राधानगरी अभयारण्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दाजीपूर अभयारण्य या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
राधानगरी अभयारण्य
आययुसीएन वर्ग ४ (अधिवास/प्रजाती व्यवस्थापन क्षेत्र)
राधानगरी अभयारण्यचे ठिकाण दाखविणारा नकाशा
राधानगरी अभयारण्यचे ठिकाण दाखविणारा नकाशा
राधानगरी अभयारण्य
ठिकाण कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे शहर कोल्हापूर ४६ किलोमीटर (२९ मैल) उपू
गुणक 16°23.09′0″N 73°57.32′0″E / 16.384833°N 73.955333°E / 16.384833; 73.955333
क्षेत्रफळ ३५१.१६ चौरस किमी (१३५.५८ चौ. मैल)
स्थापना १९५८
अभ्यागत १७,५५७ (२०००-२००१ साली)
नियामक मंडळ महाराष्ट्र वन विभाग


राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोल्हापुर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील अभयारण्य आहे. हे अभयारण्य पश्चिम घाटामध्ये सह्याद्री पर्वतरांगांच्या दक्षिण टोकाला आहे. राधानगरी अभयारण्य रानगव्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य आहे. याची स्थापना १९५८ साली करण्यात आली आणि त्यावेळी याला दाजीपूर अभयारण्य असे नाव देण्यात आले होते. या अभयारण्यात एकूण ३५ प्रकारच्या वन्यप्राण्यांची व २३५ प्रकारच्या पक्षी प्रजातींची नोंद झालेली आहे. या जंगलात १८०० प्रकारच्या वनस्पतीही आढळतात. त्यापैकी १५०० पेक्षा जास्त फ़ुलझाडांच्या प्रजाती आहेत तर ३०० औषधी वनस्पती आहेत.

युनेस्कोने २०१२मध्ये राधानगरी अभयारण्याचा जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे.

प्राणी[संपादन]

या जंगलात दुर्मीळ होत चाललेले पट्टेरी वाघ, पश्चिम घाटात दुर्मीळ झालेले लहान हरीण, गेळा (पिसोरी) आढळतात. तसेच बिबळ्या, गवा, सांबर, भेकर, डुक्कर, रानकुत्रा, अस्वल, शेकरु, रानमांजर, उदमांजर, ससा, लंगूर, याचबरोबर वटवाघळाच्या तीन जाती आढळतात.

वनस्पती[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.