लोदी
लोदी वंश किंवा लोदी घराणे हे अफगाणमधून भारतात आलेले एक घराणे आहे. या घराण्यातील बहलूलखानाने सरहिंद प्रांत जिंकून अफगानांचे नेतृत्व संपादन केले. पुढे पंजाब, दिल्ली जिंकून त्याने इ.स. १४५१ मध्ये लोदी घराण्याची स्थापना केली.[१]
लोदी घराण्यातील राजे[संपादन]
- बहलूल लोदी (.स. १४५१ ते १४८९)
- शिकंदर लोदी (.स. १४८९ ते १५१७)
- इब्राहिम लोदी (इ.स. १५१७ ते १५२६)
राजांचा इतिहास[संपादन]
बहलूलने जोधपूर, मेवाड, रोहीलखंड, ग्वाल्हेर हे प्रांत दिल्लीच्या राज्यास जोडले. बहलूलच्या मृत्यूनंतर त्याचा तिसरा मुलगा शिकंदर हा गादीवर आला. बिहार, मध्य भारत, नागौर हे भाग त्याने जिंकून घेतले. शिकंदरने जमीन महसूल, गुप्तहेर खाते, न्याय खाते यात सुधारणा केल्या. शिकंदरच्या मृत्यूनंतर अफगान सरदारांनी राज्याचे विभाजन करून जलालखान यास जौनपूरच्या तख्तावर बसविले व इब्राहिमला दिल्लीच्या राज्यावर बसविले. नंतर इब्राहिमने जलालखानचा खून करून सर्व सत्ता बळकावली. इब्राहिमच्या कडक शासनाला कंटाळून दर्याखान लोहानी व दौलत लोदी हे स्वतंत्र झाले. दौलतखानाने काबूलचा मोगल सुलतान बाबर यास मदतीस बोलावले. बाबरने हिंदुस्तानवर स्वारी करून पानिपत येथील लढाईत इब्राहिमचा पराभव करून त्यास ठार मारले व लोदी घराण्याचा शेवट झाला.
इतर[संपादन]
लोदी काळातील वास्तू आजही दिल्ली, आग्रा, धोलपूर येथे आढळतात.
संदर्भ व नोंदी[संपादन]
- ^
प्रसाद, ईश्वरी. अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ मुस्लिम रूल इन इंडिया (इंग्लिश भाषेत). ०५/११/२०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)