Jump to content

"समतेचा पुतळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५८: ओळ ५८:
२१ जून २०१९ रोजीच्या, स्मारकातील नव्या आराखड्यात बाबासाहेबांच्या पुतळ्याची ऊंची ४५० फुट केलेली आहे.
२१ जून २०१९ रोजीच्या, स्मारकातील नव्या आराखड्यात बाबासाहेबांच्या पुतळ्याची ऊंची ४५० फुट केलेली आहे.


== घटनाक्रम ==
==हे सुद्धा पहा==
* इ.स. १९८६ : [[नामदेव ढसाळ]], [[राजा ढाले]] आणि [[ज.वि. पवार]] यांनी समुद्रात भराव टाकून चैत्यभूमीचा विस्तार करण्याची मागणी केली. पर्यावरणविषयक प्रश्नांमुळे ही मागणी मागे पडली.
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* इ.स. २००३ : ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर जमणाऱ्या प्रचंड गर्दीसाठी आणखी काहीतरी सोय हवी, अशी चर्चा सुरू झाली.
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* इ.स. २००४ : [[सुशीलकुमार शिंदे]] मुख्यमंत्री असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनाम्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा उल्लेख.
* इ.स. २००९ : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा स्मारकाचा विषय चर्चेला. इंदू मिलची जागा स्मारकासाठी निश्चित करण्याच्या दृष्टीने हालचाली.
* इ.स. २०११ : मार्च महिन्यात [[आनंदराज आंबेडकर]] यांनी सभा घेऊन ६ डिसेंबर रोजी इंदू मिलमध्ये शिरकाव करण्याची घोषणा केली.
* इ.स. २०११ : ६ डिसेंबर रोजी पोलिसांना गुंगारा देऊन हजारो कार्यकर्त्यांसह आनंदराज आंबेडकर इंदू मिलमध्ये घुसले. २६ दिवस आंदोलन.
* इ.स. २०१२ : ५ डिसेंबर रोजी संसदेत इंदू मिलची जागा स्मारकासाठी देण्याची घोषणा.
* इ.स. २०१३ : मार्च महिन्यात या स्मारकासाठी एमएमआरडीए नियोजन करेल, असे सरकारचे निर्देश.
* इ.स. २०१४ : देशात सार्वत्रिक निवडणुकांनंतर केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपप्रणीत सरकार.
* इ.स. २०१५ : मार्च महिन्यात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री [[स्मृती इराणी]] यांनी ही जागा स्मारकाला देण्याची कागदोपत्री कारवाई पूर्ण केली.
* इ.स. २०१५ : स्थापत्यविशारद [[शशी प्रभू]] यांना इंदू मिलचा आराखडा तयार करण्याचं कंत्राट देण्यात आले.
* इ.स. २०१५ : ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान [[नरेंद्र मोदी]] यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा.
* इ.स. २०१६ : मार्च महिन्यात शशी प्रभू यांनी सादर केलेल्या आराखड्याची चिकित्सा करण्यासाठी एकसदस्यीय समितीची स्थापना.
* इ.स. २०१७ : एप्रिल महिन्यात एकसदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त. आराखड्याबद्दल समाधान.
* इ.स. २०१८ : एमएमआरडीए च्या म्हणण्यानुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात.

== हे सुद्धा पहा ==
*[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
*[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
*[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, लंडन]]
*[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, लंडन]]
*[[महू]]
*[[महू]]
ओळ ६७: ओळ ८४:
*[[दीक्षाभूमी]]
*[[दीक्षाभूमी]]


== संदर्भ ==
{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भयादी}}


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

२१:३८, १९ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

समतेचा पुतळा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक
सर्वसाधारण माहिती
प्रकार पुतळा
ठिकाण प्रभादेवी, मुंबई, महाराष्ट्र, भारत
बांधकाम सुरुवात २०१८
पूर्ण २०२० (अंदाज)
मूल्य अंदाजे ₹ ७८३ कोटी
ऊंची
वास्तुशास्त्रीय ४५० फुट (१३७.३ मीटर)
क्षेत्रफळ ४८,४१४.८३ चौरस मीटर (सुमारे १२.५ एकर)
बांधकाम
वास्तुविशारद शशी प्रभू

समतेचा पुतळा (डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मुंबई किंवा स्टॅचू ऑफ इक्वालिटी)[][][] हे मुंबई, महाराष्ट्रातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आहे.[] हे स्मारक भारताचे पहिले कायदा मंत्री आणि भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ आहे. येथे १३७.३ मीटर (४५० फुट) उंच बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला जाईल.[][] भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ११ ऑक्टोबर २०१५ रोजी स्मारकाचे भूमिपूजन केले.[][][][१०] बाबासाहेब आंबेडकर हे समतेचे थोर पुरस्कर्ते असल्यामुळे व समतेसाठी त्यांनी आजीवन केलेल्या संघर्षासाठी या स्मारकाला "स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी" अर्थात "समतेचा पुतळा" म्हटले आहे. आंबेडकरांचे समाधी स्थळ चैत्यभूमी येथून जवळच आहे. या स्मारकाच्या जमिनीचे क्षेत्रफळ ४८,४१४.८३ चौरस मीटर (साडे १२ एकर) असून स्मारकासाठीचा खर्च सुमारे ७८३ कोटी रूपये इतका येण्याता अंदाज आहे.[११] स्टॅच्यू ऑफ युनिटी (१८२ मीटर) व स्प्रिंग टेंपल बुद्ध (१५३ मीटर) यांच्यानंतर हा आंबेडकरांचा पुतळा जगातील तिसरा सर्वात उंचीचा पुतळा असेल.[१२]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता आणि न्यायासाठी लढा दिला आणि भारतातील कोट्यवधी शोषीत जनतेला माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला, त्यामुळे आंबेडकरांना समतेचे प्रतिक असे म्हटले जाते.

पार्श्वभूमी आणि इतिहास

मुंबईतील दादर चौपाटीवर असलेली चैत्यभूमी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समाधीस्थळ असून आंबेडकरांच्या अनुयायांसाठी महत्त्वाची जागा आहे. चैत्यभूमी समोर असलेल्या इंदू मिलमध्ये बाबासाहेबांच्या भव्य स्मारकाचे काम सध्या सुरु आहे. चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनी जमणाऱ्या लाखोंच्या जनसमुदायासाठी जागा उपलब्ध व्हावी, ही मागणी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना २००३ मध्ये पुढे आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना वंदन करायला चैत्यभूमीवर दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक येतात. दोन-तीन दिवस मुंबईत येणारा हा जनसमुदाय शिवाजी पार्क, दादर चौपाटी आणि चैत्यभूमी या परिसरात उघड्यावर राहतो. या लोकांना किमान निवारा मिळावा, हा विचार १९८६मध्येही पुढे आला होता. त्या वेळी राजा ढाले, नामदेव ढसाळ आणि ज.वि. पवार यांनी समुद्रात भराव टाकून चैत्यभूमीचा विस्तार करण्याची मागणी केली होती. मात्र पर्यावरणासंदर्भातील प्रश्नांमुळे ही मागणी मागे पडली. २००३मध्ये हा विचार पुन्हा पुढे आला आणि तो एक राजकीय मुद्दा बनला. सन २००३च्या डिसेंबर महिन्यात ही मागणी व्हायला लागली आणि २००४मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आल्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या जाहीरनाम्यात पहिल्यांदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचा उल्लेख करण्यात झाला. तेव्हा हे स्मारक कुठे व्हावे, याची चर्चा सुरू झाली तेव्हा इंदू मिलचे नाव पुढे आले. "काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात इंदू मिलचा विषय आला खरा, पण २००४ ते २००९ पर्यंत त्याबाबत फारशी काहीच प्रगती झाली नाही. २००९मध्येही पुन्हा एकदा निवडणुकीच्या निमित्तानेच इंदू मिलचा विषय ऐरणीवर आला होता. पण त्यानंतरही काहीच प्रक्रिया झाली नाही," असा आरोप रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर करतात. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मार्च २०११मध्ये आझाद मैदानात एक सभा झाली आणि त्या सभेत त्यांनी महाराष्ट्र सरकारला इशारा दिला होता की, "इंदू मिल प्रकरणी ६ डिसेंबर २०११ पर्यंत निर्णय घेतला नाही, तर महापरिनिर्वाण दिनी हजारो कार्यकर्त्यांसह इंदू मिलमध्ये प्रवेश करून ताबा घेतला जाईल." ठरल्याप्रमाणे आंदोलन झाले आणि २६ दिवस रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी इंदू मिलमध्ये शिरून ठिय्या दिला होता. "पोलीस बंदोबस्त चोख होता. पण आमचीही तयारी झाली होती. इंदू मिलवर आमचा झेंडा रोवण्यासाठी आम्ही गनिमी कावा वापरायचे ठरवले होते," असे रिपब्लिकन सेनेचे तत्कालीन महाराष्ट्र अध्यक्ष काशिनाथ निकाळजे सांगतात. त्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या दरम्यान इंदू मिलची जागा मिळवण्यासाठी पत्रव्यवहार सुरू झाला. "२०१२मध्ये आमच्या पक्षानेही या प्रश्नी आंदोलन केले. आमच्या आंदोलनाची दखल घेऊन मग ५ डिसेंबर २०१२ रोजी आनंद शर्मा यांनी लोकसभेत इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देत असल्याचे जाहीर केले," असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले सांगतात. इंदू मिलच्या जागी बाबासाहेबांचे स्मारक करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर ६ डिसेंबर २०१२ रोजी चैत्यभूमीवर आनंद साजरा करण्यात आला.


सन २००३ पासूनच इंदू मिलच्या जमिनीच्या जागेवर हे स्मारक उभारलं जावे ही मागणी जोर धरत होती. मात्र सन २०१२ मध्ये प्रत्यक्ष ही जमीन स्मारकासाठी घोषित करण्यात आली. १८ ऑगस्ट २०१२ रोजी भारताचे तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी घोषित केले होते की, या स्मारक दादर येथील जुन्या हे स्मारक राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (इंदू मिलच्या) जागेवर उभारण्यात येईल.[१३] पुढे नरेंद्र मोदींच्या हस्ते ११ ऑक्टोबर २०१५ रोजी स्मारकाचे भूमिपुजन करण्यात आले.[१४] तेव्हाही या जमिनीचे हस्तांतरण पूर्ण झाले नव्हते. याबाबत ५ एप्रिल २०१५ रोजी राज्य सरकार अणि केंद्र सरकार यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला.[१५]

स्मारकासाठी विविध विभागांच्या आणि खासकरून वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या परवानग्या सन २०१५ मध्ये मिळाल्या. सन २०१८ पासून काम सुरू झाले आणि त्यासाठी सुरुवातीला २ वर्षांची कालमर्यादा आखून दिली होती.

संरचना

स्मारकाचा आराखडा वास्तुविशारद शशी प्रभू यांनी तयार केला आहे. स्मारक संरचनेत मुख्यप्रवेशद्वार एसकेएस मार्गाच्या सोबत कँडेल रोडच्या मध्यबिंदू समांतर होत आहे तसेच आंबेडकरानुयायांच्या सोयीसाठी हे स्मारक चैत्यभूमीला जोडले जात आहे. स्मारकाचा अंदाजित खर्च ५५० कोटी रुपये (की ७८३ कोटी?) असून १२ एकरच्या इंदू मिलच्या जागेत स्मारक बांधले जाणार आहे.[१६] स्मारकाचे मुख्य आकर्षण तलावाच्या चारही बाजूने २५००० चौरस फुट स्तूप असेल. दगडाचे २४ आरे असलेले एक विशाल घुमट ज्याचा आकार अशोक चक्रासारखा असेल तसेच ३९,६२२ चौरस फुट जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील संग्रहालय आणि ग्रंथालय तयार केले जाणार आहे. स्मारक परिसरात ५०० वाहनाची पार्किंगची सुविधा असेल. स्मारक निर्मितीची जबाबदारी "मुबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण" (MMRDA) कडे सोपवण्यात आली आहे.[१७][१८]

स्तूप

स्तूप 110.95 कोटी रूपये असा सर्वात असा महागडा हिस्सा असेल (यूएस $ में 16.2 मिलियन). स्तूप ४० मीटर (१४० फुट) ऊंच व ८० मीटर (११० फुट) परिधी व्यासाचे असेल. एक धारीदार छत्र यासारखे बौद्ध चैत्य बनेल. एक आठ स्तरीय कांस्य चंदवा गुंबदाच्या पायामध्ये एक कमल तलाव समवेत 2,400 वर्ग मीटरचे एक निर्मित क्षेत्रात स्तूपाच्या शीर्षावर बुद्धांची आठ पट मार्गाचे प्रतिनिधीत्व.[१९]

विपश्यना खोली

सदर स्मारकात १३००० लोक विपश्यना करू शकतील एक्ढ्या क्षमतेच विपश्यना हॉल प्रस्तावित आहे.[२०]

संघर्ष दालन

स्मारकात ५०,००० चौ.फुट कलादालनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर तैलचित्र, वस्तूसंग्रहालय तसेच भव्य ग्रंथालय असेल.।[२१]

विवाद

स्मारकाची रचना व पुतळ्याच्या उंचीबाबत अनेकदा बदल करून आराखड्यात बदल गेले आहेत. स्मारकाच्या उद्घाटनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर तसेच प्रकाश आंबेडकर स्मारकाच्या आराखड्यावरून असमाधानी होते. कारण याची उंची केवळ १५० फुट ठेवण्यात आपली होती. हा पुतळा अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्या (९३ मीटर) पेक्षा अधिक उंचीचा असावा अशी त्यांची प्रमुख मागणी होती. प्रकाश आंबेडकर यांच्या मतानुसार हे स्मारक 'थिंक टैंक संस्था' म्हणून जगभरातील विद्वानांसाठी आंतरराष्ट्रीय मानक बौद्धिक केंद्राप्रमाणे असावे, कारण बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले. आनंदराज आंबेडकर यांनी देखील राज्य सरकार द्वारा निर्मित आराखडा परिपूर्ण नाही असे म्हणत एक भिन्न आराखडा निर्माण केला जावा अशी इच्छा व्यक्त केली. सदर आराखडा केवळ एक बगीचा वाटत आहे, हा आराखडा अंतिम करण्यापूर्वी जागतिक दर्जाच्या उद्योग निर्मिती करणाऱ्या सोबतच बौद्ध धम्म विशेषज्ञ, प्रतिष्ठित आर्किटेक्ट विभिन्न बौद्ध देशातील विशेषज्ञांची मते घ्यावीत, त्याच बरोबर जनतेतून तांत्रिक समिती गठीत करण्याची मागणी केली. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाची उंची महत्तम हवी ज्यामुळे समुद्राच्या समोरील भागात परदेशातून मुंबईत प्रवेश करतेवेळी जागतिक आकर्षण म्हणून स्मारक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रभावशाली ठरावा.[२२][२३]

२१ जून २०१९ रोजीच्या, स्मारकातील नव्या आराखड्यात बाबासाहेबांच्या पुतळ्याची ऊंची ४५० फुट केलेली आहे.

घटनाक्रम

  • इ.स. १९८६ : नामदेव ढसाळ, राजा ढाले आणि ज.वि. पवार यांनी समुद्रात भराव टाकून चैत्यभूमीचा विस्तार करण्याची मागणी केली. पर्यावरणविषयक प्रश्नांमुळे ही मागणी मागे पडली.
  • इ.स. २००३ : ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर जमणाऱ्या प्रचंड गर्दीसाठी आणखी काहीतरी सोय हवी, अशी चर्चा सुरू झाली.
  • इ.स. २००४ : सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनाम्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा उल्लेख.
  • इ.स. २००९ : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा स्मारकाचा विषय चर्चेला. इंदू मिलची जागा स्मारकासाठी निश्चित करण्याच्या दृष्टीने हालचाली.
  • इ.स. २०११ : मार्च महिन्यात आनंदराज आंबेडकर यांनी सभा घेऊन ६ डिसेंबर रोजी इंदू मिलमध्ये शिरकाव करण्याची घोषणा केली.
  • इ.स. २०११ : ६ डिसेंबर रोजी पोलिसांना गुंगारा देऊन हजारो कार्यकर्त्यांसह आनंदराज आंबेडकर इंदू मिलमध्ये घुसले. २६ दिवस आंदोलन.
  • इ.स. २०१२ : ५ डिसेंबर रोजी संसदेत इंदू मिलची जागा स्मारकासाठी देण्याची घोषणा.
  • इ.स. २०१३ : मार्च महिन्यात या स्मारकासाठी एमएमआरडीए नियोजन करेल, असे सरकारचे निर्देश.
  • इ.स. २०१४ : देशात सार्वत्रिक निवडणुकांनंतर केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपप्रणीत सरकार.
  • इ.स. २०१५ : मार्च महिन्यात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी ही जागा स्मारकाला देण्याची कागदोपत्री कारवाई पूर्ण केली.
  • इ.स. २०१५ : स्थापत्यविशारद शशी प्रभू यांना इंदू मिलचा आराखडा तयार करण्याचं कंत्राट देण्यात आले.
  • इ.स. २०१५ : ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा.
  • इ.स. २०१६ : मार्च महिन्यात शशी प्रभू यांनी सादर केलेल्या आराखड्याची चिकित्सा करण्यासाठी एकसदस्यीय समितीची स्थापना.
  • इ.स. २०१७ : एप्रिल महिन्यात एकसदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त. आराखड्याबद्दल समाधान.
  • इ.स. २०१८ : एमएमआरडीए च्या म्हणण्यानुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ name="TNN 2012">TNN (2 January 2012). The Times of India http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Statue-of-equality-should-come-up-at-Indu-Mill-site-Ambedkar/articleshow/11330635.cms. 1 October 2015 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ dna. 16 March 2012 http://www.dnaindia.com/mumbai/report-govt-dithers-even-on-statue-of-equality-plan-1662960. 1 October 2015 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ http://indianexpress.com/article/cities/mumbai/state-yet-to-pick-designer-for-ambedkar-memorial/. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ Sports (10 October 2015). The Indian Express http://indianexpress.com/article/cities/mumbai/pm-modi-to-be-briefed-on-how-ambedkar-memorial-will-look/. 20 October 2015 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ saamana.com. (इंग्रजी भाषेत) http://www.saamana.com/dr-ambedkar-memorial-height-increased-by-100-feet/. 2019-06-30 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ Loksatta https://www.loksatta.com/maharashtra-news/indu-mill-dr-babasaheb-ambedkar-statue-100-ft-cm-devendra-fadanvis-monsoon-session-sgy-87-1916625/. 2019-06-30 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ . Indian Express. 2012-12-06 http://www.indianexpress.com/news/ambedkar-memorial-statue-taller-than-that-of-liberty-sought/1041101/. 2013-10-29 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ Jan 2, TNN | Updated:; 2012; Ist, 0:34. The Times of India (इंग्रजी भाषेत) https://timesofindia.indiatimes.com/city/pune/Statue-of-equality-should-come-up-at-Indu-Mill-site-Ambedkar/articleshow/11330635.cms. 2019-06-30 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  9. ^ http://www.yourspj.com/statue-of-equality-diversion-from-objective/
  10. ^ DNA India (इंग्रजी भाषेत) https://www.dnaindia.com/mumbai/report-govt-dithers-even-on-statue-of-equality-plan-1662960. 2019-06-30 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ Loksatta https://www.loksatta.com/mumbai-news/ambedkar-memorial-expenditure-increased-by-166-crores-1553297/. 2019-06-30 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  12. ^ Jun 22, Sujit Mahamulkar | TNN | Updated:; 2019; Ist, 9:21. The Times of India (इंग्रजी भाषेत) https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/ambedkar-statue-at-indu-mills-will-be-indias-second-tallest/articleshow/69900038.cms. 2019-06-30 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  13. ^ http://www.business-standard.com/article/pti-stories/announce-indu-mills-land-allotment-for-memorial-before-dec-6-114120401263_1.html. Missing or empty |title= (सहाय्य)
  14. ^ PTI (20 October 2015). The New Indian Express http://www.newindianexpress.com/nation/PM-Lays-Foundation-Stone-of-Ambedkar-Memorial-Sena-Stays-Away/2015/10/11/article3074585.ece. 20 October 2015 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  15. ^ माझा पेपर
  16. ^ Dainik Bhaskar (हिंदी भाषेत) https://www.bhaskar.com/news/MH-ambedkar-statue-installation-news-hindi-5401395-PHO.html. 2019-06-30 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  17. ^ दैनिक भास्कर
  18. ^ http://indianexpress.com/article/cities/mumbai/pm-modi-to-be-briefed-on-how-ambedkar-memorial-will-look/. Missing or empty |title= (सहाय्य)
  19. ^ http://indianexpress.com/article/cities/mumbai/ambedkar-memorial-on-12-acre-indu-mill-land-project-to-cost-state-rs-425-crore/. Missing or empty |title= (सहाय्य)
  20. ^ I am in DNA of India. 8 October 2015 http://www.iamin.in/en/mumbai-south/news/work-ambedkar-memorial-commence-november-72115. 20 October 2015 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  21. ^ NDTV.com. 11 October 2015 http://www.ndtv.com/india-news/pm-narendra-modi-lays-foundation-stone-of-ambedkar-memorial-in-mumbai-1230859. 20 October 2015 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  22. ^ Rashid, Omar (11 October 2015). The Hindu http://www.thehindu.com/news/national/other-states/ambedkar-family-not-satisfied-with-memorial-design/article7750340.ece. 20 October 2015 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  23. ^ http://indianexpress.com/article/cities/mumbai/ambedkar-memorial-design-fails-to-impress-dalit-leaders/. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे