Jump to content

टांगानिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टांगानिका (इ.स. १९६१-६२)
टांगानिकाचे प्रजासत्ताक (इ.स. १९६२-६४)

Tanganyika
Republic of Tanganyika

← इ.स. १९६१ – इ.स. १९६२ →
टांगानिकाचा ध्वज चिन्ह
राजधानी दार एस सलाम
शासनप्रकार घटनात्मक राजेशाही (इ.स. १९६१-६२)
प्रजासत्ताक (इ.स. १९६२-६४)
राष्ट्रप्रमुख राष्ट्रप्रमुख -
-इ.स. १९६१-६२ एलिझाबेथ दुसरी
-इ.स. १९६२-६४ ज्युलियस न्यरेरे
पंतप्रधान राज्यपाल -
-इ.स. १९६१-६२ रिचार्ड टर्नबुल
अधिकृत भाषा स्वाहिली
इंग्लिश

टांगानिका (रोमन लिपी: Tanganyika ;), उत्तरकाळातील टांगानिकाचे प्रजासत्ताक (मराठी लेखनभेद: टांगानिक्याचे प्रजासत्ताक ; इंग्लिश: Republic of Tanganyika, रिपब्लिक ऑफ टांगानिका) हा पूर्व आफ्रिकेतील इ.स. १९६१ ते इ.स. १९६४ या कालखंडात अस्तित्वात असलेला एक देश होता. हिंदी महासागर व व्हिक्टोरिया सरोवर, मालावी सरोवर, टांगानिका सरोवर या आफ्रिकेतील मोठ्या सरोवरांनी वेढलेल्या या देशात वर्तमान रवांडा, बुरुंडी व झांझिबार वग़ळता टांझानियाच्या उर्वरित भूभागाचा समावेश होता, तर दार एस्सलाम येथे टांगनिक्याची राजधानी होती.. भूतपूर्व जर्मन पूर्व आफ्रिकेच्या वसाहतींना ९ डिसेंबर, इ.स. १९६१ रोजी स्वातंत्र्य मिळून या देशाची स्थापना झाली. २६ एप्रिल, इ.स. १९६४ रोजी या देशाचे विसर्जन झाले व याच्या भूभागात झांझीबाराचे सामिलीकरण होऊन वर्तमान टांझानियाचे प्रजासत्ताक स्थापले गेले.

बाह्य दुवे

[संपादन]
  • "टांगानिक्याचा इ.स. १८८६ सालाच्या सुमाराचा नकाशा" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)