Jump to content

मराठा घराणी व राज्ये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादी या पानावरून पुनर्निर्देशित)

मराठा सरदार घराणी व राज्ये, १७ ते १८वे शतकात मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी व संरक्षणासाठी ज्या मराठा सरदार घराण्यांनी योगदान दिले, त्या राजघराण्यांची ही यादी आहे. मराठा ही महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि शेजारील राज्यांतील क्षत्रिय वंश आहे. मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, कदंब, यादव, होयसाळ अशा भारतातील प्राचीन क्षत्रिय घराणे महाराष्ट्रातून उत्तरेत गेले आहेत

ठळक मराठा राजघराणी

[संपादन]

भोसले घराणे

[संपादन]
  • भोसले घराणे हे घराणे मराठा साम्राज्यातील मुख्य व महत्त्वाचे घराणे मानले जाते. शिवाजी महाराज हे याच घराण्यातील होते. या घराण्याचा मराठा साम्राज्याच्या स्थापनेपासून ते विस्तारापर्यंत मोलाचा वाटा आहे. या घराण्याच्या महाराष्ट्रात अनेक शाखा आहेत त्यापैकी कोल्हापूरकर भोसले, सातारकर भोसले, नागपूरकर भोसले, अक्कलकोटकर भोसले, तंजावरकर भोसले या प्रमुख शाखा.

घोरपडे घराणे

[संपादन]
  • घोरपडे घराणे हे घराणे भोसले घराण्याची थोरली शाखा असून भोसल्यांचे भाऊबंद आहेत. बहमनी काळात घोरपडीच्या मदतीने कोकणातील किल्ला जिंकल्याने घोरपडे हे आडनाव प्राप्त झाले. हे घराणे आदिलशाहीत प्रमुख सरदारांपैकी एक होते. या घराण्यातील बाजी घोरपडे याने शहाजी राजांशी दगाफटका केल्याने, याला शिवरायांनी ठार मारले. मराठा साम्राज्याचे सेनापती संताजी घोरपडे हे याच घराण्यातील होते. या घराण्याला ममलकतमदार, हिंदुरावअमिर-उल-उमराव हे किताब होते. या घराण्याच्या महाराष्ट्रात अनेक शाखा आहेत त्यापैकी कापशीकर घोरपडे, मुधोळकर घोरपडे, सेंदूरकर घोरपडे, दत्तवाडचे घोरपडे आणि गजेन्द्रगडकर घोरपडे या प्रमुख शाखा.

मोहिते घराणे

[संपादन]
  • (तळबीडकर) मोहिते घराणे हे घराणे शिवकाळात स्वराज्यात सामील झाले. सेनापती हंबीरराव मोहिते व शिवरायांच्या पत्नी सोयराबाई ह्या याच घराण्यातील. या घराण्याला हंबीरराव हा किताब शिवरायांनी दिला. या‌ घराण्याच्या अनेक शाखा महाराष्ट्रात आहेत, त्यापैकी तळबीड ही मुख्य मानली जाते.

कदमबांडे घराणे

[संपादन]
  • कदमबांडे घराणे हे एक मराठा घराणे आहे. १८व्या शतकाच्या सुरुवातीला गुजरात व खानदेश प्रांतात मराठा साम्राज्याच्या विस्तारात या घराण्याचा मोलाचा वाटा आहे.

शिंदे घराणे

[संपादन]

शिंदे घराणे अथवा सिंधीया हे मध्य भारतातील ग्वाल्हेर येथील राज्यकर्ते होत. राज्यकर्ते होण्याअगोदर मराठा साम्राज्याचे मुख्य सरदार घराणे होते. मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये यांनी मोठी कामगीरी बजावली होती. शिन्दे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील नीरा नदीच्या काठावरील कण्हेरखेड़ या गावचे पाटील होते. राणोजी शिन्दे हा मूळ कर्ता होता. या शिन्दे घराण्याचे कुलदैवत म्हणजे कोल्हापूर मधील श्री महालक्ष्मी अंक वाडी रत्‍नागिरीचा दक्खनचा राजा श्री जोतिबा.या जोतिबाच्या चैत्र यात्रेमध्ये शिन्दे सरकार यांच्या शासनकाठीला पहिल्या मानाच्या अठरा शासनकाठ्या मध्ये नऊ क्रमांकचा मान आहे.सध्या शिन्दे ग्वाल्हेर याठिकाणी स्थायिक असल्यामुळे त्याची ही मानाची शासनकाठी त्यांच्या वतीने चालवण्याचा मान सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील करंजवडे गावाच्या ग्रामस्थांना शिन्देंनी फार पूर्वीपासून दिला आहे.तशी नोन्द सुद्धा सिन्धिया देवस्थान ट्रस्ट यांच्याकडे आहे.

शिंदे घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्ती

तनपुरे - देसाई (देशमुख) घराणे

[संपादन]
  • तनपुरे - देसाई (देशमुख) घराणे हे घराणे प्रतिष्ठित मराठा घराणे असून या घराण्याचा देवगिरीच्या सेउना यादव राजघराण्याशी संबंध आहे.
  • वरकटणे, तालुका करमाळा हे तनपुरे - देसाई (देशमुख) सरदारांचे वतन होते. येथे त्यांची सुमारे ३६ एकरात पसरलेली गढी आहे. सध्या तिची पडझड झालेली आहे. आसपासच्या गावांचा महसूल व कारभार येथून चालवला जात असे.
  • घराण्याचे मूळ गाव परांडा तालुक्यातील खानापूर होते, येथूनच त्यांचा महाराष्ट्रात विस्तार झाला. या घराण्याच्या अनेक शाखा महाराष्ट्रात आहेत, त्यापैकी वरकटणे ही मुख्य शाखा आहे. एक शाखा सोलापूर, दुसरी शाखा खानापूरमध्ये आहे.
  • तनपुरे - देसाई (देशमुख) हे पंचकुळी मराठा घराणे असून मूळ मराठ्यांच्या प्राचीन ९६ कुळांमधील एक प्रतिष्ठित असे घराणे आहे.

धनुरकर घराणे

[संपादन]

धनुरकर शिंदे घराणे हे महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यातील, एक मध्यकालीय धनुर गावाची क्षत्रिय कुटुंबची शाखा आहे.

धनुरकर शिंदे हे ताप्तीय-मराठा घराणे खान्देशात "खान्देश" (कान्हदेश) राजकारणत वतनदार होते. नन्तर मराठा हिंदवी साम्राज्यात छत्रपती शाहू महाराजंचे पेशवा बालाजी भट्ट च्यासोबत सैन्यात धनुर्धरांची विशेष तुकडीचे सरदार होते व त्या काळात धनुर, अक्रानी, ताप्ती क्षेत्राचि वतनदारी, परगणाचि देशमुखी, गावांची पाटीलकी केली व रावसाहेब, सरकार हे पदवी मिळाली. त्यात गावांचे नाव धनुर, कापडणे, उमरखेड, शीरूड, जोवखेड़ा, बोरकुंड, डोंगरगाव, म्सहावद, मड़काणी, तोरणमाळ, फत्तेपुर, धडगाव, भोंगरा, डोंडवाडा, मोरतलाई, अमळनेर, धरणगांव, रावेर, अशीरगढ़, नेपागाव, बैतूल, मुलताई आदि आहेत. शिंदे-सरकार, शिंदे-देशमुख, शिंदे-पाटील हे आडनाव व ताप्तीय-मराठा हे समाज लिहून या शिंदेवंश चे १२०० घराणे खान्देशात (ताप्तीक्षेत्र) व १५०० घराणे दख्खनात राहत आहेत.

धारचे पवार घराणे

[संपादन]
  • धारचे पवार घराणे मूळचे सुपे येथील शिवपूर्व काळातील हे मराठा घराणे स्वराज्यात व मराठा साम्राज्य मध्ये उदयाला आले.प्राचीन सूर्यवंशी परमार राजघराण्यातील पूर्वज महान चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य परमार,चक्रवर्ती सम्राट शालिवाहन परमार, राजा भोज, राजा जगदेवराव परमार, भवानी राजे,राजे साबुसिंह उर्फ सरदार साबाजी पवार, कृष्णाजी राजे, काळोजी राजे, केरोजी राजे, बाबाजी राजे, संभाजी राजे,उदाजीराजे पवार, मानाजी राजे पवार यांनी स्वराज्यात मोलाची कामगिरी बजावली,मराठा साम्राज्यात सेनापती, सेना प्रमुख, सरदार, जहागीरदार, देशमुखी, सरपाटील, मुलकी पाटीलकी, गांव पाटिलकी असलेले 96 कुळी मराठा घराणे पवार हे शिवपूर्व कालीन प्रसिद्ध आणि पराक्रमी घराणे आहे.१८व्या शतकात माळवा प्रांतात मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यास या घराण्याचा मोलाचा वाटा आहे.धारचे संस्थानिक यशवंतरावराजे यांचा राज्याभिषेक झाला होता.या घराण्याला राजे विश्वासरावसेनाबारासहस्री हे किताब होते. या घराण्याच्या महाराष्ट्रात अनेक शाखा आहेत त्यापैकी सुपेकर पवार, वाघोलीकर पवार,मलठण कर,विदर्भातील खेडकर पवार,धारचे पवार आणि देवासचे पवार,नगरदेवळेकर पवार, प्रमुख शाखा.तसेच इतर प्रमुख शाखा वाल्हे, सुपे, चिंचणी, येळपाने, पिंपळगांवकर पवार,जळगाव चाळीसगाव, नाशिक, कोकण, सातारा, अशा अनेक जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या बाहेर ही अनेक शाखा आहेत.सध्या धार आणि देवास मध्यप्रदेश, सुपे जि. नगर, नगरदेवळे जि. जळगाव येथे राजवाडा आणि राजगादी आहे.

थोरात घराणे

[संपादन]
  • थोरात घराणे हे शिवकाळातील मराठा घराणे पेशवाईत उदयाला आले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर चाललेल्या मुघल-मराठा संघर्षात या घराण्याने विलक्षण पराक्रम गाजवला. या घराण्याला दिनकरराव, अमिरुलउमरावजंगबहादर हे किताब होते. १८व्या शतकाच्या सुरुवातीला गुजरात, खानदेश व बागलाण प्रांतात मराठा साम्राज्याच्या विस्तारात या घराण्याचा मोलाचा वाटा आहे. या घराण्याला सूरत, संगमनेर, जुन्नर, , कडेवलीत, पुणे आणि विजापूर या प्रांतात सरंजाम होता. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत या घराण्यातील अनेक पुरुष कामी आले. या घराण्याच्या महाराष्ट्रात अनेक शाखा आहेत त्यापैकी विरगावकर थोरात, खुट्बावकर , कौठा- अनगरेकर, वाळकीकर थोरात, पिंपळगावकर थोरात, वाळवेकर थोरात, पारनेरकर थोरात, नेवासकर थोरात आणि भूमचे थोरात या प्रमुख शाखा आहे.

जगदाळे घराणे

[संपादन]
  • जगदाळे हे घराणे मूळचे मसूर परगण्यातील पिढीजात वतनदार होते. हे घराणे पवार घराण्याची एक शाखा आहे. शिवकाळात हे घराणे आदिलशाहीच्या सेवेत होते. अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी या घराण्यातील महादजी जगदाळे हा अफजल खानाला येऊन मिळाला होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या लढाईत हा ठार झाला, पुढे शाहू राजांच्या काळात हे घराणे मराठा साम्राज्यात सामील झाले.

ढमढेरे घराणे

[संपादन]
  • ढमढेरे हे मराठा साम्राज्यातील प्रसिद्ध घराणे आहे. तळेगाव ढमढेरे हे या घराण्याचे मूळ ठिकाण आहे. छत्रपती संभाजी महाराज ते पेशवाई कालखंडापर्यंत या घराण्याने उत्तम कामगिरी बजावली आहे. ढमढेरे हे पेशव्यांच्या हुजुरात सैन्यातील प्रमुख सरदारांपैकी एक होते.

कदम घराणे

[संपादन]
  • देवळालीकर कदम देवळाली प्रवरा येथील कदम हे बँकापूरच्या कदंबांचे वंशज. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस राजगड किल्याचे तट-सरनौबत होते. राजाराम छत्रपतींच्या जिंजीच्या प्रवासातही बाजी कदम आणि खंडोजी कदम देवळालीकर हे बरोबर होते.

रणनवरे/रणवरे घराणे

[संपादन]
  • रणनवरे/रणवरे घराणे

रणनवरे/रणवरे हे शिवपूर्वकालीन प्रतिष्ठित मराठा घराणे आहे, जिंती तालुका फलटण हे रणनवरे सरदारांचे मूळ गाव रणनवरे घराण्याचा येथूनच महाराष्ट्रात विस्तार झाला. रणामध्ये लढण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या बदामीकर साळुंखे चालुक्यांची ही मुधोळ येथील शाखा आहे. सरदार मलोजी रणनवरे हे शहाजी राजे भोसले यांचे सहकारी होते. त्यांनी शहाजी राजे यांच्या सनदा विजापूरवरून जाऊन आणल्या.शहाजी महाराजांनी त्यांना हुक्केरी रायबाग परगण्याचे कारभारी म्हणून नेमले होते.

तंजावर येथील प्रसिद्ध शिलालेखातील शहाजी राजांना मदत करणाऱ्या ९६ कुळांच्या यादीत या घराण्याचे नाव आहे. बाजी रणनवरे हे शिवरायांच्या शिलेदारांचे सरदार होते. जिंतीकर रणनवरे सरदारांनी स्वराज्याची पहिल्या बेलसरच्या लढाईत शिवरायांचा तोफखाना सांभाळला होता.शिवरायांच्या तोफखान्याचे पाहिजे प्रमुख हा मान रणनवरे सरदारांना जातो. वर्धनगड आणि पांडवगडाचे किल्लेदार हे रणनवरे सरदार होते. महाराष्ट्रात रणनवरे/रणवरे परिवाराच्या शाखा असलेली गावे... पुणे जिल्हा:निमसाखर, मळद (दौंड),राख, सणसर, रणनवरेवाडी, हिंजवडी. मांडकी, निंभोरे, जिंती (सातारा), जवळगाव (अंबाजोगाई),शिंदेवाडी, बोथे, लोणी (सातारा), सिंदुरजन, कडगाव (कोल्हापुर), काटी (विदर्भ), सेलू (वर्धा), पाणीपत (हरियाणा), बदामी (कर्नाटक).

महाडीक घराणे

[संपादन]

महाडीक - तारळे(सातारा जिल्हा), निनाम(सातारा). नागपूर, कोल्हापूर (महाराष्ट्र) कोकण, महाड, नेवरी,येलूर,ग्वाल्हेर, तंजावर, कर्नाटक.

माने घराणे

[संपादन]

माने - राष्ट्रकुट वंशज [[ कुळ: सोमवंशी, देवक: गरुड पक्षी, गरुडाचे पंख. रहिमतपूर माने ,आणि म्हसवड राजेमाने सातारा जिल्हा, माने-पाटील विसापूर,मणेराजुरी(जमदाडे) ,सावर्डे तासगाव सांगली, महाराष्ट्र , वेळापूर् माने-देशमुख , कारेपूर, ता-लातूर, माने-भिमबहादुर कसबा सांगाव, मांगूर, चरेगाव, उदगाव. माने(भुजबळराव)आंबव,व भुजबळराव,घाटीवळे, माने, कुरचुम,सर्व गावे ता.संगमेश्वर (रत्‍नागिरी जिल्हा), सरकार-रुकडी, भादोले, भेंडवडे. यवतमाळ आणि नागपूर येथील माने. ठोमासे गाव चे माने पाटील. माने सरकार (पतंगराव) गाव- खानापूर , जि-सांगली . माने-खुबी, ता कराड,.माने गाव- इस्लामपूर, ता. वाळवा, जि-सांगली

घाटगे/घाडगे घराणे

[संपादन]

(वंश: सूर्यवंश गोत्र:कश्यप देवकः-सूर्यफुल)[कलचुरी - काळमुख सूर्यवंशी उर्फ घाटगे वंश], पाचेगाव,राजापूर, डिस्कळ(दिसकळ),मलवडी, निमसोड ता.खटाव, रायगाव, कोळ, कुकुडवाड (कराड भाग), खटाव मान काही भागात केंजळगड (सातारा जिल्हा), कुमठे,बोरगांव(बहे)(जिल्हा सागली) कागल (कोल्हापूर जिल्हा) बारामती (पुणे जिल्हा) (महाराष्ट्र, कर्नाटक).

मोरे घराणे

[संपादन]
  • मोरे - सुर्यवंश, लक्षमणपुत्र चंद्रकेतूचे वंशज, (मौर्यखंड), चंद्रगुप्त मौर्याचे कोकणात स्थलांतरित झालेले वंशज. सुरुवातीस छत्रपती शिवरायांना स्वराज्यासाठी विरोध आणि नंतर यांच्याच वंशजानी हिंदवी स्वराज्याकरिता तसेच पानिपतात स्वतःच रक्त सांडवल. जावळी, रायगड किल्ल्याचा परिसर, खटाव (सातारा जिल्हा) या गावाजवळचा वर्धनगड (महाराष्ट्र).

मोहिते घराणे

[संपादन]

मानकर घराणे

[संपादन]
  • मानकर/माणकर : सरदार खंडोजी दादजी माणकर (छत्रपती शाहू पर्व : यांचे सरदार घराणे व सरखेल तुळाजी कान्होजी आंग्रे यांचे सासरे).

"रायगड जिल्हा": माणकर वाडा-खरवली, ता.माणगांव (इनामदार) "पुणे जिल्हा": सांगरुण-कातवडी, ता.हवेली. (सरपाटील मोसे खोरे) मौजे पारगाव तर्फे खेड (पाटील) ता. आंबेगाव, मानकरवाडी-मुळशी, मावळ, भोर, जुन्नर, इंदापूर या तालुक्यात आणि रायगड, रत्‍नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यात तसेच विदर्भातही वस्तीची गावे आहेत. (इतिहास संशोधन-श्री.गणेश संभाजी मानकर, पुणे दि.०९.०९.२०२३)

मारणे घराणे

[संपादन]

शिर्के घराणे

[संपादन]
  • शिर्के - कोकण, श्रीरंगपूर (महाराष्ट्र). बल्लाळ होयसळ यादव यांचे वंशज

शिवले घराणे

[संपादन]
  • शिवले - हे प्रतिष्ठित मराठा घराणे आहे, "देवक वडाचे, वढू बुद्रुक तुळापूर, म ुंगे, किवळे, शिवली - भड वली व रेडग/ महाराष्ट्र. शिवले देशमुख, शिवले पाटील, शिवले चौगुले, शिवले (शिवळे ) -इनामदार ई. पदावर काम केलेले आहे. महत्त्वाचे कार्य म्हणजे छत्रपती संभाजी महाराज याचे अंतिम क्रिया याच घराण्यातील वीर पुरुषांनी केली. संभाजी महाराजांची समाधी स्थळ वढू बुद्रुक गावी आहे.

सावंत घराणे

[संपादन]
  • सावंत - सावंतवाडी, (कोकण विभाग महाराष्ट्र आणि गोवा राज्य)

गायकवाड घराणे

[संपादन]
  • गायकवाड हे सूर्यवंशी क्षत्रिय मराठा घराणे आहे. घाटगे यांच्या प्रमाणेच मंगळवेढ्याच्या सूर्यवंशी कलचुरी/काळमुख घराण्याची एक शाखा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते मराठा साम्राज्याच्या अंतापर्यंत या घराण्याने महत्त्वाची कामगिरी बजावली. क्षत्रियांच्या अनेक धर्मांपैकी एक असलेला धर्म म्हणजे गाईचे रक्षण करणे, गाईला कवाड दिले म्हणून गायकवाड असे या घराण्याचे नाव पडले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सकवारबाई यांचे माहेर गायकवाड घराणे होते. पुणे भागातील गायकवाड घराण्याने गुजरातवर स्वारी करून गुजरातमध्ये बडोदा संस्थानची स्थापना केली. सुर्वे, थोरात, काकडे, हांडे, शितोळे, खंडागळे, राऊत, सूर्यवंशी, दिनकरराव ही सर्व मराठा घराणी या गायकवाड कुळातूनच उत्पन्न झालेली आहेत. या सर्व घराण्यांचे देवक सूर्यफूल आहे.

शेलार घराणे

[संपादन]
  • शेलार/ शिलाहार अपरांत- यांचे कोल्हापूर व कोकण (महाराष्ट्र).

जगताप घराणे

[संपादन]

जगताप - गुट्टीच्या सूर्यवंशी जगताप चोळ राजांचे वंशज. हे जगताप चोळ देवगिरीच्या यादवांचे मंडलिक होत.

राजगादी : गुट्टी, आंध्रप्रदेश

निशाण :  ध्वज स्तंभावर ऐरावत

हरजीराजे जगताप हे जगताप कुळातील मुळेपुरुष आहेत.

सरदार गोदाजीराजे जगताप हे  त्यांच्या शौर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे जवळचे बालपणीचे मित्र होते. शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या पहिल्या किल्ल्यासाठी त्यांनी तोरणा किल्ल्यावरील हल्ल्यात भाग घेतला होता.

सरदार खंडोजी जगताप व सरदार कृष्णाजी जगताप:पणदरे गावातील शिवाजी महारांजांच्या सैन्याखालील मराठा सरदार .

जाधव घराणे

[संपादन]
  • हिंदुस्थान च्या इतिहासातील मातब्बर शुर घराणे म्हणजे जाधव घराणे ,या घराण्यांचा वंश मुळत: यदुकुळ भगवान श्री कृष्णाच्या कुळाशी आणि रजपुत शाखा जाडोन कुळाशी आहे.
  • वंश- चंद्रवंश,कुळ-यदुकुळ, देवक- पानकणीस, गोत्र -अत्री, कुळदेवी जोगेश्वरी,श्री तुळजाभवानी पश्चिम महाराष्ट्रातील काही घराण्यांचे कुलदैवत श्री जोतिर्लिंग वाडी रत्‍नागिरी जि.कोल्हापुर,आणि , काही घराण्यांचे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील जळव येथील श्री जोतिर्लिंग आहे
  • हिंदवी स्वराज्याच्या महान संकल्पनेचा जन्म जिच्या उदरातुन झाला त्या स्वराज्य जननी राजमाता माॅसाहेब जिजाऊ यांचे वडील ,राजे लखुजीराव जाधव राव यांच्या घराण्याच्या अनेक शाखा महाराष्ट्रात आहेत. या घराण्याला राव हा किताब आहे. राजे जाधवराव, जाधवराव इनामदार, सरदार जाधव, जाधव-पाटील, अशी अनेक हिंदवी स्वराज्यातील मातब्बर सरदार घराणी तथा सरंजामदार घराणी महाराष्ट्रात आहेत. शंभुसिंह जाधवराव,सरसेनापती धनाजीराव जाधवराव,चंद्रसेन जाधव असे अनेक वीर योद्धे या कुळात जन्माला आहे, पैकी,
  • सिंदखेडराजा चे राजे जाधवराव, सासवड चे जाधवराव,भुईंज चे जाधवराव,मालेगांव ,निनाम, बहे, परींचे,साताऱ्याच्या उत्तरेस असलेले लिंब गोवे गांव चे सरदार जाधव, कोरेगांव तालुक्यातील जळगांव चे सरदार जाधव-इनामदार, उंब्रज चे सरदार जाधव इनामदार ,आर्वी चे सरदार जाधव-पाटील इनामदार. वडोली चे सरदार जाधव, पाटण तालुक्यातील काही गावे,कुंभार्ली,कराड गोळेश्वर चे जाधव, सातारा सांगली कोल्हापुर इत्यादी अनेक गावांमध्ये मातब्बर आणि मानकरी सरदार घराणी या शाखेशी जोडली आहेत
  • जाधव म्हणजेच देवगिरीचे यादव. या कुळातील अजून काही आडनावाचे ही पुणे जिल्ह्यातील बारा मावळातील मरळ, घारे, कडू, निगडे ही आहेत.

थोरात घराणे

[संपादन]
  • थोरात - देवक सुर्यफूल, सूर्यवंशी, गोत्र वशिष्ठ, कोल्हापूर, सांगली, सातारा, अकोले, सिन्नर, पारनेर, वाळकी, वीरगाव, पिंपळगाव, खुटबाव, वाळवणे, अष्टा, भूम, ओंड, कार्वे, बहे, वाळवे, येळवी,‌‌ थोरातवाडी कौठा , अनगरें ता श्रीगोंदा. छत्रपती शिवाजी महाराजांपासून पेशवेकाळापर्यंतचे सरदार घराणे.

तौर घराणे

[संपादन]
  • राजेतौर कुंतलवंशीय पांडवातील अर्जुनाचे व दिल्लीपती आणि ग्वाल्हेरचा तोमर, तंवर यांचे वंशज आणि साडेबावीस गावे गोदावरी नदीच्याकाठी जहागिरदार. जिल्हा जालना आणि बीड यांच्या सीमेवर आणि कोल्हापूर
येथे भोज राजाची राजधानी कसबा बीड येथील पाटीलकी आणि सावकार.

घोरपडे घराणे

[संपादन]

संताजी घोरपडे हे घराण्यातील प्रभावशाली विरपुरुष.

देवाक पाच पालवी,कुळ दैवत पाली चा खंडोबा

गावे -भाडळे,जांब ,चिचंणी,डिस्कळ कआंबळएश्वर,एकाब,शिरढोण नांदगाव, तासगांव

घार्गे घराणे

[संपादन]
  • घर्गे-देसाई:- शिरोळ आणि निमसोड महाभारतातील यशोवर्धन राजाचे वंशज

काळे-देशमुख घराणे

[संपादन]

- राशीन, ता.कर्जत, जि.नगर २)घोडेगाव, ता.आबेगाव,जि.पुणे

- कुवर बहाद्दूर-देशमुख(काळे), सिन्नर, जि.नाशिक

शिळीमकर घराणे

[संपादन]
  • शिळीमकर-देशमुख: (मूळचे शिंदे) सरदार घराणे

मावळ (भोर - राजगड परिसर)

शिरोळे घराणे

[संपादन]
  • इनामदार शिरोळे पाटील घराणे - शिवाजीनगर (भांबुर्डे) पुणे शहर, पावनखिंड च्या युद्धात वीरगती झालेले शिलेदार राणोजी शिरोळे व पानिपत वीर शेखोजी शिरोळे पाटील.

शिरोळे हे पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख घराणं आहे. या घराण्याचे आडनाव मूळचे शिरवले होते. शिरवळे बुरुज हे रोहिडा किल्ल्याच्या सात बुरुजांपैकी एक आहे, त्यामुळे या कुटुंबाचे आडनाव शिरवळे या बुरुजावरून आले आहे. या कुटुंबाचा इतिहास मराठा साम्राज्यासाठी शौर्य आणि सेवेने चिन्हांकित आहे

पावनखिंड येथे झालेल्या युद्धात बांदल सेनेत शिरोळे सरदार देखील होते त्या युद्धात वीरगती झालेले शिरोळे सरदार यांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुण्यातील भांबुर्डे आजचे छत्रपती शिवाजी नगर येथील काही जमीन इनाम म्हणून दिली

पुढे देखील शिरोळे सरदार हे स्वराज्याच्या सेवेत होते

पानिपत च्या तिसरा युद्धात शिरोळे घराण्यातील 7 कर्तबगार व्यक्ती यांना वीरगती झाल्यामुळे पेशव्यांनी त्यांना पिंपळे गुरव येथील जमीन इनाम म्हणून दिली

शिरोळे कुटुंबाचा धर्म आणि जात -- हिंदू, क्षत्रिय ९६ कुळी मराठा, कुलदेव - जेजुरीचा खंडोबा, कुल देवी - तुळजापूरची तुळजाभवानी, गोत्र - शांडिल्य, देवक - सूर्यफुल (सूर्यफुल). येकोजी - १ शिरोळे (शिरवले) हे या घराण्याचे मूल पुरुष.

शिरोळे वंशवृक्ष - येकोजी - (मुल पुरुष) -- शेखोजी -- राणोजी (पावनखिंडीच्या लढाईत लढले) -- रत्नोजी -- येकोजी - २ आणि मोराजी, येकोजीला तीन मुलगे होते -- जेसोजी, जोगोजी, गिरजोजी आणि मोराजीला पाच पुत्र - सुलतानजी, राणोजी, शेखोजी, आनंदराव, गोविंदराव.

शिरोळे कुटुंबातील ओळखीच्या व्यक्ती आहेत -- डीआयजी अधिकारी कै. दिनकरराव आबुराव शिरोळे, महापौर व आमदार कै. भाऊसाहेब लक्ष्मणराव शिरोळे, आमदार कै. मालतीबाई माधवराव शिरोळे, माजी महापौर श्री. बाळासाहेब लक्ष्मणराव शिरोळे, आर्मी मेजर कै. कृष्णराव माधवराव शिरोळे, फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य कै. बाबुराव गणपतराव शिरोळे, आयआरएस अधिकारी कै. माधवराव कृष्णराव शिरोळे, डॉक्टर कै. धैर्यशील बाबुराव शिरोळे, डॉक्टर कै. धैर्यशील बाबुराव शिरोळे, अधिकारी डॉ. डॉक्टर श्री. श्रीरंग धैर्यशील शिरोळे, माजी खासदार श्री. अनिल गुलाबराव शिरोळे, मारोतीराव लक्ष्मणराव शिरोळे, माजी नगरसेवक श्री. श्रीकांत भाऊसाहेब शिरोळे, आमदार श्री. सिद्धार्थ अनिल शिरोळे, राजकीय नेते श्री. रणजित श्रीकांत शिरोळे, इ.

गोळे घराणे

[संपादन]
  • गोळे घराणे, भुजजी गोळे,धाकलोजी गोळे, रुद्रजी गोळे १५३ गावात सरनौबत गोळे

दाभाडे घराणे

[संपादन]

बजाजी दाभाडे पाटील (तळेगाव दाभाडे) यांना दोन मुले होती. १ले येसाजीराव व दुसरे सोमाजीराव होय.

  • सोमाजी बिन बजाजी दाभाडे च-होली गावच्या वतनावर आले.

च-होली सरदार दाभाडे घराण्यातील सोमाजीराव दाभाडे हे मूळ पुरुष होय. सोमाजी दाभाडे यांना २ मुले होती. थोरले कृष्णाजी व धाकटे बाबुराव होय. कृष्णाजी दाभाडे यांचा अनेक ऐतिहासिक पत्रांमध्ये उल्लेख आढळतो.

छत्रपती शाहू महाराज शाहू महाराज १६९० पासून महाराणी येसुबाईसाहैब यांचे सोबत औरंगजेबच्या कैदेत होते. औरंगजेबच्या शेवटच्या काळात शाहू राजांना सोडवण्यासाठी ज्या मराठा सरदारांनी प्रयत्नांची शिकस्त केली, त्यामध्ये सरदार कृष्णाजी दाभाडे चऱ्होलीकर ही होते. छत्रपती शाहू महाराज यांनी सुटकेनंतर दाभाडे घरण्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. स्व पराक्रमाचा जोरावर त्यांनी त्या सार्थ केल्या. शाहू महाराजांनी खंडेराव दाभाडे यांना सेनापतीपदी नियुक्त केले तर, कृष्णाजी दाभाडे यांना सुभेदार व सेनाबारासहश्री म्हणून नेमले. महाराणी येसूबाई यांची दिल्लीहून सुटका करण्यासाठी गेलेल्या मराठा सैन्यात कृष्णाजी दाभाडे हे सुभेलष्कर म्हणून सामील होते. सातारा व कोल्हापूर छत्रपतींमधील वारणेच्या तहात ते उपस्थित होते.

गुजरात, खान्देश, मिरज, बारामती, कोकण, दिल्लीमधील लढ्यात त्यांचा सहभाग होता. त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन शाहू छत्रपतीकडून त्यांना अनेक गावची वतनदारी मिळाले होती. त्यांना १२ गावांची जहागिरी होती, त्यापैकी चऱ्होली हे प्रमुख वतनाचे गाव आहे.

इ स 1725 मध्ये चऱ्होली येथील डोंगरावर वाघेश्वर महादेवाचे मंदिर सुभेदार कृष्णाजी दाभाडे यांनी बांधले.

श्रीमंत सुभेदार श्री कृष्णाजी दाभाडे यांचा कार्याचा सन्मान म्हणून चऱ्होली ग्रामस्थच्या वतीने व श्री सागर दाभाडे आणि दाभाडे घराणे यांच्या विशेष प्रयत्नांमधून चऱ्होली येथील प्रमुख चौकाला "श्रीमंत सुभेदार कृष्णाजी दाभाडे" चौक असे नामकरण पूर्वी करण्यात आले होते. शिवाय मरकड रोडला इंद्रायणी नदीवर असणाऱ्या पुलाला "श्रीमंत सरसेनापती खंडेराव दाभाडे सरकार"पूल असे नामकरण करण्यात आले.

मराठा राज्ये

[संपादन]

ब्रिटिशांच्या भारतातील आगमनापूर्वी भारताच्या दक्षिण भागात मराठ्यांचे राज्य होते. त्यामुळे जेव्हा देशावर ब्रिटिश सत्ता आली तेव्हा भारताच्या मोठ्या भूभागावर अनेक मराठी राजांची राज्ये व मराठी सरदारांची संस्थाने होती.

मराठी साम्राज्यातील प्रमुख प्रांत/राज्य, प्रदेश:

रायगडचा किल्ला. ही मराठा साम्राज्याची सतराव्या शतकापर्यंत राजधानी होती तिचे अवशेष.