ऑक्टोबर २५
Appearance
<< | ऑक्टोबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑक्टोबर २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २९८ वा किंवा लीप वर्षात २९९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]विसावे शतक
[संपादन]- १९०० - युनायटेड किंग्डमने ट्रान्सव्हाल बळकावले.
- १९२० - चौऱ्याहत्तर दिवस उपोषण केल्यानंतर आयर्लंडच्या कॉर्क शहराच्या महापौर टेरेन्स मॅकस्वीनीचा मृत्यू.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेची यु.एस.एस. टॅंग पाणबुडी आपल्याच टॉरपेडोचा बळी ठरली.
- १९४४ - दुसरे महायुद्ध-लेयटे गल्फची लढाई - अमेरिका आणि जपानच्या आरमारात फिलिपाईन्सच्या आसपास घनघोर लढाई जुंपली.
- १९४५ - चीनने जपानकडून ताइपेइचा ताबा घेतला.
- १९६२ - युगांडाला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- १९७१ - चीनला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश. ताइपेइची हकालपट्टी.
- १९७७ - डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशनने ओपनव्हीएमएस १.० प्रसिद्ध केले.
- १९८३ - ऑपरेशन अर्जंट फ्युरी - ग्रेनेडातील सशस्त्र उठावात पंतप्रधान मॉरिस बिशप व त्याच्या सहकाऱ्यांच्या मृत्युदंडाच्या सहा दिवसांनी अमेरिकेने ग्रेनेडावर आक्रमण केले.
एकविसावे शतक
[संपादन]- २००१ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज एक्स.पी. ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.
- २००७ - एरबस ए-३८०चे प्रथम प्रवासी उड्डाण.
जन्म
[संपादन]- १३३० - लुई दुसरा, फ्लॅंडर्सचा राजा.
- १८२५ - योहान स्ट्रॉस दुसरा, ऑस्ट्रियन संगीतकार.
- १८३८ - जॉर्जेस बिझेत, फ्रेंच संगीतकार.
- १८६४ - अलेक्झांडर ग्रेत्चानिनोव्ह, रशियन संगीतकार.
- १८६४ - जॉन फ्रांसिस डॉज, अमेरिकन मोटरकार उद्योजक.
- १८८१ - पाब्लो पिकासो, स्पॅनिश चित्रकार.
- १८८८ - निल्स फोन डार्डेल, स्वीडिश चित्रकार.
- १८९५ - लेव्हि एश्कॉल, इस्रायलचा पंतप्रधान.
- १९२१ - मायकेल, रोमेनियाचा राजा.
- १९२७ - होर्हे बॅटले इबान्येझ, उरुग्वेचा राष्ट्राध्यक्ष.
मृत्यू
[संपादन]- ६२५ - पोप बॉनिफेस पाचवा.
- ११५४ - स्टीवन, इंग्लंडचा राजा.
- १४०० - जॉफ्री चॉसर, इंग्लिश साहित्यिक.
- १४९५ - होआव दुसरा, पोर्तुगालचा राजा.
- १६४७ - एव्हांजेलिस्ता तोरिसेली, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ.
- १७६० - जॉर्ज दुसरा, इंग्लंडचा राजा.
- १९२० - अलेक्झांडर, ग्रीसचा राजा.
- १९६५ - एडुआर्ड आइनस्टाइन, आल्बर्ट आइनस्टाइनचा मुलगा.
- १९८० - साहिर लुधियानवी, हिंदी कवी आणि गीतकार.
- २००३ - पांडुरंगशास्त्री आठवले, हिंदू आध्यात्मिक गुरू.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर २५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑक्टोबर २३ - ऑक्टोबर २४ - ऑक्टोबर २५ - ऑक्टोबर २६ - ऑक्टोबर २७ - ऑक्टोबर महिना