शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान (अरबी: محمد بن زايد بن شيطان آل نهيان; ११ मार्च, इ.स. १९६१ - ) अबु धाबीचे राजपुत्र आहेत. हे संयुक्त अरब अमिरातींच्या सशस्त्र सेनांचे उपसर्वोच्च सेनापती आहेत . हे २६ जानेवारी, २०१७ रोजी भारताच्या ६८व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले होते.