सुसिलो बांबांग युधोयोनो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुसिलो बांबांग युधोयोनो
Susilo Bambang Yudhoyono

इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२० ऑक्टोबर २००४ – २० ऑक्टोबर २०१४
मागील मेगावती सुकर्णोपुत्री
पुढील जोको विडोडो

डेमोक्रॅटिक पक्षाचा चेरमन
कार्यकाळ
२३ फेब्रुवारी २०१३ – मार्च २०२०
मागील अनस अर्बनिंग्रम
पुढील अगस हरिमूर्ती युधोयोनो

खाण व उर्जा मंत्री
कार्यकाळ
२३ ऑक्टोबर १९९९ – २६ ऑगस्ट २०००
राष्ट्रपती अब्दुररहमान वाहिद

जन्म ९ सप्टेंबर, १९४९ (1949-09-09) (वय: ७४)
पासितान, पूर्व जावा
धर्म इस्लाम धर्म
सही सुसिलो बांबांग युधोयोनोयांची सही

सुसिलो बांबांग युधोयोनो (बासा जावा: Susilå Bambang Yudhåyånå; सप्टेंबर ९, इ.स. १९४९) हा इंडोनेशिया देशामधील एक राजकारणी, लष्करी अधिकारी व माजी राष्ट्राध्यक्ष आहे. तो ऑक्टोबर २००४ ते ऑक्टोबर २०१४ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता.

२००४ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये मेगावती सुकर्णोपुत्रीला पराभूत करून युधोयोनो सत्तेवर आला. २००९ सालच्या निवडणुकीमध्ये पुन्हा विजय मिळवून त्याने सत्ता राखली. इंडोनेशियाच्या संविधानानुसार एका व्यक्तीला केवळ दोन वेळा (कमाल १० वर्षे) राष्ट्राध्यक्ष राहता येते. त्यानुसार २० ऑक्टोबर २०१४ रोजी युधोयोनो सत्तेवरून पायउतार झाला.

बाह्य दुवे[संपादन]