एप्रिल २७
Appearance
एप्रिल २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११७ वा किंवा लीप वर्षात ११८ वा दिवस असतो.
<< | एप्रिल २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | |||||
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]बारावे शतक
[संपादन]- ११२४ - डेव्हिड पहिला स्कॉटलंडच्या राजेपदी.
तेरावे शतक
[संपादन]- १२९६ - डनबारची लढाई - एडवर्ड पहिल्याने स्कॉटलंडचा पराभव केला.
सोळावे शतक
[संपादन]- १५०९ - पोप ज्युलियस दुसऱ्याने व्हेनिसला वाळीत टाकले.
- १५२१ - माक्टानची लढाई - पृथ्वीप्रदक्षिणा करणारा फर्डिनांड मॅगेलन फिलिपाईन्समध्ये स्थानिक रहिवाश्यांशी लढताना मृत्युमुखी.
- १५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.
सतरावे शतक
[संपादन]- १६६७ - अंध व हलाखीत दिवस काढणाऱ्या जॉन मिल्टनने आपले महाकाव्य पॅरेडाईझ लॉस्ट १० ब्रिटिश पाउंडला विकले.
अठरावे शतक
[संपादन]- १७७३ - भारतातील युद्धांच्या खर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट ईंडिया कंपनीला वाचवण्यासाठी ब्रिटिश संसदेने टी ऍक्ट करून कंपनीला उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८१० - बीथोव्हेनने आपले प्रसिद्ध पियानो संगीत फ्युर एलिझ रचले.
- १८१३ - १८१२ चेयुद्ध - अमेरिकेने कॅनडातील ऑन्टारियो प्रांताची राजधानी यॉर्क(आताचे टोरोन्टो शहर) काबीज केली.
- १८५४ - पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.
- १८६१ - अब्राहम लिंकनने अमेरिकेत हेबिअस कोर्पसचा मूलभूत हक्क निलंबित केला. यामुळे सरकारला कोणासही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकण्यास मोकळीक मिळाली.
- १८६५ - अमेरिकन गृहयुद्धातील उत्तरेचे सुटलेले युद्धबंदी घेउन जाणारे जहाज सुलतानावर मिसिसीपी नदीत स्फोट. १,७०० ठार.
- १८७८ - कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजूरी दिली.
विसावे शतक
[संपादन]- १९०८ - लंडनमध्ये चौथे ऑलिंपिक खेळ सुरू.
- १९०९ - तुर्कस्तानच्या सुलतान अब्दुल हमीद दुसऱ्याची हकालपट्टी. त्याचा भाउ मुरात पाचवा गादीवर.
- १९३० - वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून द इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३० हा वटहुकूम काढण्यात आला.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - जर्मनीचे सैन्य ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये शिरले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - जर्मन सैन्याने फिनलंडमधून पळ काढला.
- १९५० - दक्षिण आफ्रिकेत वंशभेद अधिकृत करणारा कायदा मंजूर झाला.
- १९६० - टोगोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९६१ - सियेरा लिओनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९७४ - राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यावर कारवाई करण्यावी मागणी करीत अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. येथे १०,००० लोकांनी निदर्शने केली.
- १९८१ - झेरॉक्स पार्कने माउस वापरण्यास सुरुवात केली.
- १९९२ - सर्बिया व मॉन्टेनिग्रोने एकत्र येउन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकची स्थापना केली.
- १९९४ - दक्षिण आफ्रिकेतील निवडणुकांमध्ये श्यामवर्णीय व्यक्तिंना मतदान करण्यास प्रथमतः मुभा.
एकविसावे शतक
[संपादन]- २००५ - एरबसने आपले ए-३८० जातीच्या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक दाखवले.
- २०११ - अमेरिकेच्या दक्षिण भागातील सहा राज्यांत टोर्नॅडोंचा उद्रेक. ३०० पेक्षा ठार, कोट्यावधी अमेरिकन डॉलरचे नुकसान.
जन्म
[संपादन]- १७०१ - चार्ल्स इमॅन्युएल तिसरा, सार्डिनीयाचा राजा
- १७९१ - सॅम्युअल मोर्स, मोर्स कोड व तारयंत्राचे जनक आणि चित्रकार.
- १८२२ - युलिसिस एस. ग्रँट, अमेरिकेचा १८वा राष्ट्राध्यक्ष.
- १८८३ - भार्गवराम विठ्ठल उर्फ मामा वरेरकर, मराठी नाटककार.
- १९०९ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.
- १९१२ - जोहरा सेहगल, भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि नृत्यदिग्दर्शिका.
- १९२० - डॉ. मणिभाई भीमभाई देसाई, महात्मा गांधींचे अनुयायी.
- १९२७ - कोरेटा स्कॉट किंग, मार्टिन ल्युथर किंगची पत्नी.
- १९७६ - फैसल सैफ, भारतीय पटकथालेखक, दिग्दर्शक
मृत्यू
[संपादन]- ६२९ - अर्देशर तिसरा, पर्शियाचा राजा.
- १५२१ - फर्डिनांड मॅगेलन, पोर्तुगीझ शोधक.
- १६०५ - पोप लिओ अकरावा.
- १८८२ - राल्फ वाल्डो इमर्सन, अमेरिकन लेखक व तत्त्वज्ञ.
- १८९८ - शंकर बाळकृष्ण दीक्षित, ज्योतिर्विद, पाश्चिमात्य व पौर्वात्य जोतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक
- १९८० - विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील, महाराष्ट्रातील सहकारचळवळीचे नेते.
- १९८७ - सलीम अली, भारतीय पक्षीनिरीक्षक.
- १९८९ - कोनोसुके मात्सुशिता, पॅनासोनिक कंपनीचे स्थापक.
- २००२ - रुथ हॅंडलर, बार्बी डॉल या प्रसिद्ध बाहुलीच्या जनक.
- २००९ - फिरोज खान, भारतीय अभिनेता, दिग्दर्शक.
- २०१७ - विनोद खन्ना, भारतीय अभिनेता
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- स्वातंत्र्य दिन - टोगो (१९६०), सियेरा लिओन(१९६१)
- मुक्ति दिन - दक्षिण आफ्रिका.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर एप्रिल २७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल २५ - एप्रिल २६ - एप्रिल २७ - एप्रिल २८ - एप्रिल २९ - (एप्रिल महिना)