"कोल्हापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १९१: ओळ १९१:
=== संगीत महोत्सव ===
=== संगीत महोत्सव ===
=== रंगभूमी ===
=== रंगभूमी ===
* कोल्हापूरमध्ये संगीतसूर्य [[केशवराव भोसले]] नावाचे नाट्यगृुह आहे.


=== धर्म- अध्यात्म ===
=== धर्म- अध्यात्म ===

१३:५९, १९ एप्रिल २०१६ ची आवृत्ती

हा लेख कोल्हापूर शहराविषयी आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


  ?कोल्हापूर

महाराष्ट्र • भारत
—  नगर  —
शाहू महाराजांचा राजवाडा व वस्तुसंग्रहालय
शाहू महाराजांचा राजवाडा व वस्तुसंग्रहालय
शाहू महाराजांचा राजवाडा व वस्तुसंग्रहालय
Map

१६° ४२′ ००″ N, ७४° १४′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
६६.८२ चौ. किमी
• ५६९ मी
जिल्हा कोल्हापूर जिल्हा
लोकसंख्या
घनता
३८,७६,००१ (महाराष्ट्रात ९वा) (२०११)
• ५०४/किमी
महापौर तृप्ती माळवी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 416001
• +०२३१
• MH-09
संकेतस्थळ: कोल्हापूर महानगरपालिका संकेतस्थळ


कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी आहे. येथील महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. पंचगंगा इथली प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य आदी ठिकाणे आहेत. छत्रपती शाहूमहाराजांच्या काळात म्हणजेच १८७४ ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला.

इतिहास

पौराणिक

हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथे राज्य करत होता. याने राज्यात अनाचार व सर्वाना त्रस्त करून सोडले होते. म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते आणि अश्विन शुद्ध पंचमीस महालक्ष्मीने कोल्हासूर या राक्षसाचा वध केला. त्यावेळेस कोल्हासूर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्याने तिच्याकडे आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही नावे आहेत तशीच चालू ठेवावीत असा वर मागितला. त्याप्रमाणे या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाते. ["श्री करवीर निवासिनी- वा रा धर्माधिकारी"]

महालक्ष्मी

मध्ययुगीन

इ.स.पूर्व १ ल्या शतकापासून ते इ.स.च्या ९ व्या शतकापर्यतच्या ऐतिहासिक कालखंडात कोल्हापूर येथील वसाहत आजच्या ब्रह्यपुरीच्या टेकडीवर होती. ब्रह्यपुरीच्या टेकडातील अवशेषांचे अन्वेषण व उत्खनन असे दर्शविते की, सातवाहन काळात या परिसरात समृद्ध व सुसंस्कृत लोकसमुदाय वस्ती करून रहात होता. इ.स. २२5 ते ५५०पर्यत वाकाटक, कदंब, शेद्रक व मौर्य या प्राचीन राजघराण्यांचे राज्य होते. इ.स.५५० ते ७५३ या कालखंडात बदामीच्या चालुक्य घराण्याची सत्ता येथे प्रभावी होती.

इ.स.च्या १२ व्या शतकात कोल्हापुरात शिलाहारांचे राज्य होते. इ.स.१२१0 मध्ये देवगिरीचा राजा सिंधणदेव याने कोल्हापुराच्या शिलाहार सम्राट भोजराजाचा पराभव केला. त्यानंतर देवगिरीच्या यादवांच्या एका प्रांताची राजधानी म्हणून कोल्हापूर अग्रेसर राहिले. १२९८ मध्ये देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर १३०६-१३०७मध्ये कोल्हापूर शहरात मुसलमानी सत्तेचा अंमल सुरू झाला.

मराठा साम्राज्य

देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा मुलुख स्वराज्यात समाविष्ट करेपर्यंत कोल्हापूर पारतंत्र्यातच होते. शिवाजी महाराजांनी अफझलखानच्या वधानंतर २८ नोव्हेंबर १६५९ रोजी पन्हाळा हा किल्ला घेतला आणि कोल्हापूर शिवाजीच्या राज्यात समाविष्ट झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी यांच्या काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे कोल्हापूर हे साक्षीदार आहे.

त्यापैकी काही घटना :-
१ सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा देऊन शिवरायाना कोंडीत पकडले.
२ शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे याच्या आत्मबलिदानाने ही भूमी पावन झाली आहे.
३ कोंडोजी फर्जंद आणि अण्णाजी दत्तो यांचा असामान्य पराक्रम याच भूमीत घडला.
४ दिलेरखानच्या गोटातून निसटून आलेल्या संभाजीमहाराज आणि शिवरायाच्या भावपूर्ण भेटीचा याच प्रदेशात झाली..
५ संभाजीराजास पकडणार्‍या कोल्हापूरचा ठाणेदार शेख निजामास संताजी घोरपडे यांनी याच मातीत धूळ चारली.
६ छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पत्राने निराश होऊन रागाने बहलोलखानास पकडायला गेलेल्या सरसेनापती प्रतापराव गुर्जर आणि त्यांच्या सहा सहकार्‍यांचा भीमपराक्रम याच कोल्हापूरच्या भूमीत घडला.
[१]

कोल्हापूर संस्थान

शिवछत्रपतींच्या मराठा राज्याची इसवी सन १७०७ साली दोन तुकडे झाले आणि कोल्हापूर आणि सातारा या दोन गाद्या अस्तित्वात आल्या. पैकी कोल्हापूर संस्थानच्या अधिपती ह्या महाराणी ताराराणी बनल्या. पुढे जरी संपूर्ण भारत देशाबरोबर कोल्हापूर संस्थान जरी ब्रिटिश अधिपत्याखाली आले असले तरी कोल्हापूर संस्थानच्या अधिकारांना धक्का लागला नाही. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोल्हापूर संस्थान देखील स्वतंत्र भारतात विलीन झाले.

भूगोल

कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिणेला, पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेले शहर असून ते मुंबईपासून ३७६ किमी, पुण्यापासून २३२ किमी, गोव्यापासून २२८ किमी आणि बंगलोरपासून ६६५ किमी अंतरावर आहे. कोल्हापूर सह्याद्रीच्या पश्चिम घाटमाथ्यावर असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ५६९ मी. (१८६७ फूट) इतकी आहे.

पंचगंगा नदी कोल्हापूर

हवामान

कोल्हापूरच्या हवामानात सागरी हवामान आणि जमिनीवरील हवामान यांचे मिश्रण आहे . तापमान १०°सें ते ३५° सें दरम्यान असते. शेजारील शहरांच्या तुलनेत कोल्हापूरमधील उन्हाळा तुलनेने सौम्य आहे, परंतु हवामान जास्त दमट असते. उन्हाळ्यात शहराचे कमाल तापमान हे ३८°सें असून सरासरी ३३°सें ते ३६°सें च्या दरम्यान असते.

कोल्हापूर जिल्हा हा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वसलेला असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात मुबलक पाऊस पडतो. जिल्ह्याचे पर्जन्यमान हे २० इंच ते २४० इंच इतके आहे. पावसाळ्यात शहराचे तापमान हे १९°सें ते ३०°सें च्या दरम्यान असते.

हिवाळा साधरणतः नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो . महाराष्ट्रातील इतर शहरांच्या (पुणे आणि नाशिक) मानाने कोल्हापूरचे तापमान हिवाळ्यात बरेच उबदार असते. हिवाळ्यातले येथील तापमान हे दिवसा २६°सें ते ३२°सें च्या दरम्यान असते तर रात्री ते ९°सें ते १६°सें पर्यंत खाली जाते.

Kolhapur साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
सरासरी कमाल °से (°फॅ) 31
(88)
33
(91)
36
(97)
37
(99)
33
(91)
29
(84)
27
(81)
26
(79)
28
(82)
30
(86)
29
(84)
29
(84)
30.7
(87.2)
सरासरी किमान °से (°फॅ) 15
(59)
17
(63)
20
(68)
22
(72)
22
(72)
22
(72)
22
(72)
21
(70)
21
(70)
21
(70)
17
(63)
15
(59)
19.6
(67.5)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 4.3
(0.17)
0.5
(0.02)
6.1
(0.24)
26.9
(1.06)
46.2
(1.82)
140
(5.51)
338.3
(13.32)
181.6
(7.15)
101.6
(4.00)
103.6
(4.08)
40.6
(1.60)
5.6
(0.22)
995.9
(39.21)
स्रोत: Government of Maharashtra

पाण्याची उपलब्धता

कोल्हापूर हे पंचगंगा नदीच्या किनारी वसलेले शहर असून तिचा उगम पश्चिम घाटामध्ये होतो. या नदीला भोगावती, कुंभी, कासारी, तुळशी आणि धामणी अशा पाच उपनद्या असून त्या शहर आणि आसपासच्या परिसरातून वाहतात. कोल्हापूरला तळ्यांचे शहर आहे असे म्हणतात. कोल्हापुरात पूर्वी फिरंगाई , वरुणतीर्थ, लक्षतीर्थ, कपिलतीर्थ, कुंभारतळे, महारतळे, पद्माळे, सिद्धाळा, रंकाळा, कोटीतीर्थ, रावणेश्वर तलाव अशी तळी होती. पण जसजसे शहर वाढू लागले तसे ती तळी बुजवून तिथे नागरी वस्ती झाली. यातील फक्त रंकाळा, आणि कोटीतीर्थ हे तलाव सध्या अस्तित्वात आहेत. १७९२ साली कात्यायनीहून नळ घालून शहरात पाणी आणून ते शहरातील निरनिराळया ठिकाणच्या ३२ विहिरीमध्ये सोडले गेले. १३० वर्षांपूर्वी कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी कळंबा तलाव तलाव बांधण्यात आला. कात्यायनी डोंगर परिसरातील उतारावरून ओघळणारे पावसाचे पाणी कळंबा गावाजवळ दगड मातीचा बंधारा घालून अडवण्यात आले. शहरापेक्षा उंच ठिकाणी हा तलाव असल्याने त्यातील पाणी नैसर्गिक उताराच्या साहाय्याने शहरात नळावाटे आणले.

सध्या कोल्हापूर शहराला बावडा, पुईखडी, बालिंगा, शिंगणापूर आणि कळंबा या सबस्टेशनांमधून पाणीपुरवठा केला जातो. [२]

Rankala lake panorama

उपनगरे

अर्थव्यवस्था

कोल्हापूर जिल्ह्यासहित कोल्हापूर शहराची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. ऊस हे येथील महत्त्वाचे पीक आहे साहजिकच उसावर आधारित उद्योगधंद्याना इथे महत्वाचे स्थान आहे. कोल्हापूर शहरात राजाराम सहकारी साखर कारखाना आहे. कोल्हापुरी गूळ अखिल भारतातला उत्कृष्ट गूळ समजला जातो.. कोल्हापूर हे येथील दुधासाठीही प्रसिद्ध असून गोकुळ, वारणा, शाहू, मयुर इत्यादी सहकारी दुग्धसंस्था इथे आहेत. शिवाजी उद्यमनगर, वाय.पी.पोवारनगर, पांजरपोळ या कोल्हापूर शहरात असलेल्या औद्योगिक वसाहती आहेत. फाउंड्री उद्योगात कोल्हापूरने बरीच भरारी असून लोखंडाचे सुट्टे भाग बनवणारे सुमारे ३०० कारखाने इथे आहेत

प्रशासन

नागरी प्रशासन

महापौर - अश्विनी रामाणे

उप महापौर - दिगंबर फराकटे

महानगरपालिका आयुक्त - पी. शिवशंकर

महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त - श्री. नितिन ना देसाई

जिल्हा प्रशासन

जिल्हाधिकारी -डॉ. अमित सैनी

अपर जिल्हाधिकारी - अजित पवार

निवासी उपजिल्हाधिकारी -. विक्रांत चव्हाण

जिल्हा पुरवठा अधिकारी - .विवेक आगवणे

उप विभागीय अधिकारी - .प्रशांत पाटील

तहसीलदार - .योगेश खरमाटे

निवासी नायब तहसीलदार - .रमेश शेंडगे

वाहतूक व्यवस्था

कोल्हापूर विमानतळ

कोल्हापूर शहर रस्ते, रेल्वे व हवाई मार्गांनी महाराष्ट्र व देशाच्या इतर शहरांसोबत जोडले गेले आहे. मुंबई ते चेन्नई दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ४ कोल्हापूर शहरामधून जातो. संपूर्णपणे चौपदरीकरण केलेल्या ह्या महामार्गाद्वारे पुणे, मुंबई तसेच कर्नाटकातील बेळगाव, बंगळूर इत्यादी शहरांपर्यंत जलद वाहतूक शक्य होते. अनेक राज्य महामार्ग कोल्हापूराला कोकणाशी जोडतात. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरातील प्रमुख रेल्वे स्थानक असून येथून देशाच्या अनेक मोठ्या शहरांपर्यंत रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. कोल्हापूर विमानतळ कोल्हापूर शहराच्या ९ किमी आग्नेयेस आहे.

लोकजीवन

संस्कृती

कोल्हापूरच्या संस्कृतीत येथील मराठी चित्रपटांची निर्मिती आणि येथील पहिलवानांची कुस्ती या दोनच गोष्टी प्रामुख्याने आहेत.

चित्रपट

कुस्ती

एकेकाळी कोल्हापुरात कुस्ती खेळणार्‍या पहिलवानांच्या सुमारे ३०० तालीमसंस्था होत्या. अन्य राज्यातील मल्ल येथे कुस्ती शिकायला येत, आजही येतात. मात्र आज या ३०० तालीमसंस्थांपैकी जेमतेम ६० तालमी शिल्लक राहिल्या आहेत. त्यांपैकी सुमारे ५२ तालमीच्या जागेचा उपयोग नाच-गाणी रस्सा-मंडळे, राजकीय बैठका, हळदी-कुंकू आदी कार्यक्रम चालतात. उरलेल्या आठ आखाड्यांमध्ये आजही कुस्ती जोशात चालते. ते आखाडे असे :-
१. कसबा बावडा कुस्ती केंद्र
२. खासबाग
३. नवी मोतीबाग तालीम
४. पंत बावडेकर आखाडा
५. मोतीबाग तालीम
६. शाहू आखाडा, चंबूखडी
७. शाहू आखाडा, मार्केट यार्ड
८. शाहूपुरी आखाडा
९. शाहू विजयी गंगावेस

खाद्यसंस्कृती

कोल्हापूरची मिसळ आणि मटणाचा तांबडा-पांढरा मटणाचा रस्‍सा हे दोन खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत. कोल्हापूरचा पिवळा धम्मक गूळ आणि मसाले कुटणारे डंख हेही कोल्हापूरचे वैशिष्ट्य.

अन्य

कोल्हापूरची शुद्ध चामड्याची चप्पल तिच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारासाठी आणि टिकाऊपणासाठी जगप्रसिद्ध आहे. ही चप्पल बनवताना खिळे वापरले जात नाहीत.

संगीत महोत्सव

रंगभूमी

धर्म- अध्यात्म

  • कोल्हापूरचे महालक्ष्मीचे मंदिर महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. बाहेरगावचा मराठी माणूस कोल्हापूरला आला आणि मंदिरात गेला नाही असे सहसा होत नाही. मंदिरात इतके खांब आहेत की सामान्य माणूस ते मोजू शकत नाही, असा भाविकांचा समज आहे.

प्रेक्षणीय स्थळे

  1. रंकाळा तलाव
  2. पन्हाळगड
  3. महालक्ष्मी मंदिर
  4. भवानी मंडप :छोटे वस्तुसंग्रहालय
  5. ज्योतिबा मंदिर
  6. न्यू पॅलेस : शाहू महाराजांचा राजवाडा व वस्तुसंग्रहालय
  7. टाउन हॉल : छोटे वस्तुसंग्रहालय
  8. दाजीपूर : अभयारण्य
  9. गगनबावडा : हिरवीगार झाडी आणि एक छान धबधबा
रंकाळा तलाव, शालिनी महालाजवळून पाहता

साचा:विश्वकोशीय परिच्छेद हवा

मनोरंजन

  • केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर.

चित्रपटगृहे

  • अयोध्या

अयोध्या चित्रपटगृहाचे पूर्वीचे नाव राजाराम.. याचे बांधकाम छत्रपती राजाराम महाराजांच्या सूचनेनुसार श्री. भोजराज दादासाहेब निंबाळकर यांनी १९३७ साली केले. त्याचे नामकरण १२ एप्रिल १९८६ साली अयोध्या असे करण्यात आले. सध्या या चित्रपटगृहाची क्षमता, बाल्कनी २५४, स्टॉल ३९४ आणि फर्स्ट १०० अशी एकूण ७४८ आहे. येथील ध्वनियंत्रणा ही अत्याधुनिक डॉल्बी तंत्रज्ञानाने युक्त अशी आहे.

  • ऊर्मिला

ऊर्मिला चित्रपटगृहाचे पूर्वीचे नाव लक्ष्मी. आणि त्याच्याच शेजारी सरस्वती हे चित्रपटगृह. कोल्हापुरातील ताराबाई रोडवर असणारी ही दोन चित्रपटगृहे. ऊर्मिला अर्थात जुन्या लक्ष्मी सिनेगृहाचे बांधकाम नाना बेरी यांनी केले. याचे पूर्वीचे मालक श्री नितीन रेड्डी. त्यांच्याकडून १९९९ साली ’अयोध्या’ चित्रपटगृहाचे मालक दादासाहेब निंबाळकर यांनी ते विकत घेतले आणि त्या नाव ऊर्मिला केले. ऊर्मिला आणि सरस्वती ह्या चित्रपटगृहांचा बाहेर जाण्याचा रस्ता एकच आहे.

  • सरस्वती
  • व्हीनस

६ जून १९३१ साली तय्यब अली बोहरा यांनी याचे बांधकाम केले. कोल्हापुरात बांधले गेलेले हे पहिलेच चित्रपटगृह. ह्याच तय्यब अली यांनी व्हीनसच्याच शेजारी अप्सरा हेही सिनेगृह बांधले. आजतागायत दोन्ही चित्रपटगृहांची मालकी बोहरा कुटुंबीयांकडेच आहे. व्हीनसमध्ये ७८३ प्रेक्षक आरामात चित्रपट पाहू शकतात. जिथे व्हीनस उभे आहे तिथे पूर्वी दलदलीची जागा होती. आणि आजही जेव्हा पंचगंगा नदीला जोरदार पूर येतो तेव्हा इथे जाणारा मार्ग बंद पडतो. गेले ५ वर्षे येथे केवळ दक्षिणी भारतीय भाषांतील चित्रपट प्रदर्शित केले जातात. "आर्या" हा इथे आलेला पहिला तेलुगू सिनेमा. ह्या सिनेमाने या चित्रपटगृहात सिल्व्हर ज्युबिली करण्याइतके यश मिळवले. कोल्हापुरात २५ आठवडे चाललेला हा एकमेव तेलुगू सिनेमा. कोल्हापुरात राहणार्‍या दाक्षिणात्य भारतीय लोकांना तिकडचे सिनेमे पाहण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजेच व्हीनस.

  • अप्सरा

. कोल्हापुरात लक्ष्मीपुरीत शेजारी शेजारी ५ चित्रपटगृहे आहेत आणि स्टेशन रोड वर ५. त्यातीलच एक "अप्सरा".. अप्सरा आणि व्हीनस ह्या दोन्हीचे मालक एकच. श्री. तय्यब अली बोहरा. १९४८ च्या सुमारास हे चित्रपटगृह बांधले गेले. याचे पूर्वीचे नाव होते अन्वर. कारण तय्यबअलींच्या तिसर्‍या मुलाचे नाव होते अन्वर. नंतर याचे नाव झाले लिबर्टी आणि आता याचे नाव आहे अप्सरा..अप्सराची प्रेक्षकक्षमता आहे ६७३.

  • उषा

१४ जानेवारी १९४७ रोजी नगीनदास शहा यांनी हे चित्रपटगृह सुरू केले. नागीनदास यांच्या दुसर्‍या मुलीच्या नावानेच (उषा) हे चित्रपटगृह ओळखले जाते. सर्वाधिक हिट चित्रपट देणार्‍या कोल्हापुरातील काही मोजक्या चित्रपटगृहापैकी एक म्हणजे उषा. "हम आपके है कौन" इथे ६० आठवड्याहून अधिक चालला. इथे लागलेले काही सुपरहिट चित्रपट म्हणजे.. लावारीस, बर्निंग ट्रेन, शोले, लगान, सत्या, तेजाब इत्यादी. या चित्रपटगृहाची प्रेक्षकक्षमता आहे ७८६.

  • प्रभात

लक्ष्मीपुरीत असणार्‍या ५ चित्रपटगृहापैकी एक म्हणजे प्रभात. दादासाहेब रुईकर यांनी १९४० साली प्रभात बांधले. याचे प्रेक्षकक्षमता आहे ५३१. २००३ साली प्रभातचे नूतनीकरण झाले. चित्रपटगृह संपूर्णपणे वातानुकूलित करण्यात आले. पारंपरिक फर्स्ट, स्टॉल आणि बाल्कनी अशी आसनव्यवस्था बदलून फर्स्ट, स्टॉल, ड्रेस सर्कल आणि बाल्कनी अशी करण्यात आली. मराठीचे सुपरस्टार दादा कोंडके यांचे ७ सिल्वर ज्युबिली चित्रपट रुईकर यांच्या प्रभात आणि रॉयल मध्येच लागले.

  • रॉयल

दादासाहेब रुईकर यांचे आणखी एक चित्रपटगृह म्हणजे रॉयल. प्रभातच्या पाठीमागच्या बाजूला वसलेले हे चित्रपटगृह. रॉयलचा बाहेर जायचा मार्ग प्रभातमधूनच आहे. रॉयलची आसनक्षमता ५१३ आहे. याची बांधकाम १९३० चे आहे. २००५ साली या चित्रपटगृहाचे नूतनीकरण करण्यात आले.

  • शाहू

कोल्हापुरातील मराठी चित्रपटांचे माहेरघर म्हणजे शाहू. गेली कित्येक वर्षाची मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याची परंपरा आजही तेवढ्याच दिमाखात सुरू आहे. १५ मे १९४७ साली या चित्रपटगृहाचे ओपनिंग झाले. शाहू महाराज व्हीनसमध्ये चित्रपट पाहायला जात असत. पण काहीतरी कारणाने खटका उडाला आणि महाराजांनी स्वतःचे एक चित्रपटगृह बांधले. आणि त्यांच्याच नावावरून याला शाहू नाव पडले.

  • पद्मा

कोल्हापूरच्या राजकुमारी पद्माराजे यांच्यावरून ह्या चित्रपटगृहाचे नाव " पद्मा" असे पडले. १९४० साली श्री. इंगळे यांनी या चित्रपटगृहाची उभारणी केली. फर्स्ट, स्टॉल, एक्झिक्युटीव आणि बाल्कनी अशी आसनव्यवस्था इथे आहे. इथे एकूण ६९६ प्रेक्षक चित्रपट पाहू शकतात. इथे सॅटेलाईट प्रोजेक्टर आहे.

  • पार्वती (मल्टिप्लेक्स) - तीन पडदे असलेले गांधीनगरातील चित्रपटगृह
(गणेशसह) 
  • संगम

[३]

पुतळे

शहरात शिवाजी, संभाजी, शाहू हे महाराज आणि अनेक नामवंत व्यक्तींचे पुतळे जागोजागी उभे करण्यात आले आहेत. त्यांतील काही महत्त्वाचे पुतळे :

  • अल्लादिया खाँसाहेब पुतळा
  • आईचा पुतळा
  • आईसाहेब महाराज पुतळा
  • आबालाल रहेमान पुतळा
  • आंबेडकर पुतळा (महानगरपालिका परिसर)
  • आंबेडकर पुतळा (बिंदू चौक)
  • वि. स. खांडेकर पुतळा
  • जिजाबाई पुतळा (के.एम.सी. कॉलेज)
  • महात्मा गांधी पुतळा (पापाची तिकटी)
  • महात्मा गांधी पुतळा (साइक्स बिल्डिंग)
  • चिमासाहेब महाराज पुतळा
  • ताराराणी पुतळा
  • ताराराणी पुतळा (ताराराणी विद्यापीठ)
  • महात्मा फुले पुतळा (बिंदू चौक)
  • कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा, (एस. टी. स्टँड; शिवाजी विद्यापीठ)
  • बाबूराव पेंटर पुतळा (पद्मा गार्डन)
  • राजाराम महाराज पुतळा
  • शाहू महाराज पुतळा (दसरा चौक)
  • शाहू पुतळा (मार्केट यार्ड)
  • शिवाजी महाराज अर्धपुतळा
  • शिवाजी महाराज पुतळा (शिवाजी चौक)
  • शिवाजी महाराज पुतळा (शिवाजी विद्यापीठ),
  • प्रिन्स शिवाजी पुतळा
  • संभाजीमहाराज पुतळा, वगैरे.

खरेदी

कोल्हापुरी चपला
कोल्हापुरी मिरची

परिवहन

ऑटोरिक्षा आणि महानगरपालिकेच्या बसेस
लोहमार्गाने मुंबई, नागपूर, तिरुपती आणि बंगळूरकडे जाणार्‍या गाड्या दररोज आहेत.

हवामान

कोल्हापूरचे हवामान किनारपट्टी आणि देशावरील हवामानांचा संयोग आहे. वर्षभरातील तापमान १२°से. ते ३५°से. या दरम्यान असते.कोल्हापुरातील उन्हाळा शेजारच्या इतर शहरांच्या तुलनेत थंड पण जास्त दमट असतो. उन्हाळ्यातील कमाल तापमान सहसा ३८° से.च्या वर जात नाही. किमान तापमान २४° से. ते २६° से. पर्यंत असते. तापमान कमी असूनही आर्द्रतेमुळे हवा दमट आणि चिकट असते. कोल्हापूर पश्चिम घाटाजवळ असल्याने जून ते सप्टेंबर च्या दरम्यान भरपूर पाऊस पडतो. यामुळे शहराच्या सखल भागात काही दिवस पाणी शिरून पूर येतो. पावसाळ्यात तापमान २३° से. ते ३०° से. च्या दरम्यान असते. कोल्हापुरातील हिवाळा कडाक्याचा नसतो. किमान तापमान १४° से. ते १६° से. तर कमाल तापमान २९° से. ते ३२° से. पर्यंत असते. याकाळात दमटपणा कमी असल्याने हवामान उल्हासदायी असते.

कोल्हापूर साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
सरासरी कमाल °से (°फॅ) 31
(88)
33
(91)
36
(97)
37
(99)
33
(91)
29
(84)
27
(81)
26
(79)
28
(82)
30
(86)
29
(84)
29
(84)
30.7
(87.2)
सरासरी किमान °से (°फॅ) 15
(59)
17
(63)
20
(68)
22
(72)
22
(72)
22
(72)
22
(72)
21
(70)
21
(70)
21
(70)
17
(63)
15
(59)
19.6
(67.5)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 4.3
(0.17)
0.5
(0.02)
6.1
(0.24)
26.9
(1.06)
46.2
(1.82)
140
(5.51)
338.3
(13.32)
181.6
(7.15)
101.6
(4.00)
103.6
(4.08)
40.6
(1.60)
5.6
(0.22)
995.9
(39.21)
स्रोत: Government of Maharashtra

उद्योग

१. घाटगे पाटील उद्योग समूह
२. स्टार उद्योग समूह
३. मेनन उद्योग समूह
४. पॉप्युलर शेती अवजारे

  • गोकुळ दूध संघ
  • वारणा दूध संघ
  • मनुग्राफ इंडस्ट्रीज लिमिटेड, शिरोली एम.आय.डी.सी.
  • मेनन अ‍ँड मेनन,विक्रमनगर
  • मेनन पिस्टन लिमिटेड, शिरोली एम.आय.डी.सी.
  • कोल्हापूर स्टील लिमिटेड, शिरोली एम.आय.डी.सी.
  • श्रीराम फौंड्री,शिरोली एम.आय.डी.सी.
  • बुधले अ‍ँड बुधले लिमिटेड, कुलकर्णी पॉवर टूल्स्, शिरोळ
  • महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस, www.caroldpart.com.
  • अॅटो रिलाईरिसायकलींगकंपनी,www.autorelife.com

साखर कारखाने

१. श्री राजाराम शुगर मिल्स्, कसबा बावडा, कोल्हापूर
२. श्री तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना, वारणानगर, कोल्हापूर
३. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, शिरोळ, कोल्हापूर
४. श्री कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना, कुडित्रे, कोल्हापूर
५.श्री गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना हरळी,कोल्हापूर
६.श्री छत्रपती शाहु सहकारी साखर कारखाना कागल
७.श्री शरद सहकारी साखर कारखाना नरन्दे
८.श्री डी.वाय.पाटील सहकारी साखर कारखाना, गगनबावडा
९.श्री सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना, हमीदवाडा
१०.श्री कल्लाप्पाण्णा आवाडे सहकारी साखर कारखाना, हुपरी
११.श्री उदयसिंह गायकवाड सहकारी साखर कारखाना, बाबवडे
१२.श्री पचगगा सहकारी साखर कारखाना,इचलकरजी
१३.श्री बिद्री सहकारी साखर कारखाना, बिद्री
१४.श्री दत्त सहकारी साखर कारखाना, आसुर्ले पोर्ले
१५.श्री गुरुदत्त सहकारी साखर कारखाना, सैनिक टाकळी
१६.श्री हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना, आजरा
१७.श्री दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना, हलकर्णी चंदगड
१८. इंदिरा गांधी भारतीय महिला सहकारी साखर कारखाना, तांबाळे, भुदरगड

प्रसिद्ध व्यक्ती

विश्वास नांगरे पाटील

छायाचित्र


पहा

कोल्हापुरातील पुतळे

बाह्य दुवे