पाटील
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
पाटील (जमीनदार किंवा ग्राम प्रमुख ) ही राजकीय पदवी आहे जी महाराष्ट्र क्षत्रिय त्यांचे आडनाव म्हणून ठेवतात. पाटील म्हणजे 'पट्टराजा' म्हणजे एक व्यक्ती किंवा कुटुंब मोठ्या क्षेत्रावर राज करते. १५०० च्या कालात पाटील गावाचा प्रथम नागरिक व ५०-९० टक्का जमीनी चा मालक होते.
पाटील (जमीनदार किंवा ग्राम प्रमुख ) : पट्टकील या शब्दापासून पाटील शब्द वापरात आला. गावचा कारभार करण्याकरिता एका वतनदाराची नेमणूक केल्यानंतर तो गावकीच्या नोंदी कापसाने विणलेल्या पट्ट्या (जाड कापडा)वर घेऊन तो पट्टा एका वेळूच्या नळीत जपून ठेवत. या नळकांड्याला पट्टकील म्हणत. त्यानुसार महाराष्ट्रात पाटील शब्दाची निर्मिती झाली. गावातील महसुली आणि फौजदारी अशा दोन्हीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पाटलावर असून एकप्रकारे तो गावचा राजाच निर्माण झाला. त्यामुळे गावक-यांनी व बलुतेदारांनी आपल्या सेवा पाटलाला मोफत द्यायच्या होत्या.जमिनीच्या नोंदीव्यतिरिक्त इतर कामे तो तोंडाने करून घेई एवढी त्याच्या शब्दाला किंमत होती. त्यातून ‘तोंडपाटीलकी’ हा शब्द आला. कर्नाटकात पाटलाला नाईक, गौडा किंवा बुधवंत तर गुजरातेत मुखी आणि अगेवान म्हणतात. पुढे काम वाढल्याने पाटलाची दोन पदे आली. १) पोलीस पाटील २) मुलकी पाटील. गावातील लग्नसमारंभ असो की कुठलाही सण पाटलाचा मान पहिला असायचा. पोलिस, न्यायाधीश अशा सर्वच भूमिकांत पाटलाचे महत्त्व होते. त्यामुळे पाटलाकडून कायद्याची पायमल्ली होऊ लागली. रांझे गावचा भिकाजी गुजर हा पाटील होता. पाटलाला मदत करण्यासाठी चौगुला, कुलकर्णी, नायकवाडी(जासूद), कोतवाल, हवालदार, शेतसनदी (गाव लष्कर) कुळवाडी,यांच्यासह बारा बलुतेदार होते. त्यामुळे पाटलाचे महत्त्व एवढे वाढले की त्याची भावकीसुद्धा पाटील आडनाव म्हणून स्वीकारायला लागली. पुढे अधिकार गेले तरी नावातील जादू कायम राहिली. त्यामुळे म्हणले गेले, "उतरंडीला नसेना दाणा, पण दादल्या असावा पाटील राणा."
काही उल्लेखनीय व्यक्ती
[संपादन]- स्मिता पाटील -हिंदी/मराठी चित्रपट अभिनेत्री
- क्रान्तिसिंह नाना पाटील - भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक
- स.का. पाटील- मुंबईचे अनभिषिक्त सम्राट
- कर्मवीर भाऊराव पाटील - मराठी शैक्षणिक/सामाजिक कार्यकर्ते.
- आर.आर. पाटील - मराठी राजकारणी
- गणपत पाटील - मराठी चित्रपट अभिनेते
- दिनकर द. पाटील - मराठी चित्रपट दिग्दर्शक.
- प्रतिभा पाटील - भारतीय राष्ट्रपती.
- जयंत पाटील: महाराष्ट्राचे गृहमंत्री
- आमदार शरद पाटील
- कॉम्रेड शरद पाटील
- संदीप पाटील - भारतीय क्रिकेट खेळाडू.
- शिवाजीराव पाटील निलंगेकर- माजी मुख्यमंत्री
- श्रीनिवास पाटिल- खासदार
- रजनीकांत हेन्द्रे पाटील