डिसेंबर २७
Appearance
<< | डिसेंबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
डिसेंबर २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३६१ वा किंवा लीप वर्षात ३६२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]अठरावे शतक
[संपादन]- १७०३ - पोर्तुगाल व इंग्लंडने मेथुएनच्या तहावर सही केली. पोर्तुगालहून आयात केलेल्या मद्याला (वाइनला) इंग्लंडमध्ये प्राधान्य.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८३१ - चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोसला जाण्यास निघाला.
विसावे शतक
[संपादन]- १९११ - भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात जन गण मन हे रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेले गीत प्रथमच म्हणण्यात आले. २४ जानेवारी १९५० रोजी या गीताला हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.
- १९१८ - बृहद् पोलंड (ग्रांड डची ऑफ पोझ्नान)मध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड
- १९४५ - २९ देशांनी केलेल्या करारानुसार जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) यांची स्थापना करण्यात आली.
- १९४५ - कोरियाची फाळणी.
- १९४९ - इंडोनेशियाला नेदरलॅंड्सपासून स्वातंत्र्य.
- १९७८ - ४० वर्षांच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक.
- १९७५ - बिहारमधील (आताचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार काही मिनिटांत ठार झाले.
- १९७९ - अफगाणिस्तानमध्ये सोवियेत संघराज्याने बब्रक कर्मालला अध्यक्षपदी बसविले.
- १९८५ - पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी रोम व व्हियेनाच्या विमानतळावर २० प्रवाश्यांना ठार मारले.
- १९८६ - अफगाणिस्तानमध्ये तालिबानने बाग्रामचा विमानतळ काबीज केला.
एकविसावे शतक
[संपादन]- २००७ - पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची गोळ्या घालून हत्या.
जन्म
[संपादन]- १५७१ - योहान्स केप्लर, जर्मन खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ.
- १६५४ - जेकब बर्नोली, स्विस गणितज्ञ.
- १७१७ - पोप पायस सहावा.
- १७७३ - जॉर्ज केली, इंग्लंडचा शास्त्रज्ञ, शोधक व राजकारणी.
- १७९७ - मिर्झा गालिब, उर्दू कवी.
- १८२२ - लुई पास्चर, फ्रांसचा शास्त्रज्ञ.
- १८७६ - भास्कर वामन भट, इतिहास संशोधक.
- १८९८ - पंजाबराव देशमुख, स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री, विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते.
- १९०१ - मार्लिन डीट्रीच, जर्मन अभिनेत्री.
- १९२३ - श्री. पु. भागवत, प्रकाशक, समीक्षक, संपादक, लेखक व प्राध्यापक.
- १९२४ - सुमती देवस्थळे, मराठी लेखिका.
- १९४४ - विजय अरोरा – हिंदी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता.
- १९६५ - सलमान खान, भारतीय चित्रपट अभिनेता.
मृत्यू
[संपादन]- ४१८ - पोप झोसिमस.
- १९०० - विल्यम जॉर्ज आर्मस्ट्रॉंग, ब्रिटिश स्थापत्यशास्त्री.
- १९६५ - देवदत्त नारायण टिळक, मराठी साहित्यिक, संपादक, ज्ञानोदय.
- १९९७ - मालती पांडे-बर्वे, मराठी भावगीत गायिका.
- २००२ - प्रतिमा बरुआ-पांडे, असमी लोकगीत गायिका.
- २००५ - केरी पॅकर, ऑस्ट्रेलियाचा उद्योगपती आणि क्रिकेट प्रायोजक.
- २००७ - बेनझीर भुट्टो, पाकिस्तानी पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- जागतिक बँक वर्धापन दिन
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर डिसेंबर २७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर २५ - डिसेंबर २६ - डिसेंबर २७ - डिसेंबर २८ - डिसेंबर २९ - (डिसेंबर महिना)