राजपथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजपथावरील इंडिया गेट दृश्य

राजपथ हा भारत देशाची राजधानी दिल्ली येथील उत्सवी काळात वापरला जाणारा प्रशस्त रस्ता आहे. राजाचा पंथ अशा अर्थी याला राजपथ म्हणून ओळखले जाते. रायसीना हिल्स येथील राष्ट्रपती भवन येथून हा मार्ग सुरू होतो. विजय चौक, इंडिया गेट, राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे हा मार्ग संपतो.

वैशिष्ट्ये[संपादन]

या मार्गाच्या दुतर्फा मोठी मोकळी मैदाने आणि वृक्षांच्या रांगा आहेत. भारतातील एक महत्त्वाचा रस्ता म्हणून हा ओळखला जातो. भारतीय प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी होणारी विशेष संचलन मिरवणूक याच मार्गाने दरवर्षी निघते. या रस्त्याला जनपथ नावाचा मार्ग छेदून जातो.