जुलै १२
(१२ जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
जुलै १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९३ वा किंवा लीप वर्षात १९४ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका
ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]
बारावे शतक[संपादन]
- ११९१ - तिसरी क्रुसेड - दोन वर्षांच्या वेढ्यानंतर एकरचा किल्ला पडला.
सोळावे शतक[संपादन]
- १५८० - ऑस्ट्रोग बायबलचे प्रकाशन.
सतरावे शतक[संपादन]
एकोणिसावे शतक[संपादन]
- १८१२ - १८१२चे युद्ध - अमेरिकेने कॅनडावर आक्रमण केले.
- १८९२ - मॉँट ब्लांक पर्वतावरील सरोवर फुटले. खालील सेंट जर्व्हे गावात पूर. २०० ठार.
विसावे शतक[संपादन]
- १९३२ - हेडली व्हेरिटीने एकाच डावात १० धावा देउन १० बळी घेतले व क्रिकेटमधील उच्चांक स्थापित केला.
- १९३३ - अमेरिकन काँग्रेसने कामगारांसाठी न्यूनतम मोबदला ताशी ३३ सेंट ठरवला.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - प्रोखोरोव्ह्काची लढाई.
- १९५० - रेने प्लेव्हेन फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९६७ - नुवार्क, न्यु जर्सी शहरात वांशिक दंगली. २७ ठार.
- १९७५ - साओ टोमे व प्रिन्सिपला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
- १९७९ - किरिबाटीला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९९३ - जपानच्या होक्काइदो द्वीपावर रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.८ तीव्रतेचा भूकंप. यामुळे तयार झालेल्या त्सुनामीने ओकुशिरी द्वीपावर २०२ बळी घेतले.
एकविसावे शतक[संपादन]
- २००४ - पेद्रो संताना लोपेस पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी.
- २००५ - आल्बर्ट दुसऱ्याचा मोनॅकोच्या राजेपदी राज्याभिषेक.
- २०१२ - नायजेरियातील ओकोबी शहराजवळ अपघात झालेल्या पेट्रोलवाहू ट्रकचा स्फोट. त्यातून गळत असलेले पेट्रोल गोळा करणारऱ्यांपैकी १२१ व्यक्ती ठार, शेकडो जखमी.
जन्म[संपादन]
- १०० - जुलियस सीझर, रोमन सेनापती व राज्यकर्ता, सीझर (जुलै १२ किंवा जुलै १३).
- १३९४ - अशिकागा योशिनोरी, जपानी शोगन.
- १५९६ - मायकेल पहिला, रशियाचा झार.
- १८५२ - हिपोलितो य्रिगोयेन, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
- १८५४ - जॉर्ज ईस्टमन, अमेरिकन संशोधक.
- १८६४ - इतिहासाचार्य वि.का.राजवाडे, मराठी इतिहास संशोधक
- १८६४ - जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर, अमेरिकन शास्त्रज्ञ. (चित्रीत)
- १८७० - लुई दुसरा, मोनॅकोचा राजा.
- १९२० - यशवंत विष्णू चंद्रचूड, भारताचे माजी सरन्यायाधीश.
- १९३७ - लायोनेल जॉस्पिन, फ्रांसचा पंतप्रधान.
- १९४३ - ब्रुस टेलर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४७ - पूचिया कृष्णमुर्ती, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - संजय मांजरेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - ऍलन मुल्लाली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू[संपादन]
- १४४१ - अशिकागा योशिनोरी, जपानी शोगन.
- १७१२ - रिचर्ड क्रॉमवेल, इंग्लिश राज्यकर्ता.
- १९४९ - डग्लस हाइड, आयर्लंडचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- २००० - इंदिरा संत , मराठी कवयित्री.
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
- स्वातंत्र्य दिन - किरिबाटी, साओ टोमे व प्रिन्सिप.
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर जुलै १२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै १० - जुलै ११ - जुलै १२ - जुलै १३ - जुलै १४ - (जुलै महिना)