कोल्हापुरी साज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोल्हापुरी साज

कोल्हापुरी साज हा दागिना असून तो लाखेपासून बनवला जातो. लाखेवर सोन्याचा पत्रा मढवलेला असतो. कोल्हापुरी साजमध्ये 'जाव मणी' आणि 'पानड्या' (वेगवेगळ्या आकाराची पाने) सोन्याच्या तारेने गुंफलेली असतात. कोल्हापूरकडच्या लोकांनी हा साज मोठया प्रमाणात वापरून त्याचे नामकरण ‘कोल्हापुरी साज’ असे केले. या साजात मासा, कमळ, कारले, चंद्र, बेलपान, शंख, नाग, कासव, भुंगा अशा शुभ आकारांचे सोन्याच्या घन पत्राचे मुशीतून काढलेले लाख भरलेले भरीव आकार आणि एक सोडून एक मणी ओवलेले असतात. मध्यभागी लोलक असते त्यास पानडी असेही म्हणतात. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे त्यात काळे मणी घातले जाऊ लागले. नजर लागू नये म्हणून हे मणी वापरण्याची प्रथा आहे. हा गळ्याभोवतीच पण जरा सलसर बसतो आणि यात चंद्र, कमळ, मासा पूर्वी हा फक्त सवाष्ण बायकाच घालीत, पण आता सरसकट वापरात आढळतो. [१] ते त्याच्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहे. हा दागिना ६० वर्ष पासून प्रसिद्ध आहे.

बनावट[संपादन]

महाराष्ट्रीयन स्त्रियांमध्ये कोल्हापूरी साज हा एक खास नेकलेसचा प्रकार अतिशय लोकप्रिय आहे. हा साज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बनवला जातो पण ह्यांमध्ये कोल्हापूरी साज प्रसिद्ध आहे.कोल्हापुरी साज हा मराठी स्त्रियांमध्ये फार प्रचलित असलेला दागिना आहे. हा दागिना स्त्रिया मंगळसूत्राऐवजी परिधान करतात. या आभूषणामध्ये २१ लोंबते डूल असून त्यांपैकी १० डूल हे भगवान विष्णूचे अवतार, ८ डुलांचे एक अष्टमंडल, १ डूल माणकाचा, एक पाचूचा आणि एक डूल म्हणजे "डोरला" म्हणजे तावीज असतो. तो लाल किंवा गुलाबी रंगाचे असते.

संदर्भ[संपादन]

http://jewellery-indiaa.blogspot.in/2013/02/maharashtrian-wedding-bridal-jewelry.html

  1. ^ "गळ्यातली पारंपरिक आभूषणं". prahaar.in (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-08-27. 2018-03-18 रोजी पाहिले.