नीतू सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नीतू सिंग
जन्म हरनीत कौर
८ जुलै, १९५८ (1958-07-08) (वय: ६५)
दिल्ली
इतर नावे नीतू कपूर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र बॉलिवूड अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ १९६६-१९७०, १९७२-१९८३, २००९-चालू
पती ऋषी कपूर
अपत्ये रणबीर कपूर

नीतू सिंग ( ८ जुलै १९५८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. १९६६ सालच्या दस लाख ह्या चित्रपटामध्ये बाल-कलाकार म्हणून काम केल्यानंतर नीतू सिंगने आजवर ६० पेक्षा अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या आहेत. ऋषी कपूरसोबत तिची जोडी प्रसिद्ध होती. त्याच्यासोबत १९८० साली विवाह केल्यानंतर तिने १९८३ सालापासून अभिनयाला अर्धविराम दिला. २००७ सालापासून ती पुन्हा लहान-मोठ्या भूमिकांमध्ये चमकत आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत