Jump to content

धनुर्वेद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धनुर्वेद हा यजुर्वेदाचा उपवेद आहे. यामध्ये शस्त्रकला, सर्व शस्त्रांची माहीती व युद्धनिती आणि युद्धकला यांचा समावेश आहे. ब्रह्मा, प्रजापती इत्यादीं पासून परंपरेने विश्वामित्र ऋषींना हे ज्ञान प्राप्त झाले. दीक्षापाद, संग्रहपाद, सिद्धिपाद आणि प्रयोगपाद हे धनुर्वेदाचे चार पाद आहेत. दुष्टांना दंड देणे आणि प्रजेचे परिपालन हेच धनुर्वेदचे प्रयोजन आहे. दुष्ट चोरादिकांपासून प्रजापालन करण्यानें अंतःकरणशुद्धि होऊन, ज्ञानद्वारां मोक्षाविषयींच धनुर्वेदाचा अभिप्राय आहे.