बाग्राम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बाग्राम हे अफगाणिस्तानमधील शहर आहे.

व्यूहात्मक महत्त्व[संपादन]

काबुलच्या वायव्येस ६० किमी वर असलेल्या या शहराचे प्राचीन नाव कपीसी किंवा कपीसा असे आहे. हे व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे कारण घोरबंदपंजशेर दऱ्यांच्या मध्ये असल्यामुळे या येथुन रेशीम रस्त्यावर लक्ष ठेवता येते तसेच मध्य एशियातून भारताकडे जाणारा रस्ताही येथूनच जातो.

इतिहास[संपादन]

येथे सायरस, दरायस, सिकंदर ई. जेते आल्याची नोंद आहे. कुषाण सम्राट कनिष्कने हे शहर मोठे केले व कुषाण साम्राज्याची उन्हाळी राजधानी केले.

इ.स. २००१च्या आक्रमणानंतर अमेरिकेने येथे मोठा हवाईतळ उभारला आहे.