अरविंद केजरीवाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल

रविंद केजरीवाल २००६


कार्यकाळ
२६ डिसेंबर २०१३ – १४ फेब्रुवारी २०१४
मागील शीला दीक्षित
पुढील राष्ट्रपती राजवट

दिल्ली विधानसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
१४ फेब्रुवारी २०१५
मागील शीला दीक्षित
मतदारसंघ नवी दिल्ली

जन्म १६ ऑगस्ट, १९६८ (1968-08-16)
हिस्सार, हरियाणा, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष आम आदमी पार्टी
पती सु्नीता केजरीवाल
अपत्ये २ (हर्षिता आणि पुलकित)
शिक्षण आय.आय.टी. खरगपूर
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

अरविंद केजरीवाल (जन्म: १६ ऑगस्ट, इ.स. १९६८; हिस्सार, हरियाणा) हे भारतातील एक सामाजिक कार्यकर्ते, आम आदमी पार्टीचे संस्थापक व पक्षाध्यक्ष व दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आय आय टी खरगपूर येथून अभियांत्रिकी शाखेत पदवी संपादन केली. त्यानंतर काही काळ त्यांनी जमशेदपूर येथे टाटा स्टीलमध्ये नोकरी केली. ह्या नोकरी मध्येच असताना त्यांनी टाटा स्टीलमधील सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी बदली मागितली परंतु त्यांची अभियांत्रिकी पदवी असल्याकारणाने त्यांना सदर विभागामध्ये बदली नाकारण्यात आली. म्हणून त्यांनी टाटा स्टीलची नोकरी १९९२ मध्ये सोडली आणि ते कोलकाता येथील मदर तेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी, ईशान्य भारतातील रामकृष्ण मिशन आणि नेहरू युवा केंद्र येथे काम करू लागले. [१][२] त्यानंतर त्यांनी भारतीय भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये आयकर विभागामध्ये सहआयुक्त या पदावर काम केले.

प्रशासनात पारदर्शकता आणण्यसाठी माहितीच्या अधिकार कायद्याच्या मसुद्यावर अरविंद केजरीवाल यांनी काम केले. माहिती अधिकाराचा कायदा व जनलोकपाल संमत व्हावा यासाठी त्यांनी अण्णा हजारे ह्यांच्यासोबत महत्त्वाचे काम केले. प्रशासनामध्ये पारदर्शकता आणून जनतेत भ्रष्टाचाराविरुद्ध जागृती निर्माण करण्याचे कार्य ते करत आहेत. इ.स. २००६ साली लक्षवेधी नेतृत्वासाठी त्यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रेमन मॅगसेसे पुरस्काराच्या निधी दान करून, अरविंद केजरीवाल यांनी पब्लिक कॉज रिसर्च फाउंडेशन ह्या सामाजिक संस्थेची इ.स. २०१२मध्ये स्थापना केली.

शाकाहारी अरविंद केजरीवाल रोज विपश्यना करतात.

सुरुवातीचे जीवन[संपादन]

अरविंद केजरीवाल यांचे वडील गोविंदराम हे मेसराच्या बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अभियंता होते. आईचे नाव गीतादेवी. केजरीवाल बालपणी हिस्सार, सोनेपत, मथुरा यासारख्या उत्तरी भारतातील गावांत राहिले. त्यांचे शालेय शिक्षण कँपस हायस्कूल, हिस्सार येथे झाले. [३] इ.स. १९८९ साली त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर येथून अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. तेथील नेहरू हॉलमध्ये ते राहत होते. महाविद्यालयीन जीवनामध्येही सुटीच्या वेळी झोपडपट्टीतील मुलांना शिकविण्यासाठी जात असत. झोपडपट्टीतील जीवन काय असते हे पूर्णतः समजून घेण्यासाठी ते तीन महिने स्वेच्छेने स्वतः झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास होते.[४]

कारकीर्द[संपादन]

१९९२ मध्ये नागरी सेवा परीक्षेत यश मिळाल्यावर ते भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये (IAS) नोकरीला लागले..[२]. फेब्रुवारी २००६ मध्ये त्यांनी आयकर विभागाच्या जॉइंट कमिशनर पदावरुन स्वेच्छानिवृत्ती घेतली.[५]

त्यानंतर त्यांनी दिल्ली येथे परिवर्तन नावाच्या नागरिकांची चळवळ चालवणार्‍या संस्थेची स्थापना केली. सरकारचा राज्यकारभार न्याय्य, पारदर्शक आणि जबाबदार व्हावा या दृष्टीने या संस्थेतर्फे प्रयत्‍न केले जातात. डिसेंबर २००६ मध्ये त्यांनी मनीष सिसोदिया आणि अभिनंदन सेखरी यांच्या बरोबर पब्लिक कॉज रिसर्च फाउंडेशन सुरू केले. त्यातून स्थानिक राज्यकारभार आणि माहितीच्या आधिकारासंबंधीच्या मोहिमा चालवल्या जातात.[६] त्यांना भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर यांच्यातर्फे देण्यात येणारा सत्येंद्रनाथ दुबे पुरस्कार मिळाला आहे. [७][८] त्यांनी २९ जुलै २०१२ या दिवशी स्वराज नावाचे पुस्तक जंतरमंतर, नवी दिल्ली येथे प्रसिद्ध केले. या पुस्तकाचे ’स्वराज्य’ नावाचे मराठी भाषांतर श्रीनिवास जोशी यांनी केले आहे.

२०१३ सालची दिल्ली विधानसभा निवडणूक[संपादन]

डिसेंबर २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये केजरीवाल ह्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या आम आदमी पार्टीने ७० पैकी ६९ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. ह्यांपैकी २८ जागांवर विजय मिळवून भारतीय जनता पक्षाखालोखाल आम आदमी पक्षाने दुसरा क्रमांक पटकावला. पक्षाध्यक्ष केजरीवाल ह्यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदार संघामधून तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित ह्यांचा २५,८६४ मतांनी पराभव केला.

२०१५ सालची दिल्ली विधानसभा निवडणूक[संपादन]

२०१५ विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने एकूण ७० पैकी ६७ जागा जिंकून विधानसभेत बहुमत मिळवले. भारतीय जनता पक्षाला फक्त ३ जागा मिळाल्या आणि काँग्रेसला शून्य.

अरविंद केजरीवाल यांची थोडक्यात कारकीर्द[संपादन]

 • १९६८ - जन्म
 • बालपण -गाझियाबाद, सोनपत, हिस्सार या गावांत
 • शालेय शिक्षण हिस्सारच्या क~ऎंपस हायस्कुलात
 • १९८९ -आय आय टी खरगपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअर
 • १९८९ - टाटा स्टीलमध्ये नोकरीसाठी दाखल
 • १९९२ - टाटा स्टील सोडली, आय.ए.एस.नंतर महसूल खात्यात निवड. प्राप्तिकर खात्याचे कमिशनर; ’परिवर्तन’ संस्थेची स्थापना
 • २०१२ पब्लिक कॉज रिसर्च या संस्थेची स्थापना; मॅगसेसे पुरस्कार मिळाला.
 • २ ऒक्टोबर २०१२ - आम आदमी पक्ष (आप) या राजकीय पक्षाची स्थापना
 • २६ नोव्हेंबर २०१२ पक्षाची रीतसर घोषणा
 • ४ डिसेंबर २०१३ रोजी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जिंकून दिल्लीचे मुख्यमंत्री होऊन मंत्रिमंडळ बनवले.
 • ४९ दिवसात राजीनामा देऊन विधानसभा बरखास्‍त केली.
 • १४ फेब्रुवारी २०१५ - पुन्हा निवडणुका जिंकून मुख्यमंत्री झाले.

अरविंद केजरीवाला यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

 • अशोका फेलो (२००४)
 • असोसिएशन फॉर इंडियाज डेव्हलपमेन्टतर्फे फेलोशिप आणि निधी (२००९)
 • ’एन.डी.टी.व्ही.तर्फे अण्णा हजारे यांच्या सोबत इंडियन ऑफ द इयर’ पारितोषिक (२०११)
 • सीएनएन-आयबीएनतर्फे ’इंडियन ऑफ इयर’ पारितोषिक (२००६)
 • इकॉनॉमिक टाइम्सतर्फे ’कॉर्पोरेट एक्सलन्स’ पारितोषिक (२०१०)
 • खरगपूरच्या आय‍आयटीतर्फे सर्वोत्कृष्ट माजी विद्यार्थी पुरस्कार (२००९)
 • रेमन मॅगसेसे पारितोषिक (२००६)
 • कानपूरच्या आय‍आयटीतर्फे सत्येंद्र दुबे पारितोषिक (२००५)

संदर्भ[संपादन]

 1. "अशोक संस्था [[वर्ग:स्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]".  Text " Ashoka – Innovators for the Public" ignored (सहाय्य); Wikilink embedded in URL title (सहाय्य)
 2. २.० २.१ Sivanand, Mohan. "Arvind Kejriwal’s Quest for Change". Rreaders Digest. 20 August 2011 रोजी पाहिले. 
 3. मॅगसेसे पुरस्कारच्या संकेतस्थळावरील केजरीवाल यांची माहिती. rmaf.org.ph
 4. "भारतीय तंत्रज्ञान संस्था, खडगपूर यांचे नामांकित माजी विद्यार्थी". 22 August 2011 रोजी पाहिले. 
 5. Press Trust of India (2011-12-21), CNN-IBN 
 6. "Public Cause Research Foundation.". (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 21 July 2011 रोजी मिळवली). 24 August 2011 रोजी पाहिले. 
 7. चरित्र भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर यांचा सत्येंद्र दुबे स्मृती पुरस्कार
 8. Hauzel, Hoihnu (Saturday, September 30, 2006). "Fighting the odds -टेलिग्राफ पत्रातील लेख". The Telegraph. 20 August 2011 रोजी पाहिले. 

बाह्य दुवे[संपादन]