डिसेंबर ९
Appearance
<< | डिसेंबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
डिसेंबर ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४२ वा किंवा लीप वर्षात ३४३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]अठरावे शतक
[संपादन]- १७९३ - अमेरिकन मिनर्व्हा, न्यू यॉर्कचे पहिले दैनिक प्रकाशित.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८२४ - अयाकुशोची लढाई - ऍंतोनियो होजे दी सुकरच्या नेतृत्वाखाली पेरूच्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्पॅनिश दलाला हरवून पेरू स्वतंत्र केले.
- १८३५ - टेक्सासच्या गणराज्याने सान ऍंतोनियो जिंकले.
- १८५६ - ईराणमधील बुशहरने ब्रिटिश लश्करासमोर शरणागति पत्करली.
- १८८८ - अमेरिकन युद्ध खात्यात काम करणाऱया हर्मन हॉलेरिथने स्वतः तयार केलेले गणकयंत्र वापरण्यास सुरुवात केली.
विसावे शतक
[संपादन]- १९४० - दुसरे महायुद्ध - रिचर्ड ओ'कॉनोरच्या नेतृत्वाखाली भारतीय व ब्रिटिश सैनिकांनी ईजिप्तच्या सिद बरानीतील ईटालियन सैन्यावर हल्ला केला.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - चीनी गणराज्य, कोरियन गणराज्याचे तात्पुरते सरकार व क्युबाने जर्मनी व जपान विरुद्ध युद्ध पुकारले.
- १९४५ - जनरल पॅटन जर्मनीमध्ये अपघातात जखमी.
- १९४६ - न्युरेम्बर्ग खटला सुरू.
- १९६१ - टांगानिकाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य.
- १९९० - लेक वालेंसा पोलंडच्या अध्यक्षपदी.
जन्म
[संपादन]- १४४७ - चेंगह्वा, चीनी सम्राट.
- १५०८ - गेम्मा फ्रिसियस, डच गणितज्ञ व नकाशेतज्ञ.
- १५९४ - गुस्तावस अडोल्फस, स्वीडनचा राजा.
- १६०८ - जॉन मिल्टन, इंग्लिश कवी.
- १९१९- ई.के. नयनार, केरळचा मुख्यमंत्री.
- १९२३ - बॉब हॉक, ऑस्ट्रेलियाचा तेविसावा पंतप्रधान.
- १९४६ - सोनिया गांधी, इटलीत जन्मलेली भारतीय राजकारणी.
मृत्यू
[संपादन]- ११६५ - माल्कम चौथा, स्कॉटलंडचा राजा.
- १४३७ - सिगिस्मंड, पवित्र रोमन सम्राट.
- १५६५ - पोप पायस चौथा.
- १६६९ - पोप क्लेमेंट नववा.
- १७०६ - पेद्रो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- टांझानिया (पूर्वीचे टांगानिका) - स्वातंत्र्य दिन
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर डिसेंबर ९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर ७ - डिसेंबर ८ - डिसेंबर ९ - डिसेंबर १० - डिसेंबर ११- (डिसेंबर महिना)