स्मृती इराणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्मृती इराणी

स्मृती इराणी (जन्म : २४ मार्च, १९७६, दिल्ली, जन्मनाव: स्मृती मल्होत्रा) ही एक भारतीय राजकारणी व माजी दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. मॉडेलिंगने आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या स्मृतीने १९९७ सालच्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. २००० साली तिला स्टार प्लस ह्या वाहिनीवरील एकता कपूरच्या क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये आघाडीची भूमिका मिळाली. ह्या भूमिकेसाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले.

२००३ साली स्मृतीने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला व २००४ लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणुक लढवली.

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये ती अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधी विरुद्ध उभी राहिली होती.

नरेंद्र मोदी ह्यांच्या पंतप्रधानपदाखालील केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणीला मनुष्यबळ विकासमंत्री (Minister of Human Resource Development) हे कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले आहे.

स्मृती इराणी याछी भूमिका असलेल्या दूरचित्रवाणी मालिका[संपादन]

  • आतिश
  • क्यूँ की सास भी कभी बहू थी
  • थोड़ी सी ज़मीन थोड़ा सा आसमाँ
  • रामायण
  • विरुद्ध
  • हम हैं कल, आजकल और कल