"भास्करबुवा बखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:

१९११ साली भास्करबुवांनी [[भारत गायन समाज]] ही संस्था हिंदुस्तानी संगीत पद्धतीच्या प्रसारार्थ स्थापली. त्यांनी [[किर्लोस्कर नाटक मंडळी|किर्लोस्कर नाटक मंडळीतर्फे]] 'रामराज्यवियोग' या नाटकात [[मंथरा|मंथरेची]], [[संगीत सौभद्र]] या नाटकात नारदाची आणि [[संगीत शाकुंतल|संगीत शाकुंतलात]] शकुंतलेची भूमिकाही साकारल्या होत्या. त्यांनी व [[गोविंदराव टेंबे]] यांनी [[संगीत मानापमान]] व [[संगीत स्वयंवर]] नाटकांच्या पदांच्या चाली बांधल्या होत्या. याशिवाय '''भास्करबुवा बखले''' यांनी संगीत द्रौपदी व संगीत विद्याहरण या नाटकांचे संगीत दिग्दर्शनही केले होते.

संगीत स्वयंवर या नाटकाला १० डिसेंबर २०१६ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने देवगंधर्व भास्करबुवा बखले यांचे साथीदार ऑर्गनवादक हरीभाऊ देशपांडे यांनी ऑर्गनवर वाजविलेली स्वयंवर नाटकातली गाणी [https://www.youtube.com/watch?v=XDsErJnhWuo येथे] ऐकता येतात.

दुर्दैवाने भास्करबुवांच्या आवाजातली एकही कलाकृति ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध नाही. त्यांनी ग्वाल्हेर घराण्याच्या संगीताबद्दल लिहिलेले अर्धेमुर्धे पुस्तक भास्कबुवांच्या शैला दातार या नातसुनेने पूर्ण करून प्रकाशित केले आहे.

==स्मृति महोत्सव==
==स्मृति महोत्सव==
* पुण्याचा भारत गायन समाज दरवर्षी भास्करबुवांच्या स्मृतिदिनी संगीत समारोह आयोजित करतो.

* भास्करबुवांच्या स्मरणार्थ १९२६मध्ये स्थापन झालेला मुंबईतील कल्याण गायन समाज, वर्षभर विविध संगीत सभा तर घेतोच, शिवाय त्यांच्या वर्षदिनी देवगंधर्व संगीत महोत्सव भरवतो.
* पुण्याचा भारत गायन समाज दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनी संगीत समारोह आयोजित करतो.
* भास्करबुवांच्या स्मरणार्थ १९२६मध्ये स्थापन झालेला मुंबईतील कल्याण गायन समाज, वर्षभर विविध संगीत सभा तर घेतोच, शिवाय त्यांच्या वर्षदिनी देव गंधर्व संगीत महोत्सव भरवतो.
* चंदीगडमधील प्राचीन कला केंद्र दरवर्षी अखिल भारतीय भास्करराव नृत्य व संगीत संमेलन आयोजित करते.
* चंदीगडमधील प्राचीन कला केंद्र दरवर्षी अखिल भारतीय भास्करराव नृत्य व संगीत संमेलन आयोजित करते.
* पुणे विद्यापीठ पंडित बी.ए.ला संगीतात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला भास्करबुवा बखले पुरस्कार देते.
* पुणे विद्यापीठ पंडित बी.ए.ला संगीतात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला भास्करबुवा बखले पुरस्कार देते.

०२:१६, १९ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

भास्करबुवा बखले, म्हणजे भास्कर रघुनाथ बखले (ऑक्टोबर १७, १८६९ - एप्रिल ८, १९२२) हे मराठी हिंदुस्तानी संगीत परंपरेतले गायक, संगीतकार होते. त्यांचा जन्म सुरतजवळील कठोर या गावी झाला. बडोद्यातील कीर्तनकार पिंगळेबुवा यांच्याकडे त्यांनी गायनकलेचा श्रीगणेशा केला. पुढे ख्यातनाम बीनकार बंदे अलीखाँ यांनी बखलेंची शिकवणी घेतली. फैजमहंमदखाँ, नथ्थनखाँ आग्रेवाले यांच्याकडे भास्करबुवांचे पुढचे शिक्षण झाले. या सगळ्या अथक मेहनतीनंतर भास्करबुवा बखले यांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर या घराण्यांच्या गायकींवर प्रभुत्व मिळवले. नाट्यगीत, ठुमरी, भजन, टप्पा, पंजाबी लोकसंगीत, लावणी, गझल, ध्रुपद धमार, आणि ख्यालगायन या सगळ्यांवर भास्करबुवांची विलक्षण हुकमत होती. संगीतकलेवरील त्यांचे प्रभुत्व पाहून लोक त्यांना देवगंधर्व म्हणू लागले.

शास्त्रीय संगीतावर आधारित चिजांच्या चाली मराठी आणून भास्करबुवांनी मराठी नाट्यगीते संगीतबद्ध केली. किर्लोस्कर व गंधर्व नाटक कंपन्यांत त्यांनी संगीत विषयाचे प्रमुख गुरू म्हणून काम केले. बालगंधर्व, मास्टर कृष्णराव, गोविंदराव टेंबे आदींनी भास्करबुवा बखले यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. जालंधर, सियालकोट, कराची, म्हैसूर येथील मैफिली भास्करबुवांनी गाजवल्या.

१९११ साली भास्करबुवांनी भारत गायन समाज ही संस्था हिंदुस्तानी संगीत पद्धतीच्या प्रसारार्थ स्थापली. त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीतर्फे 'रामराज्यवियोग' या नाटकात मंथरेची, संगीत सौभद्र या नाटकात नारदाची आणि संगीत शाकुंतलात शकुंतलेची भूमिकाही साकारल्या होत्या. त्यांनी व गोविंदराव टेंबे यांनी संगीत मानापमानसंगीत स्वयंवर नाटकांच्या पदांच्या चाली बांधल्या होत्या. याशिवाय भास्करबुवा बखले यांनी संगीत द्रौपदी व संगीत विद्याहरण या नाटकांचे संगीत दिग्दर्शनही केले होते.

संगीत स्वयंवर या नाटकाला १० डिसेंबर २०१६ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने देवगंधर्व भास्करबुवा बखले यांचे साथीदार ऑर्गनवादक हरीभाऊ देशपांडे यांनी ऑर्गनवर वाजविलेली स्वयंवर नाटकातली गाणी येथे ऐकता येतात.

दुर्दैवाने भास्करबुवांच्या आवाजातली एकही कलाकृति ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध नाही. त्यांनी ग्वाल्हेर घराण्याच्या संगीताबद्दल लिहिलेले अर्धेमुर्धे पुस्तक भास्कबुवांच्या शैला दातार या नातसुनेने पूर्ण करून प्रकाशित केले आहे.

स्मृति महोत्सव

  • पुण्याचा भारत गायन समाज दरवर्षी भास्करबुवांच्या स्मृतिदिनी संगीत समारोह आयोजित करतो.
  • भास्करबुवांच्या स्मरणार्थ १९२६मध्ये स्थापन झालेला मुंबईतील कल्याण गायन समाज, वर्षभर विविध संगीत सभा तर घेतोच, शिवाय त्यांच्या वर्षदिनी देवगंधर्व संगीत महोत्सव भरवतो.
  • चंदीगडमधील प्राचीन कला केंद्र दरवर्षी अखिल भारतीय भास्करराव नृत्य व संगीत संमेलन आयोजित करते.
  • पुणे विद्यापीठ पंडित बी.ए.ला संगीतात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला भास्करबुवा बखले पुरस्कार देते.
  • मुंबई विद्यापीठ असाच एक पुरस्कार एम.ए.ला संस्कृत हा विषय घेऊन पहिला आलेल्या विद्यार्थ्याला देते.

बाह्य दुवे