Jump to content

सोनिया गांधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोनिया गांधी

विद्यमान
पदग्रहण
२९ मार्च २०१०
कार्यकाळ
४ जून २००४ – २३ मार्च २००६
मागील पद तयार केले
पुढील पद रद्द केले

विद्यमान
पदग्रहण
१६ मे २००४
मागील पद तयार केले

विद्यमान
पदग्रहण
१४ मार्च १९९८
मागील सीताराम केसरी
पुढील राहुल गांधी

कार्यकाळ
१९ मार्च १९९८ – २२ मे २००४
मागील शरद पवार
पुढील लालकृष्ण अडवाणी

विद्यमान
पदग्रहण
१७ मे २००४
मागील सतीश शर्मा
मतदारसंघ रायबरेली
कार्यकाळ
१० ऑक्टोबर १९९९ – १७ मे २००४
मागील संजय सिंग
पुढील राहुल गांधी
मतदारसंघ अमेठी

जन्म ९ डिसेंबर इ.स. १९४६
लुसियाना, इटली
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मागील इतर राजकीय पक्ष संयुक्त आघाडी (१९९६-२००४)
संयुक्त पुरोगामी आघाडी (२००४–आजतागायत)
पती राजीव गांधी (१९६९–१९९१)
अपत्ये राहुल
प्रियांका
निवास १० जनपथ, दिल्ली

सोनिया गांधी (पूर्वाश्रमीच्या ॲन्टोनीया माईनो, ९ डिसेंबर, इ.स. १९४६) या एक भारतीय राजकीय नेत्या आहेत.[] त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, या सर्वात जास्त काळ सत्तेत असणाऱ्या बलाढ्य राजकीय पक्षाच्या अध्यक्षा आहेत. त्यांचे पती आणि भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर ७ वर्षांनी १९९८ साली सोनिया गांधींनी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारले. २०१७ सालापर्यंत २२ वर्षे इतका काळ त्यांनी अध्यक्षपद सांभाळले.[][][][] २०१९ साली राहुल गांधींनी, त्यांच्या मुलाने राजीनामा दिल्यानंतर त्या परत अध्यक्ष झाल्या.

सोनिया गांधी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक सल्लागार समितींच्या अध्यक्षस्थानी होत्या. माहितीचा अधिकार, अन्नसुरक्षा कायदा आणि मनरेगा या देशाच्या विकासासाठी उपयुक्त असणाऱ्या योजनांचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यांचा परदेशातील जन्माच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर नेहमी टीका आणि वाद होतो.[][][][]

तब्येतीच्या कारणावरून त्यांनी संपुआ (युपीए) सरकारच्या दुसऱ्या कालखंडात सक्रीय राजकारणात सहभाग कमी घेतला. गांधींनी जरी भारत सरकारचे कुठलेही खाते कधी सांभाळले नसले तरी त्यांचा भारतातील सर्वात जास्त शक्तिशाली लोकांमध्ये समावेश होतो. सोनिया गांधींचा बऱ्याच वेळा जगातील सर्वात जास्त शक्तिशाली महिलांमध्ये समावेश केला गेला आहे.[१०][११][१२]

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]

सोनिया गांधी यांना २००४ ते २०१४ सालातील[१०] भारताची सर्वात जास्त शक्तिशाली राजकारणी म्हणून ओळखले जाते. विविध प्रसिद्ध नियतकालिके, मासिके यांच्या याद्यांमध्ये त्यांचा समावेश केला गेला आहे.[११][१२]

२०१३ मध्ये त्यांचा समावेश जगातल्या २१ सर्वात जास्त शक्तिशाली महिलांमध्ये आणि ९ सगळ्यात जास्त शक्तिशाली महिलांमध्ये फोर्ब्ज मासिकाद्वारे केला.[१३]

२००७ मध्ये फोर्ब्जने जगातील तिसरी सर्वात जास्त शक्तिशाली महिला म्हणून त्यांचा उल्लेख केला.[१४]

सोनिया गांधी यांचे चरित्रग्रंथ

[संपादन]
  • सोनिया गांधी - एक अनन्यसाधरण जीवनप्रवास : मूळ लेखिका - राणी सिंग; मराठी अनुवाद - लीना सोहोनी. (मेहता पब्लिशिंग हाउस)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Rediff On The NeT: Varsha Bhosle sees no difference between Bina Ramani and Sonia Gandhi". www.rediff.com. 2021-12-30 रोजी पाहिले.
  2. ^ "Sonia Gandhi retires as Congress president, to remain active in politics". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-12-15. 2021-12-30 रोजी पाहिले.
  3. ^ "As Sonia Gandhi makes way". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-12-16. 2021-12-30 रोजी पाहिले.
  4. ^ "Sonia Gandhi's 19 years as Congress president: From husband Rajiv's death to son Rahul's elevation". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2017-12-11. 2021-12-30 रोजी पाहिले.
  5. ^ "Sonia Gandhi keeps Congress hopes alive in India polls" (इंग्रजी भाषेत). 2009-04-14.
  6. ^ "Movements and governments". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-12-15. 2021-12-30 रोजी पाहिले.
  7. ^ "End Of The Longest Regency | Outlook India Magazine". https://www.outlookindia.com/ (इंग्रजी भाषेत). 2021-12-30 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)
  8. ^ "India: politics of renunciation, traditional and modern – Analysis". english.religion.info. 2021-12-30 रोजी पाहिले.
  9. ^ "Telegraph".
  10. ^ a b Oct 13, CL Manoj / ET Bureau /; 2017; Ist, 13:22. "Rahul Gandhi: The Sonia Gandhi years and what Rahul Gandhi can learn | India News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-12-30 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  11. ^ a b Riedel, Bruce (2012-06-24). "Sonia Gandhi Health Mystery Sets India Leadership Adrift" (इंग्रजी भाषेत).
  12. ^ a b Sandbrook, Richard; Güven, Ali Burak (2014-06-01). Civilizing Globalization, Revised and Expanded Edition: A Survival Guide (इंग्रजी भाषेत). SUNY Press. ISBN 978-1-4384-5209-8.
  13. ^ "Sonia Gandhi third most powerful woman in Forbes list". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2013-10-30. 2021-12-30 रोजी पाहिले.
  14. ^ "Forbes List Directory". Forbes (इंग्रजी भाषेत). 2021-12-30 रोजी पाहिले.