मलिक अंबर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मलिक अंबरची खुलताबाद जि.औरंगाबाद येथे असलेली कबर (इ.स. १८६० चे छायाचित्र)

मलिक अंबर (इ.स. १५४६ - इ.स. १६२६) हा मूर्तझा निजामशहा दुसरा ह्या अहमदनगरच्या निजामाचा प्रधान होता.मलिक् अम्बर् याचा जन्म अन्दाजे १५४९ मधे एका ह्ब्शी परिवारामधे झाला. मलिक अंबर युद्धशास्त्र आणि प्रशासनात पारंगत असणारा कर्तृत्ववान आणि स्वामीनिष्ठ प्रधान होता. त्याने मोडकळीस आलेली दख्खन प्रांतातली महसूल-व्यवस्था सुधारली. खडकी (सध्याचे औरंगाबाद) ह्या शहराची स्थापना मलिक अंबरने केली.

सुरुवातीचा काळ[संपादन]

मलिक अंबर हा जन्माने हबशी होता.malik [१] त्याच्या आई-वडीलांनी दारिद्र्याला कंटाळून त्याला गुलाम म्हणून विकला होता. पुढे भारतात आल्यावर त्याने आपल्या कर्तृत्वाने १५०० सैनिकांचे स्वतःचे सैन्यपथक उभारले आणि तो दख्खन प्रांतात राज्य करणाऱ्या राजांची चाकरी करु लागला.

महसूल व्यवस्था[संपादन]

दुसऱ्या मूर्तझा निजामशहाच्या पदरी सेवेत असताना प्रधान म्हणून त्याची प्रगती झाली. अनेक वर्षांच्या प्रशासनाच्या अनुभवातून प्रत्येक जमिनीच्या तुकड्याचे सरासरी उत्पन्न त्याने निश्चीत केले आणि ह्या उत्पन्नाच्या दोन पंचमांश उत्त्पन्न महसूल म्हणून गोळा करण्यास त्याने सुरुवात केली. इ.स. १६१४ पासून पुढे हा महसूल धान्याच्या स्वरुपात न गोळा करता पैशाच्या रुपात गोळा करण्यास सुरुवात केली आणि महसूलाचा वाटा एक तृतियांशापर्यंत कमी केला. त्याने त्या काळी उत्तर भारतात प्रचलित असणाऱ्या व्यवस्थेसारखा हा महसूलाचा वाटा हा ठरावीक रक्कमेवर निश्चीत न करता प्रत्येक वर्षाच्या शेतकी उत्पन्नानुसार बदलण्याची मुभा दिली.

त्यामूळे कष्टकरी शेतकऱयांमधे तो लोकप्रिय ठरला. सततच्या होणाऱ्या युद्धांमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा ताण कमी झाला.

मृत्यू[संपादन]

८० वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या मलिक अंबरचा मृत्यू इ.स. १६२६ रोजी झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा फतेह खान हा निजामशाहीचा प्रधान झाला.

संदर्भ[संपादन]

  1. [बाँबे प्रेसिडेंसी गॅझेटीयर]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.