Jump to content

पायदळ सैनिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पायदळ या पानावरून पुनर्निर्देशित)

पायी चालून शत्रूशी लढाई करणाऱ्या सैन्यदलांस पायदळ म्हणतात. हा सर्वात जुना सैन्यदल प्रकार आहे.
युद्धात संख्येने सर्वात जास्ती असणारे पायदळ हातघाईच्या लढाईत पारंगत असते. प्राचीन तसेच आधुनिक काळांतही पायदळ हे सैन्याचा कणा मानले जाते. इतर दळांच्या मानाने युद्धात पायदळाची हानी जास्ती होते.

रॉयल आयरिश रॅफल्स राशन पार्टी, १९१६

सैन्यातील इतर दळांच्या मानाने पायदळाचे प्रशिक्षण खडतर असते व त्यांत शिस्त, आक्रमकता आणि शारीरिक क्षमतेवर जास्ती भर दिला जातो.
दुसऱ्या महायुद्धापासून तंत्रज्ञान प्रगत होत गेल्याने सैन्यातील (मुख्यतः पश्चिमात्य देशांतील) पायदळाचा आकार कमी होत गेलेला आढळतो. उदा. अमेरिकन सैन्यात पायदळाची संख्या केवळ ४९,००० आहे. (एकूण सैन्यदलः ४,५०,०००)[][]

पर्शियन पायदळ

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "कारकीर्द ॲंड जॉब्स: इन्फंट्रीमन (11B) GoArmy.com". 2011-08-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-29 रोजी पाहिले.
  2. ^ ऍक्टिव्ह ड्युटी पर्सनल बाय रॅंक