चर्चा:छत्रपती संभाजीनगर
औरंगाबाद
[संपादन]औरंगाबाद या लेखात माहितीचौकटीत महानगरपालिका आयुक्त यांचे नाव व राजकिय या उपमथळ्या खाली असलेले नाव वेगवेगळे आहे. कृपया आवश्यक ती दुरुस्ती करावी हि विनंती.
V.narsikar ०६:२२, १३ नोव्हेंबर २००९ (UTC)
औरंगाबाद महसूल विभागाचे आयुक्त आणि औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त असा तो फरक आहे. दुरुस्तीची गरज नाही. -मनोज २२:१५, १५ एप्रिल २०१० (UTC)
आक्षेपार्ह आणि विवादास्पद लिखाण
[संपादन]नमस्कार, साधारणपणे ९ डिसेंबर ते आज २४ डिसेंबर बरीचशी चुकीची संपादने झालीत. मला वाटतं या पानातील चुकीची संपादने दुरुस्त करून, पानाला अर्ध सुरक्षित/सुरक्षित चा साचा लावावा. संतोष गोरे (चर्चा) १९:१४, २४ डिसेंबर २०२० (IST)
- @Goresm: ९ डिसेंबर ते आज २४ डिसेंबर पर्यंतचे सर्व संपादने पूर्ववत केले गेले आहेत. --संदेश हिवाळेचर्चा १९:४५, २४ डिसेंबर २०२० (IST)
@Sandesh9822 आणि संदेश हिवाळे: धन्यवाद! संतोष गोरे (चर्चा) २०:३५, २४ डिसेंबर २०२० (IST)
इतर नाव व मुख्य नाव
[संपादन]"इतर नाव" (५२ दारांचे शहर) हे "मुख्य नावाच्या" (औरंगाबाद) खाली दिसले पाहिजे, वर नाही. माहितीचौकट उचीत दुरुस्ती करावी, विनंती. --संदेश हिवाळेचर्चा २१:०७, २४ डिसेंबर २०२० (IST)
- झाले. -- अभय नातू (चर्चा) २२:४७, ३० डिसेंबर २०२० (IST)
छत्रपती संभाजीनगर की औरंगाबाद
[संपादन]@संतोष गोरे लेखाचे शीर्षक कोणते असावे छत्रपती संभाजीनगर की औरंगाबाद? छत्रपती संभाजीनगर हे अधिकृत नाव आहे. --संदेश हिवाळेचर्चा २३:३२, २३ जून २०२३ (IST)
- नमस्कार, शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे अधिकृत झाले असून, औरंगाबाद तालुका, औरंगाबाद जिल्हा, तसेच विविध शासकीय विभाग यांचे नाव बदलणे बाकी आहे. परंतु आपण जे संदर्भासाठी दुवे वापरतो, त्यात वर्तमान पत्राचे संकेतस्थळ हे प्रमुख असून त्यात असा स्पष्ट उल्लेख आढळून येत नाही. सर्व बातम्या ह्या वरकरणी आहेत. यामुळे छत्रपती संभाजीनगर हे नाव जरी अधिकृत झाले असले तरीही अनेक जण यात बदल करत राहतात. पर्यायाने संपादन युद्ध सुरू राहते. तेव्हा मला वाटते तूर्तास न्यायालयीन निकाल येई पर्यंत तरी आपण यात फारशी ढवळाढवळ करू नये. @अभय नातू आपले यावर काय मत आहे. -संतोष गोरे ( 💬 ) ०८:४९, २४ जून २०२३ (IST)
- नमस्कार. शहराचे नाव 'छत्रपती संभाजीनगर' असे अधिकृत झाले असल्याने लेख शीर्षक हेच असावेसे वाटते. तालुका, जिल्हा व विभाग यांची नावे न्यायालयीन निकाल येई पर्यंत तशीच ठेवुयात. --संदेश हिवाळेचर्चा १८:४५, २५ जून २०२३ (IST)
- नावबदलाच्या अधिकृत घोषणेबद्दलच्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाचा संदर्भ देउन मगच शीर्षक बदलावे
- अभय नातू (चर्चा) ०८:०१, ५ जुलै २०२३ (IST)
- @अभय नातू, संतोष गोरे, आणि Eaglespirit:
- महाराष्ट्र राज्य शासनाने १५ सप्टेंबर २०२३ रोजी राजपत्र प्रकाशित करुन औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर जिल्हा असे अधिकृतपणे बदलले आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्याचेही नाव धाराशिव जिल्हा झाले आहे. या जिल्ह्यांच्या नावासोबतच त्यांचे उपविभाग, तालुका, आणि गाव/शहर यांची देखील नावे बदलण्यात आली आहेत. कृपया पहावे - संदर्भ १ संदर्भ २ . कृपया नोंद घ्यावी की, यानुसार संबंधित लेखांच्या शीर्षकांमध्ये सुद्धा बदल केला जाईल. --संदेश हिवाळेचर्चा १५:५३, १६ सप्टेंबर २०२३ (IST)
- माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आता संपादन युद्ध थोडे कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया.- संतोष गोरे ( 💬 ) १७:३६, १६ सप्टेंबर २०२३ (IST)
औरंगाबाद शहराच्या नावाचे न्यायालयीन निकाल ये पर्यन्त औरंगाबाद वापरावे.
[संपादन]नमस्कार, शहराचे नाव बदलण्यासाठी बरीच राजकीय लढाई सुरू आहे, मला वाटते की आपण आपल्या देशाच्या न्यायालयाच्या निकालाची वाट पहावी. अन्यथा ये लेखात बदल करण्याचा युद्ध चालत राहणार. @संतोष गोरे Eaglespirit (चर्चा) ००:३३, २६ ऑगस्ट २०२३ (IST)
- आपणास विविध ठिकाणी चर्चा झाल्याशिवाय बदल करू नका अशी विनंती केली होती. तरीही आपण चर्चा पूर्ण न करता प्रत्येक वेळी बदल करत आहात. त्यामुळे आपणास एक महिन्यासाठी प्रतिबंधित करण्यात येत आहे.- संतोष गोरे ( 💬 ) ०६:०४, २६ ऑगस्ट २०२३ (IST)