भारतीय रुपयाचे चिन्ह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


भारतीय रुपयाचे चिन्ह

भारतीय रुपयाचे चिन्ह (भारतीय रूपया) हे भारतीय रुपयाचे अधिकृत चलन चिन्ह आहे. १५ जुलै २०१० रोजी भारत सरकारतर्फे हे चलन चिन्ह जाहीर करण्यात आले. हे चिन्ह वापरत येण्यापूर्वी सामान्यत: "Rs" किंवा "Re" या चिन्हांचा वापर होत असे किंवा जर मजकूर इतर भारतीय भाषांमध्ये असल्यास त्या भाषेतील साजेसे संक्षिप्त रूप वापरले जात असे. हे चिन्ह भारतीय चलना पुरतेच मर्यादित असून नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका या देशांप्रमाणेच इतर देश जेथे रुपया हे चलन म्हणून वापरत आहे तेथे आजही "Rs" याच चिन्हाचा वापर केला जातो. हे चिन्ह देवनागरी लिपीतील "र" आणि लॅटिन लिपीतील "R" या अक्षरांना ध्यानात ठेऊन बनविण्यात आले आहे.

उगम[संपादन]

५ मार्च २००९ मधे भारत सरकारने रुपयाच्या चिन्हासाठी स्पर्धा घेतली. ३,३३१ प्रतिक्रियांमधून पाच चिन्हे निवडण्यात आली. त्यांमधून १५ जुलै २०१० रोजी डी. उदयकुमार यांचे चिन्ह निवडण्यात आले.

रचना[संपादन]

युनिकोड[संपादन]