जुलै ८
Appearance
जुलै ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८९ वा किंवा लीप वर्षात १९० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]पंधरावे शतक
[संपादन]- १४९७ - वास्को दा गामाने भारताकडे समुद्रमार्गे प्रयाण केले.
एकोणिसावे शतक
[संपादन]विसावे शतक
[संपादन]- १९१० - क्रांतिकारकांना पिस्तुली पूरवल्यामुळे अटक केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ’मोरिया’ या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.
एकविसावे शतक
[संपादन]- २०११ - भारतीय रुपयाचे नवीन चिन्ह ( ₹ ) असलेली नाणी भारतीय चलनात आली.
जन्म
[संपादन]- १८३९ - जॉन डी. रॉकफेलर, अमेरिकन उद्योगपती.
- १८९५ - इगोर टॅम, नोबेल पारितोषिक विजेता रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०८ - वी. के. आर. वी. राव, भारतीय अर्थशास्त्रज्ञ.
- १९०८ - नेल्सन रॉकफेलर, अमेरिकेचा ४१वा उपराष्ट्राध्यक्ष.
- १९१४ - ज्योती बसू, बंगाली राजकारणी.
- १९१६ - गोपाळ नीळकंठ दांडेकर, मराठी कादंबरीकार, चरित्रकार.
- १९५८ - नीतू सिंग, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९७२ - सौरव गांगुली, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - अनास्ताशिया मिस्किना, रशियन टेनिस खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- ८१० - पेपिन, इटलीचा राजा.
- ९७५ - एडगर, इंग्लंडचा राजा.
- ११५३ - पोप युजीन तिसरा.
- १६२३ - पोप ग्रेगोरी पंधरावा.
- १८२२ - पर्सी बिशे शेली, इंग्लिश कवी.
- १८५९ - ऑस्कार पहिला, नॉ़र्वे आणि स्वीडनचा राजा.
- १९३० - सर जोसेफ वॉर्ड, न्यू झीलंडचा १७वा पंतप्रधान.
- १९७३ - विल्फ्रेड ऱ्होड्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७९ - सिन-इतिरो-तोमोनागा, नोबेल पारितोषिक विजेता जपानी भौतिकशास्त्रज्ञ.
- १९७९ - रॉबर्ट बी. वूडवार्ड, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
- १९९४ - किम इल-सुंग, उत्तर कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९९ - पीट कॉन्राड, अमेरिकन अंतराळवीर.
- २००१ - उस्ताद बाळासाहेब मिरजकर, तबला विभूषण.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर जुलै ८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै ६ - जुलै ७ - जुलै ८ - जुलै ९ - जुलै १० - (जुलै महिना)