Jump to content

बिर्याणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हैद्राबादी चिकन दम बिर्याणी
Biryani of Hyderabad

बिर्याणी हा प्रामुख्याने भारतीय उपखंडात बनवला जाणारा एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. प्रामुख्याने भात, मसाले व मांस वापरून बनवली जात असलेल्या बिर्याणीचे मूळ मध्य युगात भारतावर राज्य करणाऱ्या मुस्लिम शासकांमध्ये आढळते. बिर्याणी हा फारसी भाषेपासून तयार झालेला एक उर्दू शब्द आहे.

मटन अथवा चिकन वापरून बनवली जात असलेली बिर्याणी भारताच्या अनेक भागात स्थानिक नावांद्वारे ओळखली जाते. उदा: हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी, दिल्ली बिर्याणी, कोलकाता बिर्याणी, मलबार बिर्याणी, इत्यादी. ह्या सर्व बिर्याण्यांमध्ये मूळ घटक सारखेच असले तरी तांदूळाचा प्रकार, मसाल्यांचे मिश्रण व पाकशैलीमध्ये वैविध्य आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी शाकाहारी बिर्याणी देखील बनवली जाते.

चिकन बिर्याणी बनवण्याची पद्धत[संपादन]

साहित्य[संपादन]

एक किलो चिकन, 7/8 कांदे , ४/५टॉमेटो, आले, लसूण 15-20 पाकळ्या, 5-६ लवंग, 7-8 मिरी, ३ बडी वेलची, 4 लहान वेलची, दालचिनी १ इंच, 2 लहान चमचा धणे, खसखस 1/2 चमचा, तमालपत्र, लाल मिरची पूड , कोथींबीर, पुदीना, तेल, तूप, ४ वाटी चांदतारा तांदूळ.

पाककृती[संपादन]

 • चिकनला दोन चमचे चमचे मिरची पूड , हळद , मीठ , अर्धी लहान वाटी दही लावून ठेवावे
 • नॉर्मल साईझचे 7/8 कांदे उभे कापून घेउन तेलात गोल्डन ब्राउन रंगावर फ्राय करून वेगळे ठेवणे. कढईत तेल न टाकता कापलेले कांदे मंद आचेवर ठेवावेत .थोड्यावेळाने तेल घालावे. हे सारखे बघावे लागत नाही. थोड्यावेळाने मध्ये मध्ये परतावे.

कांदा व्यवस्थित फ्राय व्हायला १ तास लागतो. पण मंद आचेवरच फ्राय करून घ्यावा. ज्या दिवशी बिर्याणी बनवायची त्यादिवशी उठल्या उठल्या कांदा फ्राय करायला गॅस वर ठेवून द्यावा .

 • ३. ४/५ टोमॅटो कुकर मध्ये शिजवून घ्यावेत. २ शिट्या काढाव्यात. थंड झाल्यावर सालं आणि बिया काढून मिक्सर मधून प्युरी करून घ्यावी. ती वेगळी ठेवावी.
 • खाली दिलेला गरम मसाला तेलात थोडा परतून त्याची मिक्सर वर बारीक पूड करावी.

2 1/2 इंच आले , लसूण 15-20 पाकळ्या , 5-६ लवंग , 7-8 मिरी , 2 बडी वेलची, 4 लहान वेलची, दालचिनी १ इंच , 2 लहान चमचा धणे , खसखस 1/2 चमचा वरील प्रमाणात मी नॉर्मल साईझच्या चार वाट्या बासमती तांदूळ घेते. अर्धा तास आधी बासमती तांदूळ धुऊन पाण्यात बुडवून ठेवावे. टोमेटो प्युरी , गरम मसाला , कांदे फ्राय करून झाले कि भात कारायला घ्यावा.

 • एका मोठ्या पातेल्यात थोडे तेल तापवून त्यात तमाल पत्र टाकावे . तांदूळ पाण्यातून गाळून घेऊन तेलावर परतावेत . तांदळाच्या चौपट पाणी दुसऱ्या टोपात उकळायला ठेवावे . पाणी उकळल्यावर तांदळात टाकावे . आच मोठी ठेवावी. मीठ टाकावे. थोड्या वेळाने तांदूळ अर्धा कच्चा शिजला असे वाटले कि गॅस बंद करून मोठ्या चाळणीतून भात गाळून घ्यावा. भात ताटात मोकळा करून ठेवावा .भात लगेच गाळून घ्यावा नाहीतर चिकट होतो
 • ज्या टोपात बिर्याणी करायची त्या टोपात प्रथम तूप आणि तेल टाकावे. शक्यतो जाड बुडाचा टोप घ्यावा. नुसत्या तुपातली बिर्याणी अप्रतीम होते .

तेलात 2 मोठी वेलची कुटून , तमाल पत्र, दालचिनी , वाटलेला मसाला, लाल मिरची पूड २ चमचे , मीठ टाकून परतावे . मग त्यात चिकन टाकून परतावे. मग टॉमेटो प्युरी टाकून नीट परतून घ्यावी. चिकनला सगळा मसाला लागेल अश्या पद्धतीने परतावे. मग फ्राय केलेला कांदा . पुन्हा परतून त्यात एक वाटी कापलेली कोथिम्बीर , एक वाटी पुदिना , आवडी प्रमाणे काजू टाकावेत . आणि नीट मिक्स करून टोप खाली उतरावा. हे सगळे मोठ्या आचेवर करावे. टोप खाली उतरल्यावर चिकन एकसारखे करून त्यावर अर्धाकच्चा शिजवलेल्या भाताचा थर लावावा . भातावर हवे असल्यास केशराचे पाणी शिंपडावे. थर लावल्यावर अर्धा वाटी पाणी भातावर शिंपडून , कडेने तूप सोडावे .

 • टोपावर अ‍ॅल्युमिनिअम फॉईल लावावी . किंवा गव्हाच्या पिठाची पेस्ट लावावी. दोन चमचे पिठात थोडे पाणी घालून पातळ पेस्ट करावी . टोपावर निट बसणारे झाकण लावून टोपाची कडा आणि झाकणाच्या मध्ये जी गॅप असेल तिथे ही पेस्ट भरावी.45 मिनिटे मंद गॅस वर अ‍ॅल्युमिनिअम फॉईल लावून टोप ठेवून द्यावा .

बिर्याणी अजून मुरण्यासाठी तवा तापवून त्यावर २० मिनिटे मंद गॅस वर भांडे ठेवावे .

अधिक टिपा[संपादन]

 • कांदा कढईत तळून घेतल्यास बिर्याणी अजून चविष्ट होते पण खूप तूपकट होते. आवडत असल्यास कांदा तळून घेऊ शकता.
 • बिर्याणी आणि भाताचा थर लावताना सगळ्यत खाली बटटायाच्या कापांचा थर लावल्यास खाली करपत नाही आणि यातले बटाटे छान लागतात. पण खूपसा मसाला बटाटयामधे अ‍ॅब्सोर्ब होतो.
 • जाड बुडाचे भांडे नसल्यास १५ मिनिटांनी टोप तव्यावर ठेवून बिर्याणी शिजवावी.
 • बिर्याणी वाढताना वरतून तळलेला कांदा , तळलेले काजू टाकावे.
 • अश्याच पद्ध्तीने मटण बिर्याणी करावी पण मटण आधी शिजवून घ्यावे.
 • कांदे फ्राय करून फ्रिज मधे ठेवू नका. चव बदलते. फूड प्रोसेसर मधे उभे कापून फ्रिज मधे ठेवल्यास चालेल.


विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


महाराष्ट्रीयन चिकन बिर्याणी बाबावण्याची पद्धत

मायबोली