इंडिया गेट
Appearance
गेटवे ऑफ इंडिया याच्याशी गल्लत करू नका.
| इंडिया गेट | |
|---|---|
|
राष्ट्रीय स्मारक | |
| स्थान | नवी दिल्ली, दिल्ली, भारत |
| निर्मिती | इ.स.१९३१ |
| वास्तुविशारद | एडविन लुटयेन्स |
| वास्तुशैली | आधुनिक शैली |
| प्रकार | सांस्कृतिक |
| देश | भारत |
| खंड | आशिया |
इंडिया गेट हे भारताचे एक राष्ट्रीय स्मारक आहे. ते दिल्ली येथे स्थित असून त्याची रचना एडविन लुटयेन्स यांनी केली होती. या स्मारकाची प्रेरणा पॅरीस येथील आर्क दे ट्रायम्फे (फ्रेंच: Arc de Triomphe) या स्मारकावरून घेण्यात आली होती, जे स्वतः रोमन साम्राज्यातील आर्क ऑफ टायटस (इंग्लिश: Arch of Titus) या स्मारकावरून बनविले आहे. इंडिया गेट इ.स. १९३१ साली बांधले गेले. सुरुवातीला ते ऑल इंडिया वॉर मेमोरिअल (इंग्लिश: All India War Memorial) या नावाने ओळखले जात असे. पहिल्या महायुद्धात व ॲंग्लो-अफगाण युद्धात मरण पावलेल्या ९०,००० ब्रिटिश इंडियन आर्मीमधील सैनिकांसाठी हे स्मारक बनविले गेले होते. ते लाल आणि फिक्या ग्रॅनाइट दगडांपासून बनविले आहे.