एप्रिल २
(२ एप्रिल या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
<< | एप्रिल २०२१ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | |||||
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
एप्रिल २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९२ वा किंवा लीप वर्षात ९३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]
सतरावे शतक
- १६७९ : सम्राट औरंगजेबाने हिंदूवर ‘जिझिया’ कर लावला.
अठरावे शतक
- १७५५ : सुवर्णदुर्ग किल्ल्यावर इंग्रजांचा कब्जा.
एकोणविसावे शतक[संपादन]
- १८७०:गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे मूळ ’पुणे सार्वजनिक सभा’ आणि ’बॉंम्बे असोसिएशन’ या संस्थांमध्ये आहे असे मानले जाते.
- १८९४: छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.
विसावे शतक[संपादन]
- १९७० : आसाममधून टेकड्यांचा प्रदेश वेगळा करून मेघालय राज्य अस्तित्त्वात आले.
- १९८२:फॉकलंडचे युद्ध - अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.
- १९८४:सोयुझ टी-११ या अंतराळयानातुन राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. तो ७ दिवस २१ तास व ४० मिनिटे अवकाशात होता.
- १९८९:ताणलेले संबंध सुधारण्यासाठी रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे क्यूबातील हॅवाना येथे आगमन
- १९९०:स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बॅंक ऑफ इंडिया (SIDBI) ची स्थापना
- १९९८:कोकण रेल्वे वरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्सप्रेस या गाडीचा शुभारंभ दिल्लीतील निजामुद्दीन स्थानकातुन झाला.
एकविसावे शतक[संपादन]
- २०११ - अठ्ठावीस वर्षांच्या कालखंडानंतर
भारत क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत विजयी.
- २०१७- जम्मू काश्मीरमधील चेनानी ते नशरी या भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या बोगद्यामुळे जम्मू-श्रीनगर हा प्रवास 30 किलोमीटर ने कमी होईल आहे तर या प्रवासातील 2 तास वेळ वाचणार आहे.देशातील या सर्वात मोठ्या बोगद्याची लांबी 9.28 किलोमीटर आहे. 2011 साली या बोगद्याचे काम सुरु झाले होते. जवळपास 7 वर्षांच्या अथक मेहनतीनंतर या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून त्यासाठी 3,700 कोटी रुपये इतका खर्च लागला.
जन्म[संपादन]
- १८९८:हरिन्द्रनाथ चट्टोपाध्यायहरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय – हिन्दी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते. त्यांच्या ’साहिब, बिबी और गुलाम’, ’बावर्ची’ इ. चित्रपटांतील भुमिका विशेष गाजल्या. ते कवी (इंग्रजी), नाटककार, संगीतज्ञही होते. विजयवाडा मतदारसंघातून ते पहिल्या लोकसभेचे खासदार होते. कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे पती व सरोजिनी नायडू यांचे बंधू होत.
- १९०२:बडे गुलाम अली खॉं ऊर्फ ’सबरंग’ – पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक, त्यांच्या ’याद पियाकी आये’, ’का करु सजनी’ इ. ठुमर्या लोकप्रिय आहेत.
- १९२६:सूर्यकांत रामचंद्र खांडेकर – कवी व गीतकार
- १९४२: भारतीय इंग्रजी-अभिनेते रोशन सेठ यांचा जन्म.
- १९६९:अजय देवगण – अभिनेता
- १९७२: भारतीय नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांचा जन्म.
- १९८१: भारतीय स्टॅंड-अप कॉमेडीयन कपिल शर्मा यांचा जन्म.
मृत्यू[संपादन]
- १७२० :पेशवे बाळाजी विश्वनाथ
- १८७२:सॅम्युअल मोर्स – ’मोर्स कोड’ व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार
- १९३३:के. एस. रणजितसिंहजी – कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा, यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून ’रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा’ खेळल्या जातात.
- १९९२:आगाजान बेग ऊर्फ आगा – आपल्या निखळ विनोदानी रसिकांच्या पसंतीस उतरलेले अभिनेते
- २००९:गजाननराव वाटवे – गायक व संगीतकार
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
- जागतिक ऑटिझम जागरूकता दिन
- आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिन
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर एप्रिल २ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च ३१ - एप्रिल १ - एप्रिल २ - एप्रिल ३ - एप्रिल ४ - (एप्रिल महिना)