सुरेश वाडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुरेश वाडकर
Suresh Wadkar 2008 - still 29248 crop.jpg
सुरेश वाडकर
आयुष्य
जन्म ७ ऑगस्ट, इ.स. १९५४
जन्म स्थान कोल्हापूर, महाराष्ट्र
पारिवारिक माहिती
अपत्ये अनन्या, जिया
संगीत साधना
गायन प्रकार पार्श्वगायक, हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत
संगीत कारकीर्द
कारकिर्दीचा काळ इ.स. १९७६ - चालू
गौरव
पुरस्कार मदन मोहन पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार, रजत कमल ५८ वा राष्‍ट्रीय फि‍ल्‍म पुरस्‍कार

सुरेश ईश्वर वाडकर (ऑगस्ट ७, इ.स. १९५५ :कोल्हापूर, महाराष्ट्र - हयात) हे एक मराठी गायक आहेत. त्यांनी याने प्रामुख्याने मराठी, आणिहिंदी चित्रपटांमधून पार्श्वगायन केले आहे. याखेरीज त्यांनी काही भोजपुरी, कोकणी, मल्याळी, गुजराती, बंगाली, सिंधी चित्रपटांतूनही आणि उर्दू भाषेतूनही गाणी गायली आहेत. ते भावगीते, भक्ती गीते आणि अन्य सुगम संगीतही गातात.

जीवन[संपादन]

सुरेश वाडकर याचा जन्म ७ ऑगस्ट, इ.स. १९५५ रोजी कोल्हापूर येथील चिखली गावी झाला.

  वयाच्या आठव्या वर्षापासून त्याने जियालाल वसंत यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली.

सांगीतिक कारकीर्द[संपादन]

इ.स. १९७६ साली सूर-सिंगार नावाच्यासंगीत स्पर्धेत सुरेश वाडकरांनी भाग घेतला. त्‍यामधील स्पर्धकांची कामगिरी पारखायला हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार जयदेव, रविन्द्र जैन्, ह्रुदयनाथ मन्गेशकर इत्यादी नामवंत परीक्षक होते. सुरेश वाडकर या स्पर्धेत विजेते ठरले. त्यानंतरन जयदेवांनी चाली बांधलेल्या गमन (इ.स. १९७८) या हिंदी चित्रपटातील सीनेमें जलन हे गाणे वाडकर यांना गायला मिळाले.

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची परंपरा टिकावी यासाठी सुरेश वाडकर यांनी आजीवासन गुरुकुलम नावाची संस्था सुरू केली. संगीत स्पर्धांमध्ये सुरेश वाडकर अनेकदा परीक्षक असतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

पुरस्कार[संपादन]

सुरेश वाडकर यांना त्यांच्या संगीतसेवेसाठी सुमारे ११ पुरस्कार मिळाले आहेत. त्यांपैकी काही हे :-

  • चित्रपट संगीतात लक्षणीय कामिगिरी करणाऱ्या पार्श्वगायकास अखिल भारतीय नाट्य परिषद (पिंपरी चिंचवड शाखा), कलारंग प्रतिष्ठान व सिद्धिविनायक ग्रुप यांच्या वतीने दिला जाणारा आशा भोसले पुरस्कार (२०१३).
  • दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (जुलै २०१९)
  • पद्मश्री पुरस्कार (२०२०)[१]

बाह्य दुवे[संपादन]


  1. ^ https://padmaawards.gov.in/PDFS/2020AwardeesList.pdf