ऑगस्ट ७
Appearance
(ऑगस्ट ०७ या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | ऑगस्ट २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑगस्ट ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१८ वा किंवा लीप वर्षात २१९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]अठरावे शतक
[संपादन]- १७९४ - व्हिस्की क्रांती - अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील शेतकऱ्यांनी व्हिस्की व अन्य गाळीव मद्यावरील कराविरुद्ध आंदोलन सुरू केले.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८१९ - बॉयाकाची लढाई - सिमोन बॉलिव्हारच्या सैन्याने स्पेनच्या सैन्याचा पाडाव केला.
- १८८८ - लंडनमध्ये जॅक द रिपरने पहिला खून केला.
विसावे शतक
[संपादन]- १९४२ - दुसरे महायुद्ध - ग्वादालकॅनालची लढाई सुरू.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने जपानच्या हिरोशिमा शहरावरील परमाणुबॉम्ब हल्ला सफल झाल्याचे जाहीर केले.
- १९४७ - थॉर हायरडाल व त्याच्या चमूने बाल्सा लाकडाच्या तराफ्यातून १०१ दिवसात पॅसिफिक समुद्र पार केला.
- १९४७ - मुंबई महापालिकेने बेस्ट कंपनी आपल्या अधिकारात घेतली.
- १९६० - कोट दि आयव्होरला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९६४ - व्हियेतनाम युद्ध - अमेरिकन काँग्रेसने टोंकिनच्या अखातातील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सनला सर्वाधिकार दिले.
- १९६५ - सिंगापुरची मलेशियामधून हकालपट्टी.
- १९६७ - व्हियेतनाम युद्ध - चीनने उत्तर व्हियेतनामला मदत करण्याचे जाहीर केले.
- १९७६ - व्हायकिंग २ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत आले.
- १९९१ - सामान्य माणसांना वर्ल्ड वाइड वेब उपलब्ध.
- १९९७ - फाइन एर फ्लाइट १०१ हे मालवाहू विमान फ्लोरिडातील मायामी शहरात कोसळले. ५ ठार.
- १९९८ - टांझानिया व केन्यामधील अमेरिकन वकिलातींवर दहशतवाद्यांचा बॉम्बहल्ला. २२४ ठार, ४,५०० जखमी.
एकविसावे शतक
[संपादन]- २०१७ - भारताच्या गोरखपूर शहरातील बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न इस्पितळाने ३३ लाख रुपयांचे थकित न भरल्याने प्राणवायू पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराने सेवा रोखली. ७-१३ ऑगस्ट दरम्यान ७२ लहान मुलांचा मृत्यू.
जन्म
[संपादन]- ३१७ - कॉन्स्टेन्टियस दुसरा, रोमन सम्राट.
- १८१६ - माटा हारी, डच गुप्तहेर.
- १९२५ - एम.एस. स्वामीनाथन, भारतीय शेतीतज्ञ.
- १९३७ - डॉन विल्सन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४० - ज्यॉॅं-लुक डेहेन, बेल्जियमचा पंतप्रधान.
- १९४८ - ग्रेग चॅपल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू व मार्गदर्शक.
- १९५९ - अली शाह, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६६ - जिमी वेल्स, विकिपिडीयाचा स्थापक.
- १९७१ - डॉमिनिक कॉर्क, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- ४६१ - माजोरियन, रोमन सम्राट.
- ४७९ - युराकु, जपानी सम्राट.
- ११०६ - हेन्री चौथा, पवित्र रोमन सम्राट.
- १८५५ - मेरियानो अरिस्ता, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४१ - रवींद्रनाथ टागोर, बंगाली कवी, लेखक, नोबेल पारितोषिक विजेता.
- १९७३ - जॅक ग्रेगरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- २००४ - रेड अडेर, अमेरिकेचा अग्निशमनतज्ञ.
- २००५ - पीटर जेनिंग्स, अमेरिकेचा वार्ताहर.
- २०१८ - एम. करुणानिधी, भारतीय राजकारणी व तमिळनाडूचे ३रे मुख्यमंत्री.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- स्वातंत्र्य दिन - कोट दि आयव्होर.
- मुक्ती दिन - टर्क्स व कैकोस द्वीप.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट ७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट ५ - ऑगस्ट ६ - ऑगस्ट ७ - ऑगस्ट ८ - ऑगस्ट ९ - ऑगस्ट महिना