एम.एस. स्वामीनाथन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एम.एस. स्वामिनाथन

डॉ. एम.एस. स्वामिनाथन (जन्म : कुंभकोणम, ७ ऑगस्ट, इ.स. १९२५ - ) हे भारतातील कृषी शास्त्रज्ञ आहेत. भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी कृषि क्षेत्रातील संशोधनासाठी 'एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन'ची स्थापना केलेली आहे. भारत सरकारने डॉ. मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीनाथन आयोगाची स्थापन केला.

बालपण[संपादन]

मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांचा जन्म तमिळमाडूमध्ये कुंभकोणम येथे झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते. ते गांधीवादी व स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या विचारांचा स्वामीनाथनांवर चांगला परिणाम झाला. वडिलांप्रमाणे तेही डॉक्टरी शिक्षणाकडे वळले. पण १९४३मधील बंगालच्या दुष्काळामुळे त्यांनी ते शिक्षण अर्धवट सोडून दिले आणि ते शेतकी विषयाचे शिक्षण घेऊ लागले. केरळ्मधील महाराजस कॉलेजातून त्यांनी कृषिक्षेत्रातली पदवी घेतली.

कारकीर्द[संपादन]

कृषिक्षेत्रात काम करावयाचे नक्की झाल्यावर स्वामीनाथन यांनी मद्रास कृषि महाविद्यालयातून आणखी एक पदवी घेतली. १९४७ साली ते दिल्लीच्या इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी रवाना झाले. १९४९मध्ये विशेष प्रावीण्यासह त्यांनी ती पदवी प्राप्‍त केली. युनियन पब्लिक सर्व्हिसची परीक्षा देऊन ते भारतीय पोलीस सेवेसाठी पात्र ठरले, मात्र त्यांनी पोलीस ऑफिसर न होता कृषी क्षेत्रात संशोधन करायचे ठरवले. नेदरलॅंडमध्ये बटाटाच्या अनुवांशिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीतून त्यांनी १९५२मध्ये पी‍एच.डी. केले आणि परदेशांत विविध संधी असतानाही ते भारतात परतले. जगभरांतील कृषी विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी कृषिसंशोधनाबरोबर वनस्पतींची पैदास आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन या विषयांवर काम केले आहे. भारतीय गरीब शेतकर्‍यांच्या शेतांत गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्‍पन्‍न देणारे वाण पेरून हरितक्रांती घडवून आणण्याचे श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते. त्यांच्या प्रयत्‍नांमुळेच गहू व तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला.

एम.एस. स्वामीनाथन यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

  • पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आदी पद्म पुरस्कार
  • रॅमन मॅगसेसे पुरस्कार, World food prize 1987 etc.

हे ही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]