सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालयाचे प्रवेशद्वार
सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालयाचे प्रवेशद्वार

सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय हे औरंगाबाद मधील उद्यान व प्राणी संग्रहालय आहे. हे उद्यान १९८५ मध्ये छोट्या स्वरूपात सुरु करण्यात आले होते. हे उद्यान शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजूला आहे. सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयात विविध प्रकारचे २०० पेक्षा जास्त प्राणीपक्षी आहेत. हे एक राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील एक प्रमुख प्रेक्षणिय स्थळ असून विद्यार्थ्यांच्या सहलीसह लाखो पर्यटक दरवर्षी प्राणिसंग्रहालयाला भेटी देतात. याचे "सिद्धार्थ" नाव हे गौतम बुद्धांच्या नावावरून ठेवण्यात आले आलेले असून उद्यानात बुद्धांचा एक भव्य पुतळा बसवण्यात आला आहे.[१]

प्राण्यांसाठी असलेली अपुरी जागा, सोयी-सुविधांचा अभाव, चुकीच्या पद्धतीने ठेवलेले पिंजरे या कारणांमुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने २६ नोव्हेंबर २०१८ रोजी या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली होती.[२] मात्र पुढे १२ डिसेंबर २०१८ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने या निर्णयास स्थगिती दिली.[३]

प्राणी संपदा[संपादन]

डिसेंबर २०१८ नुसार, सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे.[४]

अ.क्र. प्राणी संख्या
वाघ
बिबटे
हरीण, काळवीट ४८
सांबर ४७
नीलगाय
चितळ
कोल्हे
सायाळ
तडस
१० माकड १०
११ साप १००
१२ पक्षी १९
१३ मगर

संदर्भ[संपादन]

  1. ^ "वृक्ष, वन्यप्राण्यांचे सवंर्धन करा". Maharashtra Times (mr मजकूर). 2018-12-13. 2019-01-10 रोजी पाहिले. 
  2. ^ "सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची परवानगी केली रद्द, महानगरपालिकेचा निष्काळजीपणा भोवला". divyamarathi (mr मजकूर). 2018-12-01. 2019-01-10 रोजी पाहिले. 
  3. ^ "आता तरी सुधारणा होणार का?". www.esakal.com (mr मजकूर). 2019-01-10 रोजी पाहिले. 
  4. ^ औरंगाबाद, कृष्णा केंडे, एबीपी माझा (2018-12-01). "औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालय बंद होणार !". ABP Majha (mr मजकूर). 2019-01-10 रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]