पर्वतरांग
Jump to navigation
Jump to search

हिमालय ही जगातील सर्वात उंच पर्वतरांग आहे.

आन्देस ही जगातील सर्वात लांब पर्वतरांग आहे.
पर्वतरांग हा एकसारखे अनेक पर्वत अथवा डोंगर असलेला एक भौगोलिक प्रदेश आहे. पर्वतरांगेमध्ये भूगर्भशास्त्रानुसार समान गुणधर्म असलेले पर्वत असतात.
जगातील सर्वात उंच पर्वतरांगा आशिया खंडामध्ये आहेत.
- हिमालय: भारत, चीन, नेपाळ, पाकिस्तान, भूतान; सर्वोच्च शिखर - एव्हरेस्ट, 8848 मी
- काराकोरम पर्वतरांग: पाकिस्तान, भारत, चीन; सर्वोच्च शिखर - के२, 8611 मी
- हिंदुकुश पर्वतरांग: अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत; सर्वोच्च शिखर - तिरिच मीर, 7708 मी
- पामीर पर्वतरांग: ताजिकिस्तान, चीन, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत; सर्वोच्च शिखर - इस्माइल सोमोनी शिखर, 7495 मी
- थ्यॅन षान: चीन, कझाकस्तान, उझबेकिस्तान, किर्गिझस्तान, भारत, पाकिस्तान; सर्वोच्च शिखर - चंगीश चोकुसू, 7439 मी
अमेरिका खंडामधील खालील दोन जगातील सर्वात लांबीच्या पर्वतरांगा आहेत.
- आन्देस - ७,००० किमी
- रॉकी पर्वतरांग - ४,८०० किमी