ऑक्टोबर ८
Appearance
<< | ऑक्टोबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑक्टोबर ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८१ वा किंवा लीप वर्षात २८२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]चौथे शतक
[संपादन]- ३१४ - सिबालेच्या लढाईत कॉंस्टन्टाइन पहिल्याने रोमच्या सम्राट लिसिनियसचा पराभव करून युरोपमधील प्रदेश ताब्यात घेतला.
अकरावे शतक
[संपादन]- १०७५ - दमितार झ्वोनिमिर क्रोएशियाच्या राजेपदी.
पंधरावे शतक
[संपादन]- १४८० - उग्रा नदीच्या काठी मोंगोल सेनापती अखमत खान आणि इव्हान तिसऱ्याच्या सैन्यांनी एकमेकांना रोखून धरले. येथून माघार घेतलेल्या मोंगोल सैन्याची पडती होत गेली.
सतरावे शतक
[संपादन]- १६०० - सान मारिनोने लिखित संविधान अंगिकारले.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८१३ - रीडचा तह.
- १८२१ - पेरूच्या सैन्यदलाची स्थापना.
- १८५६ - दुसरे अफू युद्ध[मराठी शब्द सुचवा] सुरू झाले.
- १८७१ - मिशिगन सरोवराकाठी चार मोठ्या आगी लागल्या.
- १८७९ - चिलेच्या आरमाराने पेरूच्या आरमाराचा पराभव केला.
- १८९५ - जपानच्या सैन्याने सम्राज्ञी मिन या कोरियाच्या शेवटच्या सम्राज्ञीचा खून केला.
एकविसावे शतक
[संपादन]- १९१२ - मॉंटेनिग्रोने तुर्कस्तान विरुद्ध युद्ध पुकारले.
- १९१८ - पहिले महायुद्ध - आर्गॉनच्या जंगलात अमेरिकेच्या कॉर्पोरल ऍल्विन सी यॉर्कने आपल्या तुकडीसह जर्मन सैन्यावर हल्ला चढवून २५ सैनिक ठार केले आणि १३२ युद्धकैदी पकडले.
- १९३२ - भारतीय वायुसेनेची स्थापना.
- १९३९ - दुसरे महायुद्ध - जर्मनीने पश्चिम पोलंड बळकावले.
- १९५२ - हॅरो, इंग्लंड जवळ रेल्वे अपघातात ११२ ठार.
- १९६२ - अल्जीरियाला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- १९६७ - बोलिव्हियात शे ग्वेव्हाराला अटक.
- १९७३ - यॉम किप्पुर युद्ध - इस्रायेलने आपल्या हद्दीत ठाण मांडून बसलेल्या इजिप्तच्या सैन्यावर हल्ला चढवला. १५० रणगाड्यांचा विनाशासह इस्रायेलचा पराभव.
- १९७४ - अमेरिकेतील फ्रॅंकलिन नॅशनल बँकेने दिवाळे काढले.
एकविसावे शतक
[संपादन]- २००१ - इटलीतील मिलानच्या विमानतळावर धुक्यात स्कॅंडिनेव्हियन एरलाइन्स सिस्टमचे विमान एका छोट्या विमानास धडकले. ११८ ठार.
- २००५ - पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये तीव्र भूकंप. शेकडो ठार, हजारो बेघर.
जन्म
[संपादन]- १८५० - हेन्री लुई ले शॅटेलिये, फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ.
- १८९१ - शंकर वासुदेव किर्लोस्कर, मराठी लेखक, संपादक, व्यंगचित्रकार.
- १८९५ - हुआन पेरॉन, आर्जेन्टीनाचे राष्ट्राध्यक्ष.
- १८९५ - झॉग, आल्बेनियाचा राजा.
- १९१८ - जेन्स क्रिस्चियन स्कू, डेन्मार्कचा रसायनशास्त्रज्ञ.
- १९१९ - कीची मियाझावा, ७८वा जपानी पंतप्रधान.
- १९२८ - नील हार्वे, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- १३१७ - फुशिमि, जपानी सम्राट.
- १७३५ - याँगचंग, चीनी सम्राट.
- १८६९ - फ्रॅंकलिन पीयर्स, अमेरिकेचा १४वा राष्ट्राध्यक्ष.
- १९६७ - क्लेमेंट ऍटली, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९८२ - फिलिप नोएल-बेकर, कॅनडाचा नोबेल शांतता पुरस्कार विजेता.
- १९८७ - कॉंस्टान्टिनोस त्सात्सोस, ग्रीसचा दुसरा राष्ट्राध्यक्ष.
- १९९२ - विली ब्रॅंड्ट, नोबेल शांतता पुरस्कार विजेता जर्मनीचा चान्सेलर.
- २०११ - डेनिस रिची, C आज्ञावली परिभाषेचा जनक
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर ८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑक्टोबर ६ - ऑक्टोबर ७ - ऑक्टोबर ८ - ऑक्टोबर ९ - ऑक्टोबर १० - ऑक्टोबर महिना