महाराष्ट्राचा चित्ररथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पंढरीची वारी या विषयावर महाराष्ट्राने २०१५ साली सादर केलेला चित्ररथ

२६ जानेवारी या भारताच्या प्रजासत्ताकदिनी नवी दिल्ली येथे भारताचे राष्ट्रपती यांच्या अध्यक्षतेखाली ’राजपथा’वरून एक मोठी मिरवणूक निघते. या मिरवणुकीत सैनिकांचे आणि अन्य गटांचे संचलन होते. भारतातील विविध राज्यांचे, तसेच विविध मंत्रालयांचे आपापली संस्कृती दर्शविणारे चित्ररथ या मिरवणुकीत सामील होतात..

वर्षनिहाय महाराष्ट्राचे चित्ररथ[संपादन]

  • इ.स.१९६० साली महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पहिली ११ वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ संचलनात सहभागी नव्हता.
  • इ.स.१९८० - शिवराज्याभिषेक या विषयावरील चित्ररथास प्रथमच अव्वल पारितोषिक मिळाले.
  • इ.स.१९८३- बैलपोळा विषयावरील चित्ररथ सर्वोत्तम ठरला.
  • इ.स.१९९४-शताब्दी
  • इ.स.१९९५-हापूस आंबे व बापू स्मृती

या विषयांवरील चित्ररथांनी देशात प्रथम क्रमांक मिळविण्याची हॅटट्रिक महाराष्ट्राने केली. इ.स. १९८६, १९८८, व २००९ मध्ये महाराष्ट्र राज्याचा अग्रक्रमांक थोडक्‍यात हुकला होता.

  • इ. स. २०१४ - नारळी पौर्णिमा[१]

शिवराज्याभिषेक' या विषयावर आधारित चित्ररथाची संकल्पना जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे निवृत्त प्राध्यापक नरेंद्र विचारे यांची होती. राजपथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने कविराज भूषण यांच्या "इंद्र जिमि जंभ पर, बाढव सुअंभ पर, रावन सदंभ पर, रघुकुलराज है" या काव्याच्या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेकाचा हा सोहळा दर्शवण्यात आला. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या नेतृत्वाखालील चमूने हा चित्ररथ साकारला.[३] .

इ.स.२०१९- हा चित्ररथ महात्मा गांधी यांच्या "चले जाव" चळवळीवर आधारित आहे.[४]


  • इ.स २०२१ - यावर्षी वारकरी संत परंपरा या विषयावर आधारित चित्ररथ सादर होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांची आठ फूट उंचीची आसनस्थ मूर्ती हे या चित्ररथाचे आकर्षण आहे. ज्ञानेश्वरांच्या मूर्तीसमोर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ दाखविण्यात आला आहे.[५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "राजपथावर 'नारळी पौर्णिमा'!". २३. १. २०१४. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "महाराष्ट्राचा चित्ररथ अव्वल". २८. १. २०१८. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ http://www.clearmpsc.com/2018/01/blog-post_90.html?m=1[permanent dead link]
  4. ^ "प्रजासत्ताक चित्ररथाला 'निळकंठ'च्या 'वंदे मातरम'ची साथ". २१. १. २०१९. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "Republic Day 2021: प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा 'वारकरी संतपरंपरे'वर आधारित चित्ररथ सज्ज". www.timesnowmarathi.com. 2021-01-22. Archived from the original on 2021-01-22. 2021-01-24 रोजी पाहिले.