Jump to content

२०२१ ओमान तिरंगी मालिका (सहावी फेरी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२१ ओमान तिरंगी मालिका (सहावी फेरी)
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन याचा भाग
दिनांक १३-२० सप्टेंबर २०२१
स्थळ ओमान ओमान
निकाल ओमानचा ध्वज ओमानने मालिका जिंकली.
संघ
नेपाळचा ध्वज नेपाळ ओमानचा ध्वज ओमान Flag of the United States अमेरिका
संघनायक
ग्यानेंद्र मल्ल झीशान मकसूद सौरभ नेत्रावळकर

२०२१ ओमान तिरंगी मालिका (सहावी फेरी) ही ओमानमध्ये १३ ते २० सप्टेंबर २०२१ दरम्यान आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यजमान ओमानसह नेपाळ आणि अमेरिका या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्रता ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन या स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आली.

सदर स्पर्धेची ही सहावी फेरी नियोजनाप्रमाणे मार्च २०२१ मध्ये खेळवली जाणार होती, परंतु जगात कोरोनाव्हायरस या रोगाचा फैलाव झाल्यामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. जानेवारी २०२१ मध्ये अमेरिकन क्रिकेट बोर्डाने टेक्सास येथे प्रशिक्षण घेण्यासाठी ४४ खेळाडूंची यादी जाहीर केली. परंतु १२ फेब्रुवारी २०२१ रोजी पुन्हा एकदा कोरोनाव्हायरसमुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. सरतेशेवटी १३ सप्टेंबर पासून स्पर्धा सुरू होईल असे ओमान क्रिकेट बोर्डाने ऑगस्ट २०२१ मध्ये स्पष्ट केले. पुढच्या आठवड्यात लगेचच आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी स्पर्धेचे वेळापत्रक जारी केले. स्पर्धेसाठी सराव करण्यासाठी अमेरिका आणि नेपाळने पापुआ न्यू गिनीविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) द्विपक्षीय मालिका खेळल्या. तेही सामने मस्कतमध्येच पार पडले.

ओमानने तीन सामने जिंकत लीग दोन मध्ये आघाडी कायम ठेवली. अमेरिकेने एक सामना जिंकला तर नेपाळने दोन सामने जिंकले.

गुणफलक

[संपादन]
संघ
खे वि गुण
ओमानचा ध्वज ओमान
नेपाळचा ध्वज नेपाळ
Flag of the United States अमेरिका

सामने

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
१३ सप्टेंबर २०२१
१४:३० (दि/रा)
धावफलक
अमेरिका Flag of the United States
२३०/९ (५० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
२३१/५ (४९ षटके)
मोनांक पटेल १०० (११४)
सुशान भारी २/३१ (१० षटके)
कुशल भुर्टेल ८४ (९३)
निसर्ग पटेल २/३३ (१० षटके)
नेपाळ ५ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: राहुल अशर (ओ) आणि विनोद बाबु (ओ)
सामनावीर: कुशल भुर्टेल (नेपाळ)
  • नाणेफेक : अमेरिका, फलंदाजी.
  • संजय कृष्णमूर्ती (अ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

[संपादन]
१४ सप्टेंबर २०२१
१४:३० (दि/रा)
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१९६ (४७.४ षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
२००/५ (३१.१ षटके)
आसिफ शेख ९० (११२)
बिलाल खान ४/४७ (१० षटके)
जतिंदर सिंग १०७ (६२)
कुशल मल्ल २/३८ (१० षटके)
ओमान ५ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: अहमद शाह पक्तीन (अ) आणि हरिकृष्ण पिल्लई (ओ)
सामनावीर: जतिंदर सिंग (ओमान)


३रा सामना

[संपादन]
१६ सप्टेंबर २०२१
१४:३० (दि/रा)
धावफलक
अमेरिका Flag of the United States
१७८ (४४.४ षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१७९/६ (४९.४ षटके)
एल्मोर हचिन्सन ४९* (६१)
आयान खान २/२९ (९ षटके)
सुरज कुमार ३५ (४५)
सौरभ नेत्रावळकर ३/३९ (१० षटके)
ओमान ४ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: विनोद बाबु (ओ) आणि अहमद शाह पक्तीन (अ)
सामनावीर: मोहम्मद नदीम (ओमान)
  • नाणेफेक : ओमान, क्षेत्ररक्षण.
  • डॉमिनिक रिखी (अ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


४था सामना

[संपादन]
१७ सप्टेंबर २०२१
१४:३० (दि/रा)
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१७४ (४८ षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१७५/४ (२९.३ षटके)
स्टीव्हन टेलर ९२ (६३)
करण के.सी. २/२३ (५ षटके)
अमेरिका ६ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: राहुल अशर (ओ) आणि हरिकृष्ण पिल्लई (ओ)
सामनावीर: स्टीव्हन टेलर (अमेरिका)
  • नाणेफेक : अमेरिका, क्षेत्ररक्षण.
  • गुल्शन झा (ने) आणि काईल फिलिप (अ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


५वा सामना

[संपादन]
१९ सप्टेंबर २०२१
१४:३० (दि/रा)
धावफलक
ओमान Flag of ओमान
१२१ (३७.१ षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१२२/३ (१८.२ षटके)
झीशान मकसूद ४१ (६६)
संदीप लामिछाने ४/१८ (८.१ षटके)
नेपाळ ७ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: राहुल अशर (ओ) आणि अहमद शाह पक्तीन (अ)
सामनावीर: करण के.सी. (नेपाळ)
  • नाणेफेक : नेपाळ, क्षेत्ररक्षण.
  • सुफ्यान मेहमूद (ओ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


६वा सामना

[संपादन]
२० सप्टेंबर २०२१
१४:३० (दि/रा)
धावफलक
ओमान Flag of ओमान
२७४/७ (५० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
२०२ (३९.५ षटके)
झीशान मकसूद ५३ (५३)
नोशतुश केंजीगे ३/४९ (१० षटके)
मोनांक पटेल ५६ (५८)
आयान खान ४/३६ (८ षटके)
ओमान ७२ धावांनी विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: विनोद बाबु (ओ) आणि अहमद शाह पक्तीन (अ)
सामनावीर: आयान खान (ओमान)
  • नाणेफेक : अमेरिका, क्षेत्ररक्षण.
  • पृथ्वीकुमार मच्ची (ओ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.