सरोवर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सरोवर
कॅस्पियन समुद्र हे जगातील सर्वात मोठे सरोवर मानले जाते.

सरोवर (किंवा तलाव) म्हणजेपृथ्वीवरील गोड्या अथवा खाऱ्या पाण्याचा मोठ्या आकाराचा साठा. सरोवरे पूर्णपणे जमिनीने वेढलेली असतात व कोणत्याही समुद्राचा भाग नसतात. आकाराने सरोवरे तळ्यांपेक्षा बरीच मोठी असतात व त्यांमधील पाणी साधारणपणे संथ असते.[१][२]

उल्लेखनीय सरोवरे[संपादन]

खंडांनुसार मोठी सरोवरे[संपादन]

सर्व खंडांमधील मोठी सरोवरे (क्षेत्रफळाच्या दृष्टीने):


पवित्र सरोवरे[संपादन]

भारतातले हिंदू पाच सरोवरे पवित्र असल्याचे मानतात. त्यामुळे या सरॊवरांना भेट देणे ह्या धार्मिक यात्रा समजल्या जातात. ती पवित्र सरोवरे अशी :-

* तिबेटमधील मानस सरोवर

भारतभरातील तलावांची परंपरा[संपादन]

मोठ्या सरोवरान इतकेच महत्त्वाचे आहेत लहान मोठे तलाव संपूर्ण भारतभर लहान मोठ्या तलावांचे अस्तित्व आपल्याला पाहायला मिळते. परंतू योग्य देखभाल न झाल्याने आज कितीतरी तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. एक काळ असा होता जेव्हा पाण्याची व्यवस्था करणे त्याचे रक्षण करणे ही सर्व समाजाची जबाबदारी होती.इथला समाज स्वतः च्या हिताच्या गोष्टी स्वतः निर्माण करण्यावर भर देत होता,स्वतःची शक्ती वापरत होता.सत्ताधारी राजा हा जनतेचा सहाय्यक होता. त्यानेच सर्व करावे अशी अपेक्षा नसायची.इंग्रजांच्या आगमनानंतर मात्र परिस्थिती बदलली. त्यांनी येथील पाणी व्यवस्थेची माहिती जुन्या दस्तावेजामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला.परंतू अशा नोंदी ठेवायची फारशी सवय नसल्याने त्यानी गृहीत धरले कि त्यांनाच खूप काही करायला लागेल. त्यानी माहिती बरीच मिळवली परंतू त्यामागच्या धारणा मात्र समजून घेतल्या नाही.१९ व्या शतकाच्या शेवटी व विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजांनी सर्वत्र फिरतान मिळालेल्या माहितीच्या आधारे जी gazettier तयार केली त्यामध्ये अनेक मोठ्या तलावांचा उल्लेख मिळतो.

कोणी निर्माण केली ही परंपरा ?[संपादन]

शेकडो हजारो तलाव निर्माण करणारे हात कोणाचे होते हे शोधताना भारतातील कितीतरी समाजांची नावे मि ळतात.गजधर,टकारी,दुसाध,नौनिया गोंड ,परधान,कोल,ढीमर ,ढीवर,कोळी ,भोई अगरीया ,माळी,भिल्ल ,नाईक सोन्पुरा , महापात्र इ.==<आज भी खरे है तालाब> ==

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

साचा:Wiktionary