बापू नाडकर्णी
भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|
बापू नाडकर्णी | ||||
भारत | ||||
व्यक्तिगत माहिती | ||||
---|---|---|---|---|
जन्म | ४ एप्रिल १९३३ | |||
नाशिक, मुंबई राज्य (आता नाशिक, महाराष्ट्र, भारत),ब्रिटिश भारत (आता भारत) | ||||
मृत्यु |
१७ जानेवारी, २०२० (वय ८६) | |||
पुणे, महाराष्ट्र, भारत | ||||
विशेषता | गोलंदाज | |||
फलंदाजीची पद्धत | डावखोरा | |||
गोलंदाजीची पद्धत | डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स | |||
कारकिर्दी माहिती | ||||
{{{column१}}} | {{{column२}}} | {{{column३}}} | {{{column४}}} | |
सामने | {{{सामने१}}} | {{{सामने२}}} | {{{सामने३}}} | {{{सामने४}}} |
धावा | {{{धावा१}}} | {{{धावा२}}} | {{{धावा३}}} | {{{धावा४}}} |
फलंदाजीची सरासरी | {{{फलंदाजीची सरासरी१}}} | {{{फलंदाजीची सरासरी२}}} | {{{फलंदाजीची सरासरी३}}} | {{{फलंदाजीची सरासरी४}}} |
शतके/अर्धशतके | {{{शतके/अर्धशतके१}}} | {{{शतके/अर्धशतके२}}} | {{{शतके/अर्धशतके३}}} | {{{शतके/अर्धशतके४}}} |
सर्वोच्च धावसंख्या | {{{सर्वोच्च धावसंख्या१}}} | {{{सर्वोच्च धावसंख्या२}}} | {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} | {{{सर्वोच्च धावसंख्या४}}} |
चेंडू | {{{चेंडू१}}} | {{{चेंडू२}}} | {{{चेंडू३}}} | {{{चेंडू४}}} |
बळी | {{{बळी१}}} | {{{बळी२}}} | {{{बळी३}}} | {{{बळी४}}} |
गोलंदाजीची सरासरी | {{{गोलंदाजीची सरासरी१}}} | {{{गोलंदाजीची सरासरी२}}} | {{{गोलंदाजीची सरासरी३}}} | {{{गोलंदाजीची सरासरी४}}} |
एका डावात ५ बळी | {{{५ बळी१}}} | {{{५ बळी२}}} | {{{५ बळी३}}} | {{{५ बळी४}}} |
एका सामन्यात १० बळी | {{{१० बळी१}}} | {{{१० बळी२}}} | {{{१० बळी३}}} | {{{१० बळी४}}} |
सर्वोत्तम गोलंदाजी | {{{सर्वोत्तम गोलंदाजी१}}} | {{{सर्वोत्तम गोलंदाजी२}}} | {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} | {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}} |
झेल/यष्टीचीत | {{{झेल/यष्टीचीत१}}} | {{{झेल/यष्टीचीत२}}} | {{{झेल/यष्टीचीत३}}} | {{{झेल/यष्टीचीत४}}} |
[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]] |
रमेशचंद्र गंगाराम उर्फ बापू नाडकर्णी (एप्रिल ४ १९३३:नाशिक, महाराष्ट्र, भारत - २० जानेवारी, २०२०) येथे झाला. त्यांनी कसोटी सामन्यात पदार्पण १६ ते २१ डिसेंबर १९५५ रोजी न्यूझीलंड विरुद्ध दिल्ली येथील सामन्यात केले. शेवटचा कसोटी सामना देखील ते न्यू झीलंड विरुद्ध ७ ते १२ मार्च १९६८ला ऑकलंड येथे खेळले.
बापू नाडकर्णी हरहुन्नरी खेळडू असूनही क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झाले ते त्यांच्या गोलंदाजीच्या पराक्रमामुळे. त्यांच्या गोलंदाजीच्या अनेक कथा आणि किस्से प्रसिद्ध आहेत. बापू आपल्या गोलंदाजीत एकही वेळा चूक करीत नाहीत हिच सगळ्यात मोठी चूक ते करतात असे क्रिकेटचे पंडित म्हणत. प्रथम श्रेणी आणि कसोटी सामन्यातील त्यांची गोलंदाजीची आकडेवारी पाहिल्यावर अनेकांनी त्यांना सगळ्यात कमी धावा देणारे गोलंदाज म्हणून मानले आहे. खेळपट्टीवर एक नाणे ठेवून ओळीने ५० वेळा उडविणारे म्हणूनही बापू प्रसिद्ध आहेत. सन १९६०-६१ मध्ये पाकिस्तान विरुद्ध कानपूर येथील सामन्यात त्यांच्या गोलंदाजीचे पृथक्करण ३२ षटकात २४ निर्धाव २३ धावा ० बळी असे होते तर पुढील दिल्लीच्या सामन्याचे चित्र ३४-२४-२४-१ असे होते. इंग्लंड विरुद्ध १९६४ साली मद्रास येथे झालेल्या सामन्यातील त्यांची गोलंदाजीची आकडेवारी ३२-२७-५-० अशी होती. यातही बापूंनी २१ षटके सलगपणे निर्धाव टाकली आहेत आणि हा पराक्रम आजही त्यांच्याच नावावर आहे. त्यांनी कसोटी सामन्यात केवळ १.६७ धावा / षटक दिल्या तर प्रथम श्रेणीत १.६४ धावा / षटक आपल्या गोलंदाजीत मोजल्या.
१७ जानेवारी २०२०ला त्यांचा वयाच्या ८६व्या वर्षी मृत्यू झाला. [१]
संदर्भ
[संपादन]- ^ "Former India allrounder Bapu Nadkarni dies aged 86". ESPN Cricinfo. 17 January 2020 रोजी पाहिले.