नोव्हेंबर ९
Appearance
(९ नोव्हेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
नोव्हेंबर ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१३ वा किंवा लीप वर्षात ३१४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]अठरावे शतक
[संपादन]एकोणिसावे शतक
[संपादन]विसावे शतक
[संपादन]- १९०७ - इंग्लंडच्या राजा सातव्या एडवर्डला त्याच्या वाढदिवसानिमित्त कलिनन हीरा भेट देण्यात आला.
- १९१३ - अमेरिकेच्या ग्रेट लेक्स सरोवरांत आलेल्या वादळात १९ जहाजे बुडाली व २५०पेक्षा जास्त व्यक्ती मृत्यू पावल्या.
- १९१८ - पहिले महायुद्ध - जर्मनीच्या सम्राट विल्हेल्म दुसऱ्याने पदत्याग केल्यावर जर्मनीला प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.
- १९२३ - म्युनिकमध्ये नाझी पक्षाने आयोजित केलेला बीयर उठाव पोलीस व सैन्याने चिरडून काढला.
- १९३७ - जपानने शांघाय शहर जिंकले.
- १९३८ - जर्मनीत हर्षल ग्रिंझपानने अर्न्स्ट फोन राथची हत्या केली. हे कारण पुढे करून नाझींनी ज्यूंच्या शिरकाणाला सुरुवात केली.
- १९४७ - जुनागढ भारतात विलीन झाले.
- १९५३ - कंबोडियाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९६३ - जपानच्या मीके खाणीत स्फोट होउन ४५८ ठार, ८३९ दवाखान्यात. याच दिवशी जपानमध्ये योकोहामाजवळ तीन रेल्वेगाड्यांच्या अपघातात १६० ठार.
- १९८५ - अनातोली कारपोव्हला हरवून गॅरी कास्पारोव्ह सगळ्यात छोटा बुद्धिबळ जगज्जेता झाला.
- १९९० - नेपाळने नवीन संविधान अंगिकारले.
- १९९० - मेरी रॉबिन्सन आयर्लंडची पहिली स्त्री राष्ट्राध्यक्षा झाली.
- १९९४ - डार्मश्टाटियम या मूलतत्त्वाचा शोध.
- १९९८ - आपल्या गिऱ्हाइकांना एक किंमत दाखवून वेगळ्याच किमतीला रोखे विकल्याबद्दल नॅस्डॅक शेरबाजारातील दलालसंस्थांना १.०३ अब्ज अमेरिकन डॉलरचा दंड.
एकविसावे शतक
[संपादन]- २००५ - आत्मघातकी दहशतवाद्यांनी जॉर्डनच्या अम्मान शहरात बॉम्बस्फोट करून ६० व्यक्तींना ठार केले.
- २०१३ - सुपर टायफून हैयान या प्रचंड चक्रीवादळाने फिलिपाइन्सचा किनारा गाठला. ताशी ३१५ किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह तुफान पावसात शेकडो मृत्युमुखी.
जन्म
[संपादन]- १८४१ - एडवर्ड सातवा, इंग्लंडचा राजा.
- १८७७ - अल्लामा इकबाल, भारतात जन्मलेला पाकिस्तानचा राष्ट्रकवी.
- १८८२ - ज्यो हार्डस्टाफ, सिनियर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८५ - आल्फ्रेड डिपर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०४ - एडवर्ड व्हान डेर मर्व, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९१८ - स्पिरो ऍग्न्यू, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
- १९२३ - डोरोथी डॅन्ड्रिज, श्यामवर्णीय अमेरिकन अभिनेत्री.
- १९३१ - टॉमी ग्रीनहाउ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३४ - कार्ल सेगन, अमेरिकन अंतराळतज्ञ व इंग्लिश लेखक.
- १९४३ - जॉन शेफर्ड, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९७५ - मॅथ्यू सिंकलेर, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- इ.स. १९९३ - श्रीपाद नागनाथ राऊतवाड, मराठी युवा साहित्यिक.
मृत्यू
[संपादन]- ९४९ - कॉन्स्टन्टाईन सातवा, बायझेन्टाईन सम्राट.
- ११८७ - गाओझॉॅंग, चीनी सम्राट.
- १५०४ - फर्डिनांड दुसरा, अरागॉनचा राजा.
- १९३७ - राम्से मॅकडोनाल्ड, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९४० - नेव्हिल चेंबरलेन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९५३ - अब्दुल अझीझ अल-सौद, सौदी अरेबियाचा राजा.
- १९७० - चार्ल्स दि गॉल, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
- २००३ - बिनोद बिहारी शर्मा, मैथिली भाषेतील लेखक, कवि.
- २००५ - के. आर. नारायणन, भारतीय राष्ट्रपती.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]नोव्हेंबर ७ - नोव्हेंबर ८ - नोव्हेंबर ९ - नोव्हेंबर १० - नोव्हेंबर ११ - नोव्हेंबर महिना
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर ९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)