मुधोळ संस्थान
Appearance
म्हैसूरचे राज्य याच्याशी गल्लत करू नका.
मुधोळ संस्थान | ||||
|
||||
|
||||
राजधानी | मुधोळ | |||
सर्वात मोठे शहर | मुधोळ | |||
शासनप्रकार | राजतंत्र | |||
राष्ट्रप्रमुख | पहिला राजा: मालोजीराजे घोरपडे (इ.स. १६६२-१७००) अंतिम राजा: भैरवसिंहराव राजे घोरपडे (द्वितीय) (इ.स. १९३७-४७) |
|||
अधिकृत भाषा | मराठी | |||
लोकसंख्या | ९,३६,२१८ (१९३१) | |||
–घनता | १,८४२.९ प्रती चौरस किमी |
मुधोळ संस्थान हे ब्रिटिश भारतातल्या मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते.
स्थापना
[संपादन]मुधोळ जहागिरीची स्थापना इ.स. १४६५ या वर्षी झाली. त्याचे जहागीरदार घोरपडे घराणे होते. इ.स. १६७० मध्ये मुधोळ जहागिरीचे रूपांतर घोरपडे संस्थानिक असलेल्या मुधोळ संस्थानात झाले. त्यानंतर हे संस्थान इ.स. १८१९ मध्ये ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत आले.
क्षेत्रफळ
[संपादन]मुधोळ संस्थानाचे क्षेत्रफळ ५०८ चौरस किमी इतके होते.
स्वातंत्र्योत्तर कालखंड
[संपादन]भारत स्वतंत्र झाल्यानंतर मुधोळचे महाराजा राजा भैरवसिंहराव मालोजीराव घोरपडे (द्वितीय) यांनी मुधोळ संस्थान ८ मार्च १९४८ या दिवशी भारतीय संघराज्यात विलीन केले. मुधोळ हे गाव कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यात आहे.