | २०१४ (१६वी) | प्रणव मुखर्जी | भारतीय जनता पक्ष (संयुक्त पुरोगामी आघाडी) |
[१६] | |
२०१९ (१७वी) | रामनाथ कोविंद | ||||||||
२०२४ (१८वी) | द्रौपदी मुर्मू |
संदर्भयादी
[संपादन]- ^ "India Selects Nehru as Prime Minister". Los Angeles Times.[permanent dead link]
- ^ a b "Nanda". The Virgin Islands Daily News.
- ^ Thomas F. Brady. "Shastri Is Elected by Party As India's Prime Minister". न्यू यॉर्क टाइम्स.
- ^ "Mrs. Gandhi wins handily in Party vote". Milwaukee Journal.
- ^ "Desai, 81, Succeeds Mrs. Gandhi". Milwaukee Journal.
- ^ "Dour farm leader of 76 named as India's fifth PM". Montreal Gazette.
- ^ "Indira Gandhi claims victory". Anchorage Daily News.[मृत दुवा]
- ^ Sanjoy Hazarika. "Rajiv Gandhi Becomes Prime Minister Amid Thunderous Applause". Sarasota Herald-Tribune.
- ^ Barbara Crossette. "Indian Opposition Chooses a Premier". न्यू यॉर्क टाइम्स.
- ^ Sanjoy Hazarika. "Rival of Singh Becomes India Premier". न्यू यॉर्क टाइम्स.
- ^ Bernard Weinraub. "MAN IN THE News; Congress Party's Calculating Loyalist: Pamulaparti Venkata Narasimha Rao". न्यू यॉर्क टाइम्स.
- ^ a b John F. Burns. "Hindu Nationalist Cabinet Quits in India as Defeat Looms". न्यू यॉर्क टाइम्स.
- ^ John F. Burns. "New Indian Leader Pledges To Press Economic Changes". न्यू यॉर्क टाइम्स.
- ^ John F. Burns. "Man in the News: Atal Bihari Vajpayee; Sworn In as India's Leader, Ambiguity in His Wake". न्यू यॉर्क टाइम्स.
- ^ Amy Waldman. "India Swears In 13th Prime Minister and First Sikh in Job". न्यू यॉर्क टाइम्स.
- ^ BBC. "Narendra Modi sworn in as Indian prime minister". BBC.