एप्रिल ४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(४ एप्रिल या पानावरून पुनर्निर्देशित)

एप्रिल ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९४ वा किंवा लीप वर्षात ९५ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]

एकोणिसावे शतक[संपादन]

  • १८८२: ब्रिटनच्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्राम ईस्ट लंडन मध्ये चालू झाल्या

विसावे शतक[संपादन]

  • १९०५: हिमालयातील कांगरा व्हॅलीमध्ये भूकंप २०,००० व्यक्ती मृत्यूमुखी
  • १९२४: महात्मा गांधी यांनी 'यंग इंडिया' आणि 'नवजीवन' या वृत्तपत्रांचे संपादकपद स्वीकारले.
  • १९४४: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले.
  • १९४९: पश्चिम युरोपातील राष्ट्रे व अमेरिका यांच्यात संरक्षणविषयक उत्तर अटलांटिक करार म्हणजे ‘नाटो करार’ करण्यात आला.
  • १९६८: जेम्स अर्ल रे यांनी मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) यांची हत्या केली.
  • १९६८: नासाने अपोलो-६ चे प्रक्षेपण केले.
  • १९६९: कृत्रिम हृदय बसवण्याचा पहिला प्रयोग डॉ. डेंटन कूली यांनी केला
  • १९७५: बिल गेट्स आणि पॉल ॲलन यांनी भागीदारीत मायक्रोसॉफ्टची स्थापना केली
  • १९७९: पाकीस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फीकार अली भुत्तो यांना फाशी
  • १९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.

एकविसावे शतक[संपादन]

  • २०१३ : बांधत असलेली इमारत कोसळल्याने मुंब्र्यात सत्तरपेक्षा जास्त बळी

जन्म[संपादन]

मृत्यू[संपादन]

  • १९७९: पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान झुल्फिकार अली भत्तो
  • १९८७: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते हिंदी लेखक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन उर्फ अज्ञेय
  • १९९६: संस्कृत आणि मराठी साहित्यिक आनंद साधले
  • २०००: कलादिग्दर्शक वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर
  • २०१६: भारतीय वकील आणि राजकारणी पी. ए. संगमा
  • २०१७-ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरीताई आमोणकर

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]



एप्रिल २ - एप्रिल ३ - एप्रिल ४ - एप्रिल ५ - एप्रिल ६ - (एप्रिल महिना)