Jump to content

भारतीय प्रजासत्ताक दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रजासत्ताक दिवस या पानावरून पुनर्निर्देशित)
राजपथावरील संचलन - राष्ट्रपतीना मानवंदना

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.[] याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी[] भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर, इ.स. १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती.[] त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.[] या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते.[] भारताचे राष्ट्रगीत म्हणले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये भाषणाचे कार्यक्रम आयोजित केले जाते‌.

इतिहास

[संपादन]

भारतालाया ब्रिटिश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ला स्वातंत्र्य मिळाले.[] यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचेमात्र कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते.

२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली.[] या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला.

उत्सव

[संपादन]

दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते.हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते.[] संचलनाच्या आधी अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात.प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.[]

भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी), रणगाडे समवेत संचलन करतात. भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.[१०] या संचलनाच्या सादरीकरणाची पूर्वतयारी विशेष काळजीपूर्वक आणि शिस्तीने केली जाते इतके या संचलनाचे महत्त्व आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.

प्रजासत्ताक दिन दिल्ली येथील संचलन (१९९४)

बीटिंग रिट्रीट ‎या कार्यक्रमाने प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता केली जाते. सन २०१९ मध्ये, गुगलने खास प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या वेबसाईटच्या भारतीय आवृत्तीवर डुडल दर्शवले.[११]

राष्ट्रीय सुट्टी

[संपादन]

२६ जानेवारी हा राष्ट्रीय समारंभ असल्यामुळे त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. २६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे. (इतर दोनः स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) व गांधी जयंती (२ ऑक्टोबर)). ह्या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.[१२]

चित्ररथ

[संपादन]

या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. त्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो. या चित्ररथांच्या सादरीकरणाची विशेष पूर्वतयारी सर्व राज्यांचे कलाकार काही दिवस आधी करतात. या चित्ररथ सादरीकरणाला विशेष पारितोषिकही दिले जात असल्याने प्रत्येक राज्य आपापल्या संस्कृतीचे दर्शन अधिक चांगल्या पद्धतीने चित्ररथात दिसून येईल यासाठी प्रयत्न करते.[१३]

ध्वजवंदन

[संपादन]
प्रजासत्ताकदिन झेंडावंदन
शालेय संचलन प्रजासत्ताक दिन

भारतातील सर्व शाळा आणि महाविद्यालये तसेच शासकीय संस्था, खाजगी संस्था, ग्रामपंचायती अशा विविध ठिकाणी २६ जानेवारी रोजी ध्वजवंदन केले जाते आणि भारतीय संविधानाप्रती आदर व्यक्त केला जातो.[१४]

विशेष संचलन

[संपादन]
वायुदल सादरीकरण

स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत १९५० साली राजधानी दिल्ली येथे राजपथावर पहिले संचलन आयोजित करण्यात आले होते.[१५] भारताच्या विविधतेतून एकता या वैशिष्ट्याला ही मानवंदना होती. २०१६ साली ६७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासननाच्या शिष्ट समितीतर्फे मरीन द्राइव्ह येथेही एक संचलन आयोजित करण्यात आले.

डाक कार्यालय तिकीट

संदेश व शुभेच्छापत्रे

[संपादन]

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी देशभक्तीपर गीतांच्या ओळी, तिरंंगा ध्वज आदि संंकल्पनांचा कल्पक वापर करून परस्परांना शुभेच्छा दिल्या जातात.देशाभिमान मनात टिकून राहण्यासाठी भारतीय नागरिक अशा शुभेच्छा एकमेकांना देऊन परस्परांमधले ऐक्य टिकवून ठेवण्याचे आवाहनही करतात.[१६]

प्रमुख अतिथी

[संपादन]

सन १९५० पासून भारत देश प्रजासत्ताक दिनानिमित्त दुसऱ्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भारतात आमंत्रित करतो.[१२]

वर्ष प्रमुख अतिथी देश
१९५० राष्ट्रपती सुकर्णो[१७] इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
१९५१
१९५२
१९५३
१९५४ राजा जिग्मे दोर्जी वांग्चुक

[१८]

भूतान ध्वज भूतान
१९५५ गव्हर्नर जनरल मलिक घुलाम मुहम्मद [१७] पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
१९५६
१९५७
१९५८
१९५९
१९६० राष्ट्रपती क्लिमेंट वोरोशिलोव्ह[१९] Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ
१९६१ राणी एलिझाबेथ दुसरी[१७] Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९६२
१९६३ राजा नोरोडोम सिंहनौक[२०] कंबोडिया ध्वज कंबोडिया
१९६४
१९६५ खाद्य व शेतीमंत्री राणा अब्दूुल हमीद पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
१९६६
१९६७
१९६८ पंतप्रधान अलेक्सेइ कोसिजिन Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ
राष्ट्रपती जोसेफ ब्रोझ टिटो[२१] Flag of the Socialist Federal Republic of Yugoslavia युगोस्लाव्हिया
१९६९ पंतप्रधान टोडोर झिव्हकोव्ह[२२] बल्गेरिया ध्वज बल्गेरिया
१९७०
१९७१ राष्ट्रपती ज्युलिअस न्यरेरे[२३] टांझानिया ध्वज टांझानिया
१९७२ पंतप्रधान शिवसागर रामगुलाम[२४] मॉरिशस ध्वज मॉरिशस
१९७३ राष्ट्रपती मोबुटु सेसे सेको[२५] झैर ध्वज झैर
१९७४ राष्ट्रपती जोसेफ ब्रोझ टिटो Flag of the Socialist Federal Republic of Yugoslavia युगोस्लाव्हिया
पंतप्रधान सिरिमावो भंडारनायके[२६] श्रीलंका ध्वज श्रीलंका
१९७५ राष्ट्रपती केनेथ कॉंडा[२७] झांबिया ध्वज झांबिया
१९७६ पंतप्रधान जाक शिराक[१७] फ्रान्स ध्वज फ्रान्स
१९७७ प्रथम सचिव एडवर्ड जिरिएक[२८] पोलंड ध्वज पोलंड
१९७८ राष्ट्रपती पॅट्रिक हिलेरि[२९] आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
१९७९ पंतप्रधान माल्कम फ्रेझर[३०] ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
१९८० राष्ट्रपती व्हॅलेरी जिस्कॅर देस्तें[१७] फ्रान्स ध्वज फ्रान्स
१९८१ राष्ट्रपती होजे लोपेझ पोर्तियो[३१] मेक्सिको ध्वज मेक्सिको
१९८२ राजा हुआन कार्लोस पहिला, स्पेन[३२] स्पेन ध्वज स्पेन
१९८३ राष्ट्रपती शेहु शगारी[३३] नायजेरिया ध्वज नायजेरिया
१९८४ राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक[३४] भूतान ध्वज भूतान
१९८५ राष्ट्रपती राउल अल्फोन्सिन[३५] आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
१९८६ पंतप्रधान आंद्रिआस पापेन्द्रु ग्रीस ध्वज ग्रीस
१९८७ राष्ट्रपती ॲलन गार्शिया[३६] पेरू ध्वज पेरू
१९८८ राष्ट्रपती जूनिअस रिचर्ड जयवर्धने[३७] श्रीलंका ध्वज श्रीलंका
१९८९ जनरल सेक्रेट्री ङुयेन वॅन लिन्ह[३८] व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
१९९० पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ[३९] मॉरिशस ध्वज मॉरिशस
१९९१ राष्ट्रपती मॉमून अब्दुल गय्यूम[३९] Flag of the Maldives मालदीव
१९९२ राष्ट्रपती मारिओ सोआरेस[३९] पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल
१९९३ पंतप्रधान जॉन मेजर[१७] Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९९४ पंतप्रधान कोह चोक थोंग[१७] सिंगापूर ध्वज सिंगापूर
१९९५ राष्ट्रपती नेल्सन मंडेला[४०] दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
१९९६ राष्ट्रपती डॉ. फर्नान्डो हेनरिके कार्दोसो[३९] ब्राझील ध्वज ब्राझील
१९९७ पंतप्रधान बसदेव पांडे[३९] त्रिनिदाद आणि टोबॅगो ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
१९९८ राष्ट्रपती जॅक शिराक[१७] फ्रान्स ध्वज फ्रान्स
१९९९ राजा वीरेंद्र वीर विक्रम शाह देव[३९] नेपाळ ध्वज नेपाळ
२००० राष्ट्रपती ओलुसेगुन ओबासान्जो[१७] नायजेरिया ध्वज नायजेरिया
२००१ राष्ट्रपती अब्देलअझीझ बुटेफ्लिका[३९] अल्जीरिया ध्वज अल्जीरिया
२००२ राष्ट्रपती कस्साम उतीम[३९] मॉरिशस ध्वज मॉरिशस
२००३ राष्ट्रपती मोहम्मद खातामी[१७] इराण ध्वज इराण
२००४ राष्ट्रपती लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा[१७] ब्राझील ध्वज ब्राझील
२००५ राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक[३९] भूतान ध्वज भूतान
२००६ देशध्वज अब्दुल्ला बिन अब्देलअझीझ अल-सौद[३९] सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया
२००७ राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन[१७] रशिया ध्वज रशिया
२००८ राष्ट्रपती निकोला सार्कोझी[१७] फ्रान्स ध्वज फ्रान्स
२००९ राष्ट्रपती नुरसुल्तान नझरबायेव[१७] कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
२०१० राष्ट्रपती ली म्युंग बाक[३९] दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
२०११ राष्ट्रपती सुसिलो बांबांग युधोयोनो[४१] इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
२०१२ पंतप्रधान यिंगलक शिनावत[४२] थायलंड ध्वज थायलंड
२०१५ राष्ट्रपती बराक ओबामा[४३] Flag of the United States अमेरिका
२०१६ राष्ट्रपती फ्रान्स्वॉ ओलांद फ्रान्स ध्वज फ्रान्स
२०१७ राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान[४४] संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ . Mahārāshṭra Rājya Sāhitya Sāskr̥ti Maṇḍaḷa. 1973 https://books.google.co.in/books?id=hWhjVWBHdfMC&q=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE+%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%viśvakośa. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ India Republic Day, January 26, 1956 (इंग्रजी भाषेत). Information Service of India. 1956.
  3. ^ "Explained: Why January 26 is celebrated as Republic Day". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-01-23. 2021-01-20 रोजी पाहिले.
  4. ^ "इतिहास भारतीय प्रजासत्ताक दिनाचा". dailyhunt. १९ जानेवारी. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ Khurana, Natasha (25.1.2018). "Flag hoisting on 26th January? Do you know the rules?". times of india. 24.1.2020 रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ Subramanian, S. (1997-01-01). 50 Years Of India'S Independence (इंग्रजी भाषेत). Manas Publications. ISBN 978-81-7049-094-4.
  7. ^ Narayan, Sunetra Sen; Narayanan, Shalini (2018-11-19). India connected: Nav Madhyamanchya prabhavache sameekshan. SAGE Publications India. ISBN 9789353282660.
  8. ^ "Full dress rehearsal for Republic Day parade today, traffic congestion likely in central Delhi". india today. 23.1.2020. 25.1.2020 रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  9. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; :0 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  10. ^ "सार्वभौम देशाचा अभिमान". २४. १. २०१८. 2018-06-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  11. ^ "70th Republic Day: 9 years of Republic Day Google Doodles celebrating India". india today. 26.1.2019. 26.1.2020 रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  12. ^ a b सकाळ न्यूझ नेटवर्क (२२.१.२०२०). "https://www.esakal.com/desh/who-are-guests-years-republic-day-254700". २५.१.२०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in |title= (सहाय्य)
  13. ^ "प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक". २९. १. २०१७. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  14. ^ "झंडा उॅंचा रहे हमारा..... देशभरात तिरंग्याला सलामी, सोशल मीडिया 'हिंद'मय". online Lokmat. २६. १. २०१९. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  15. ^ "10 things you did not know about Republic Day". india today. 26.1.2015. 25.1.2020 रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  16. ^ "Happy Republic Day 2017: देशवासीयांना द्या 'प्रजासत्ताक दिना'च्या शुभेच्छा." २६. १. २०१७. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  17. ^ a b c d e f g h i j k l m n Choosing the Republic Day chief guest: continuing principle, changing preferences Indian Express
  18. ^ "संग्रहित प्रत" (PDF). 2016-04-17 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2012-07-21 रोजी पाहिले.
  19. ^ Dr. Rajendra Prasad, correspondence and select documents: Volume seventeen ... – Rajendra Prasad. 25 January 2012 रोजी पाहिले.
  20. ^ Indian information – India. Ministry of Information and Broadcasting – Google Boeken. 1 January 1957. 25 January 2012 रोजी पाहिले.
  21. ^ Revolutionary Socialist Party (1968). The Call. 25 January 2012 रोजी पाहिले.
  22. ^ Asian recorder. 1969. 25 January 2012 रोजी पाहिले.
  23. ^ India. Ministry of Information and Broadcasting (1971). India. 25 January 2012 रोजी पाहिले.
  24. ^ India. Ministry of External Affairs (1972). Foreign affairs record. 25 January 2012 रोजी पाहिले.
  25. ^ द टाइम्स ऑफ इंडिया directory and year book including who's who. द टाइम्स ऑफ इंडिया. 1974. 25 January 2012 रोजी पाहिले.
  26. ^ India. Ministry of Information and Broadcasting. Publications Division (1973). Indian and foreign review. 25 January 2012 रोजी पाहिले.
  27. ^ India. Parliament. House of the People; India. Parliament. Lok Sabha (1975). Lok Sabha debates. 25 January 2012 रोजी पाहिले.
  28. ^ Eastern economist. 1977. 25 January 2012 रोजी पाहिले.
  29. ^ "Patrick J. Hillery". 2022-06-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 January 2012 रोजी पाहिले.
  30. ^ "Bilateral Visits". 2014-02-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 January 2012 रोजी पाहिले.
  31. ^ "Annual REPORT 1980-81". 25 January 2012 रोजी पाहिले.
  32. ^ "Annual REPORT 1981-82". 25 January 2012 रोजी पाहिले.
  33. ^ "Annual REPORT 1983-84". 25 January 2012 रोजी पाहिले.
  34. ^ "Annual REPORT 1984-85". 25 January 2012 रोजी पाहिले.
  35. ^ "India-Kiribati Relations" (PDF). 25 January 2012 रोजी पाहिले.
  36. ^ "Annual Report". 2012-03-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 January 2012 रोजी पाहिले.
  37. ^ "Annual Report". 2012-03-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 January 2012 रोजी पाहिले.
  38. ^ "संग्रहित प्रत". 2012-03-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-07-21 रोजी पाहिले.
  39. ^ a b c d e f g h i j k Choosing R-Day chief guest: Behind the warm welcome, a cold strategy Indian Express, 25 Jan 2010
  40. ^ "General South African History timeline" sahistory.org.za Accessed on 13 June 2008.
  41. ^ "Indonesian President next R-Day parade chief guest – Rediff.com India News". 25 January 2012 रोजी पाहिले.
  42. ^ New Delhi, 2 Dec (IANS) (20 January 2012). "Thai PM to be chief guest on India's Republic Day". Deccan Herald. 25 January 2012 रोजी पाहिले.
  43. ^ "राजपथावर ओबामांना भारतीय लष्करी सामर्थ्य आणि संस्कृतीचे दर्शन". २६ जानेवारी, २०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  44. ^ "राजपथावर प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा; भारताच्या सामर्थ्य-संस्कृतीचे जगाला दर्शन". २६ जानेवारी, २०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)