जोहरा सेहगल
भारतीय अभिनेत्री | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| उच्चारणाचा श्राव्य | ⓘ | ||||
|---|---|---|---|---|---|
| स्थानिक भाषेतील नाव |
| ||||
| जन्म तारीख | एप्रिल २७, इ.स. १९१२ सहारनपूर | ||||
| मृत्यू तारीख | जुलै १०, इ.स. २०१४ नवी दिल्ली | ||||
| मृत्युची पद्धत |
| ||||
| मृत्युचे कारण | |||||
| कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||||
| कार्य कालावधी (अंत) |
| ||||
| नागरिकत्व | |||||
| शिक्षण घेतलेली संस्था |
| ||||
| व्यवसाय |
| ||||
| भावंडे |
| ||||
| पुरस्कार |
| ||||
| |||||
जोहरा मुमताज सेहगल (२७ एप्रिल १९१२ - १० जुलै २०१४) ह्या एक भारतीय अभिनेत्री, नर्तक आणि कोरिओग्राफर होत्या.[१] उदय शंकरच्या संचात नृत्यांगना म्हणून सेहगलने आपल्या करिअरची सुरुवात केली, आणि अमेरिका आणि जपानसारख्या देशांमध्ये कार्यक्रम सादर केले. करिअरच्या ६० वर्षांहून अधिक काळात अभिनेत्री म्हणून त्या बॉलिवूडच्या असंख्य चित्रपटांमध्ये दिसल्या.
कलाकार्य
[संपादन]त्यांनी ज्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये भाग घेतला त्यामध्ये नीचा नगर, अफसर (१९४६), भाजी ऑन द बीच (१९९२), दिल से .. (१९९८), द मिस्टिक मस्सुर (२००१), साया (२००३), सावरिया (२००७) आणि चीनी कम (२००७); आणि टीव्ही मालिका द ज्वेल इन द क्राउन (१९८४), तंदुरी नाईट्स (१९८५-१९८७) आणि अम्मा आणि फॅमिली (१९९६). [२] वयाच्या ९०व्या वर्षी त्यांनी २००२ मध्ये चलो इश्क लडाये या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका केली होती. भारतीय रंगमंचात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (आयपीटीए) आणि पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटरमध्ये १४ वर्षे काम केले.[३] त्यांनी बेंड इट लाईक बेकहॅम (२००२) सारख्या इंग्रजी भाषेतल्या चित्रपटातही काम केले आहे.
- १९९८ - दिल से..
- १९९९ - हम दिल दे चुके सनम
- २००० - तेरा जादू चल गया
- २००३ - कल होना हो
- २००४ - वीर-झारा
- २००७ - चीनी कम
- २००७ - सांवरिया
वैयक्तिक जीवन
[संपादन]कामेश्वर सेहगल या हिंदूशी जोहरायांचे लग्न झाले. त्यांच्या पालकांकडून सुरुवातीला या लग्नास विरोध होता, परंतु शेवटी त्यांनी मान्यता दिली. १४ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी लग्न केले.[४]
जोहरा आणि कामेश्वर यांना दोन मुले होती; किरण सेगल आणि पवन सहगल. पवन सहगल विश्व स्वास्थ्य संस्था (डब्ल्यूएचओ) साठी काम करतात आणि किरण या नामांकित ओडिसी नर्तकी आहेत.[५] २०१२ मध्ये, किरण यांनी जोहराचे चरित्र "जोहरा सेहगलः फॅटी" असे प्रकाशीत केले.[६][५]
मृत्यू
[संपादन]९ जुलै २०१४ रोजी न्यूमोनिया झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना दक्षिण दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले.[७] १० जुलै २०१४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या १०२व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि ११ जुलै रोजी दिल्लीच्या लोधी रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.[८][९]
पुरस्कार
[संपादन]त्यांना १९६३ मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, १९९८ मध्ये पद्मश्री,[१०] २००१ मध्ये कालिदास सन्मान मिळाले. २००४ मध्ये संगीत नाटक अकादमी, जी भारतीय संगीत, नृत्य आणि नाट्य कलेतील राष्ट्रीय अकादमी आहे, त्याच्या आजीवन कर्तृत्वासाठीच्या संगीत नाटक अकादमी फेलोशिप ह्या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. २०१० मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान करण्यात आला.[११]
- १९६३: संगीत नाटक अकादमी पुरस्कार [१२]
- १९९८: पद्मश्री [१३]
- २००१: कालिदास सन्मान
- २००२: पद्मभूषण
- २००४: संगीत नाटक अकादमी फेलोशिप
- २०१०: पद्मविभूषण [१४]
संदर्भ
[संपादन]- ↑ Zohra Sehgal profile at screenonline.org.uk
- ↑ Zohra Sehgal Britannica.com.
- ↑ "Zohra Sehgal: Naughty in her 90s!", The Times of India, 8 March 2009.
- ↑ Zohra Sehgal: The drama of life The Times of India, 24 August 2003.
- 1 2 Pillai, Surya S. (2012-06-02). द हिंदू (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. Missing or empty
|title=(सहाय्य);|access-date=requires|url=(सहाय्य) - ↑ द हिंदू (इंग्रजी भाषेत). PTI. 2014-07-10. ISSN 0971-751X. Missing or empty
|title=(सहाय्य);|access-date=requires|url=(सहाय्य)CS1 maint: others (link) - ↑ "संग्रहित प्रत". 2020-02-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-02-25 रोजी पाहिले.
- ↑ Notice of death of Sehgal, ndtv.com; accessed 13 July 2014.
- ↑ "Zohra Sehgal Dies at 102" India Today, 10 July 2014.
- ↑ (PDF) https://www.webcitation.org/6U68ulwpb?url=http://mha.nic.in/sites/upload_files/mha/files/LST-PDAWD-2013.pdf. 15 November 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. Missing or empty
|title=(सहाय्य) - ↑ "This Year's Padma Awards announced" (Press release). गृह मंत्रालय (भारत). 25 January 2010. 25 January 2010 रोजी पाहिले.
- ↑ Official list of awardees – Drama – Acting Archived 2008-11-06 at the वेबॅक मशीन. the Sangeet Natak Akademi Official website.
- ↑ Padma Awards- theatre personality Zohra Sehgal and...[permanent dead link] रीडिफ.कॉम, 27 January 1998.
- ↑ (PDF) https://www.webcitation.org/6U68ulwpb?url=http://mha.nic.in/sites/upload_files/mha/files/LST-PDAWD-2013.pdf. 15 November 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. Missing or empty
|title=(सहाय्य)
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील जोहरा सेहगल चे पान (इंग्लिश मजकूर)
- Pages using the Phonos extension
- Uses of Wikidata Infobox
- Pages using citations with accessdate and no URL
- CS1 maint: others
- मृत बाह्य दुवे असणारे लेख from July 2025
- कायमचे मृत बाह्य दुवे असणारे लेख
- संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते
- हिंदी चित्रपट अभिनेत्री
- कालिदास सन्मान पुरस्कारविजेते
- पद्मश्री पुरस्कारविजेते
- पद्मभूषण पुरस्कारविजेते
- पद्मविभूषण पुरस्कारविजेते
- इ.स. २०१४ मधील मृत्यू
- इ.स. १९१२ मधील जन्म
- शतायुषी