चर्चा:कोल्हापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

समसमीक्षण[संपादन]

Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची/मजकुराची विश्वकोशिय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयते बाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकुर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधीत पान/विभाग/मजकुर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
स्रोत शोधा: "कोल्हापूर" – बातमी, वृत्तपत्रे, पुस्तके, गुगल स्कॉलर, हायबीम, जेस्टोर संशोधन लेखांचा संग्रह, मुक्तस्त्रोत चित्रे, मुक्तस्त्रोत बातम्या, विकिपीडीया ग्रंथालय, न्यु योर्क टाईम्स, विकिपीडिया संदर्भ शोध
या लेखातील काही विभागात कमर्शियल एस्टाब्लिशमेंटची नोंद घेण्यात आली आहे उद्देश निश्चितपणे जाहीरातीचे नाहीत अथवा हितसंघर्षाचाही मुद्दा नाही पण दोन प्रश्न आहेत एक तर विश्वकोशियतेच्या संदर्भाने एकतर हा लेख केवळ कमशियल एस्टाब्लिशमेंटस नोंद घेणारे पान होऊ नये एवढेमोठे सांस्कृतीक ऐतिहासिक धार्मिक आर्थिक वैभवाची देणगी असलेल्या शरा बद्दल सुयोग्य विश्वकोशिय लेखनाचा अभाव असुन केवळ कमशियल एस्टाब्लिशमेट्सची नोंद घेण्याचे पान होत चालले तर विचीत्र वाटेल .
दुसरे असे कि कमर्शियल एस्टाब्लिशमेंट्सच्या नोंदी घेतल्यामुळे नवागत हितसंबधी व्यक्ती आणि जाहीरातोत्सुक व्यक्तींना प्रोत्साहन दिल्यासारखेतर होणार नाहीना असा प्रश्न उपस्थित होतो विश्वकोशीय उल्लेखनीयता अंगाने या संदर्भाने मराठी विकिपीडियास अधीक चर्चेची गरज आहेमाहितगार ०६:०७, १८ ऑगस्ट २०१० (UTC)

येथे विश्वकोशीय माहिती भरणे अपेक्षित आहे[संपादन]

या लेखात स्वाद या विभागात व अन्य ठिकाणी भरलेली माहिती पाहिली. 'आईसक्रीम-पेरिना,सोळंकी कोल्ड्रिंक हाऊस, पद्मा लॉज, ओपल, परख, रसिका गार्डन, हॉटेल शेतकरी' ही नावे सध्या प्रसिद्ध आहेत, हे कबूल, पण नंतर या विक्रेत्यांची/दुकानांची नावे बदलली तर? किंवा या नावांपेक्षा अन्य नावे पुढे आली तर? सांगायचा मुद्दा हा की, प्रसिद्ध दुकानांची नावे ही नित्य बदलत जाणारी गोष्ट आहे. अश्या गोष्टी विश्वकोशात मांडताना त्यांच्या अशाश्वत स्वरूपाचा विचार जरूर करावा.

शिवाय अशी नावे विश्वकोशात नोंदवण्याचा अजून एक तोटा असतो : काही नावे दिसली, की मग अन्य नावे का नकोत अशी विरुद्ध पार्ट्यांच्या मनात तक्रार उद्भवून त्यांच्याकडून त्या लेखात प्रतिस्पर्धी नावांची जंत्री जोडण्याचे, जाहिरातबाजी चालू करण्याचे प्रकार संभवतात. म्हणून लेखात शक्यतो जाहिरातबाजी नसणारी, शाश्वत अश्या स्वरूपाचीच माहिती भरावी ही विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १०:३९, १८ ऑगस्ट २०१० (UTC)

प्रसिध्द दुकाने - संघटना =[संपादन]

श्री. संकल्प द्रविड यांचा मुद्दा पटतो, पण काही ठिकाणं ही तिथील दुकानांन मुळेच किंवा तेथील उत्पादनान मुळेच प्रसिध्द असतात, उदाहरण द्यायचे तर लोणावळ्याची मंगतराम ची चिकी, किंवा बडोद्याची जग्दीश ची बाकरवडी वगैरे. माझे सुचवणे असे आहे की, एखाद्या प्रसिध्द दुकानाचे किंवा संघटणेचे नाव देताना टाईम स्टँम्प द्यावा म्हणजे वाचणार्याला कळेल की अमुक अमुक साली तिथे अमुक् अमुक् प्रसिध्द दुकान होते. पण जाहीरात् टाळाव्यात ह्यावर दुमत नाही !

आपला,
(विचारी) विशुभाऊ रणदिवे ११:१९, १८ ऑगस्ट २०१० (UTC)

दयनीय[संपादन]

कोल्हापूर सारख्या महत्वपूर्ण शहराबद्दलचा लेख अजूनही दयनीय अवस्थेत आहे, अगदी काही खेडे गावांबद्दलचे लेख मराठी विकिपीडियात चांगल्या स्थितीत आढळतात.नागपूर, नाशिक, मुंबई, पुणे औरंगाबाद असे कितीतरी शहर विषयक चांगले लेख मराठी विकिपीडियावर आहेत. लेख कसा नसावा याचे उदाहरण म्हणून मी या लेखातच सूचना लिहिल्यात पण त्याबद्दल आक्षेप नोंदवण्याचेही कष्ट कुणी घेत नाही. अखेर बिच्चारे कोल्हापूर !तेथे ज्या जिल्ह्यातून खूप सारे चांगले विकिपीडियन मिळावयास हवे तेथे शहराबद्दलचाही लेख लिहून होत नाही काळजी कोल्हापूर पेक्षा मराठी भाषेच्या भवीष्याबद्दल अधीक वाटते. माहितगार १९:५६, २४ मे २०११ (UTC)

कॉपीपेस्ट मजकूर वगळत आहे[संपादन]

या लेखात आज या संपादनाद्वारे जो मजकूर भरला गेला आहे, तो ब्लॉग.ज्ञानदीप.कॉम येथे ८ ऑक्टोबर, इ.स. २००७ रोजी प्रकाशित झाला आहे. हा मजकूर सार्वजनिक वापरासाठी प्रताधिकारमुक्त असल्याची नोंद तेथे कुठेही आढळत नाही; त्यामुळे हा मजकूर प्रताधिकारित असावा असे वाटते.

जोपर्यंत हा मजकूर प्रताधिकारमुक्त आहे, हे सिद्ध होत नाही, तोवर असा मजकूर मुख्य लेखात असू नये. म्हणून मी तो सध्या वगळत आहे.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) २०:३३, ६ फेब्रुवारी २०१२ (IST)


लोकसंख्या?[संपादन]

कोल्हापूरची लोकसंख्या तीन कोटीहून अधिक आहे ?...J (चर्चा) १०:१२, २ मे २०१४ (IST)

अबालाल रहेमान[संपादन]

कलानिरमीती Harshad kulkarni kolhapur art gallery (चर्चा) १२:२७, २८ मे २०१८ (IST)