मेल्चियोर न्डाडाये
Appearance
मेल्चियोर न्डाडाये (इंग्लिश: Melchior Ndadaye; २८ मार्च १९५३ - २१ ऑक्टोबर १९९३) हा बुरुंडी देशाचा चौथा व लोकशाही मार्गाने निवडुन आलेला पहिलाच राष्ट्राध्यक्ष होता. १९९३ साली सत्तेवर आलेल्या हुतू जमातीच्या न्डाडायेने बुरुंडीमधील जातीय तणाव कमी होण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु केवळ ३ महिने राष्ट्राध्यक्षपदावर राहिल्यानंतर २१ ऑक्टोबर १९९३ रोजी त्याची तुत्सी जमातीच्या लोकांनी हत्या केली. त्याच्या हत्येमुळे बुरुंडीमध्ये गृहयुद्ध सुरू झाले जे पुढील १० वर्षे चालू राहिले.