Jump to content

वेरूळ लेणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


वेरूळची लेणी
कैलासनाथ मंदिराच्या गुहेत खडकाच्या सर्वात वरून पाहिलेले दृश्य
स्थान छत्रपती संभाजी नगर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
क्षेत्रफळ 276 फूट लांब, 154 फूट रुंद
प्रकार सांस्कृतिक
कारण i, iii, vi
सूचीकरण १९८३ साली घोषित (7th session)
नोंदणी क्रमांक क्र. २४३
युनेस्को क्षेत्र आशिया-प्रशांत

वेरूळ लेणी (इंग्रजी: Ellora Caves) ही छत्रपती संभाजी नगर शहरापासून ३० कि.मी. अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहेत. ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण ३४ लेणी आहेत. यामध्ये १२ बौद्ध (लेणे क्र. १ - १२), १७ हिंदू (लेणे क्र. १३ - २९) आणि ५ जैन (लेणे क्र. ३० - ३४) लेणी आहेत. इ.स. १९५१ साली भारत सरकारने या लेण्याला 'राष्ट्रीय स्मारक' म्हणून घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपवण्यात आली. युनेस्कोने इ.स. १९८३ मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला. कैलास मंदिर या जगातील त्याच्या स्थापत्यशास्त्रात अदभुत आहे जे राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्णा (प्रथम) (७५७-७८३) मध्ये बांधण्यात आले होते.

संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरलेले आहे, ते द्रविडी शैलीचे मंदिर म्हणून आकारले गेले आहे. एकूणच २७६ फूट लांब, १५४ फूट रुंद, हे मंदिर केवळ एक खडक कापून बांधले आहे. ते वरपासून खालपर्यंत तयार केले गेले आहे. ते बांधण्यासाठी, खडकातून सुमारे ४० हजार टन दगड काढला गेला. पहिला भाग त्याच्या बांधकामासाठी वेगळे करण्यात आला आणि नंतर हा पर्वत भाग आतून कापला गेला आणि ९० फूट उंच मंदिर बांधण्यात आले. मंदिर बाहेरील बाजूने मूर्तींनी भरलेले आहे. या मंदिराची महल तीन बाजूंच्या वर होती, जी मंदिराच्या वरच्या भागाला जोडलेली होती. आता हे पुल पडले आहे. खुल्या मंडपात समोर नंदी आणि विशाल हत्ती आणि स्तंभ आहेत. हे काम भारतीय स्थापत्य शास्त्र कौशल्यांचा एक अद्भुत नमुना आहे.[][]

इतिहास

[संपादन]

पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात निर्माण झालेल्या या लेणीतील प्रसिद्ध अशा कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण (प्रथम)यांच्या काळात झालेली आहे.[] या लेण्यापैकी १० क्रमांकाच्या गुहेतील मागच्या भिंतीवर राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग याचा शिलालेख आहे.[] इसवी सनाच्या ७५३ ते ७५७ या काळातील हा लेख आहे.[] कैलास लेणे निर्माण करणारा राजा कृष्ण (पहिला) हा दंतीदुर्ग राजाचा काका होता. कैलास लेण्याची निर्मिती ही इसवी सनाच्या ७५७ ते ७८३ या काळातील असावी असे यावरून समजते.[]

हा लेणीसमूह व्यापारी मार्गावर असल्याने तत्कालीन समाजाच्या दृष्टिपथात राहिला. राजघराण्यातील व्यक्ती तसेच उत्साही अभ्यासू प्रवासी यांनी या लेण्यांना दिलेल्या भेटीची नोंद सापडते. दहाव्या शतकात अरब प्रवासी अल-मस-उदी याने येथे भेट दिली आहे. बहामनी सुलतान गंगू याने येथे आपला तळ ठोकला आणि ही लेणी पाहिली असाही संदर्भ आढळतो. फिरिस्टा, मालेट यांसारख्या परदेशी प्रवासी अभ्यासकांनी येथे भेट दिल्याचे दिसते. ही लेणी काही काळ हैदराबादच्या निजामाच्या नियंत्रणात होती.[]

१९व्या शतकात भारतात ब्रिटिश राजवट असताना वेरुळ दुर्लक्षित होते. आक्रमकांमुळे किंवा काळाच्या ओघात मूर्तींचेही नुकसान झाले होते. ब्रिटिशांनी दुरुस्तीचे थोडेफार प्रयत्न केले. तथापि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९६० च्या दशकात या लेण्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. या काळात अजिंठा-वेरूळच्या लेण्यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटनस्थळे म्हणून प्रसार सुरू झाला.

रचना

[संपादन]

भव्य द्वार मंडप, दोन अति उंच स्तंभ, पूर्ण आकाराचा दगडात कोरलेला भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला हे सारे विलक्षण आहे. पुराणातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात चितारलेले आहेत. दहाव्या क्रमांकाची विश्वकर्मा लेणी दुमजली आहेत. त्यांत खिडक्या आहेत. या ठिकाणी चैत्य विहार आणि स्तूप असून स्तूपात बैठी बुद्धमूर्ती आहे.[] या वास्तूत जे स्तंभ कोरलेले आहेत त्यावर नृत्य व संगीतात मग्न असलेल्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. क्र. ११ची गुंफा म्हणजे तिमजली मठ आहे. क्र. २१ची गुंफा रामेश्वर गुंफा या नावाने प्रसिद्ध आहे. घारापुरी येथील एलिफंटा लेण्यातील शिल्पकलेशी साधर्म्य असलेली क्र. २९ची लेणी शिव शिल्पांनी व्यापलेली आहे. क्र. ३२ची गुंफा जैन धर्मीयांचा प्रभाव असलेली आहे. या लेण्याच्या छतावर सुंदर कमळाकृती कोरलेली आहे. सिंहारूढ यक्षीचे शिल्पही या गुंफेत आहे. ही गुंफाही दुमजली आहे.[]

बौद्ध लेणी समूह

[संपादन]

या लेणी समूहात विहार, प्रार्थनागृहे, बौद्ध भिक्खूंची निवासस्थाने, स्वयंपाकघर, अशी रचना दिसते. गौतम बुद्धाची शिल्पे, बोधिसत्वांच्या मूर्ती, यांची शिल्प येथे प्रामुख्याने पहायला मिळतात.[] प्रार्थनागृह असलेले १० क्रमांकाचे विश्वकर्मा लेणे हे या लेण्यात वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. अप्सरा आणि ध्यानस्थ बुद्ध भिक्खू यांच्या शिल्पांचे अंकन या लेण्यात पहायला मिळते.[१०]

लेणी क्र.१

[संपादन]

हे बुद्धकालीन खोरीव लेणे असून यात ८ खाने आहेत. यामध्ये भिक्खू राहत असत.

हे लेणी कलात्मक असून यात बुद्धतारा बोधिसत्त्वाच्या आकृत्या रेखाटलेल्या आहेत...

लेणी क्र.३

[संपादन]

हे लेणी क्र.२ प्रमाणे आहे.

लेणे क्र.४

[संपादन]

हे लेणे दोनमजली असून यात बुद्ध व बौद्ध विभुतींच्या आकृत्या आहेत.

लेणे क्र.५

[संपादन]

हे लेणे महायानथेरवाद लेणे आहे. याचे क्षेत्रफळ २७ मी. × २८ मी. असून यात बौद्ध भिक्खू शिक्षण कक्ष व भोजन कक्ष म्हणून उपयोग करत होते. यामध्ये बुद्धांची धम्मचक्र मुद्रेतील एक मुर्ती आहे व अवलोकीतेश्वर धोरा धरून झोका देत असल्याचे दिसते.

लेणे क्र.६

[संपादन]

हे लेणे विहार आहे. येथे तारा बोधिसत्व, अवलोकीतेश्वर, मंजुर व धन या विभूतींच्या आकृत्या आहेत. तसेच यात हिंदू देवी सरस्वती सुद्धा आहे.

लेणी क्र.७

[संपादन]

हे लेणी अपूर्णावस्थेत आहे.

लेणे क्र.८

[संपादन]

हे लेणे सुद्धा अपूर्णावस्थेत आहे.

लेणे क्र.९

[संपादन]

या लेण्याचा दर्शनी भाग सजवलेला असून चैत्याच्या रांगेने व खिडक्या बाणांच्या आकृत्यांनी जोडलेल्या आहेत. समोर तारा बोधिसत्वाची आकृती असून तिच्यासोबत भय प्रकट करणारे ६ साप, तलवार, हत्ती व अग्नि आहे.

लेणे क्र.१०

[संपादन]
लेणे क्र. १० स्तूपातील बुद्धमूर्ती

हे लेणे चैत्य आहे. येथे पूजास्थळ होते. छतात लाकडी सर्प आहेत. यात बुद्धांची भव्य मुर्ती बसलेल्या अवस्थेत आहे.

लेणे क्र.११

[संपादन]

हे लेणे दोन मजले आहे. यात बौद्ध विभूतींसह हिंदू देवतांच्या मुर्ती सुद्धा आहे.

लेणे क्र.१२

[संपादन]

हे लेणे तीन मजल्यांचे आहे. यामध्ये ध्यानस्त मुद्रेतील बुद्ध मुर्ती आहे.

हिंदू लेणी समूह

[संपादन]

या लेणींमधील कैलास लेणे हे स्थापत्य आणि शिल्पकलेचा मेळ असून प्राचीन शिल्पकलेचा तो कळसाप्रमाणे होय. ‘आधी कळस, मग पाया’ ही संतोक्ती या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरली आहे. हे लेणे एका सलग पाषाणखंडात कोरलेलं अतिशय भव्य आणि विस्तारित मोठे लेणे आहे आणि ते डोंगराच्या पठारावरून खाली कोरलेले आहे. कैलासावर शिव-पार्वती बसलेले असून रावण खालच्या बाजूने कैलास पर्वत उचलून हलवितो आहे अशा शिल्पाच्या येथील अंकनामुले या लेण्याला "कैलास" लेणे असे म्हणले जाते. पुरातत्त्वाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक कै.म.के. ढवळीकर यांनी या लेण्याबद्दल नोंदविले आहे की या मंदिराचा महत्त्वाचा भाग कृष्ण (पहिला) या राजा[११]च्या काळात पूर्ण झाला असावा.आणि गोत्झ या अभ्यासकाने नोंदविल्याप्रमाणे मंदिराचा उर्वरित भाग नंतरच्या काळात पूर्ण झाला असण्याची शक्यता आहे.

  • स्थापत्यशैली-

दक्षिणेत प्रचलित असलेल्या तत्कालीन मंदिर स्थापत्य शैलीपेक्षा या मंदिराची प्रक्रिया निराळी आहे.पटडक्क्ल (कर्नाटक) येथील विरूपाक्ष मंदिर आणि कांची येथील कैलास मंदिराच्या स्थापय शैलीचा प्रभाव या मंदिरावर जाणवतो.पण असे असले तरी स्थापत्यात तंतोतंत सारखेपणा दिसून येत नाही.[१२]

जैन लेणी समूह

[संपादन]

जैन धर्मीयांची क्र. ३० ते ३४ अशी एकूण पाच गुहा-मंदिरे येथे आहेत. त्यात इंद्रसभा, छोटा कैलास आणि जगन्नाथ सभा पाहावयास मिळतात. तत्कालीन बौद्ध-हिंदू लेणी शिल्पकलेचा या जैन लेण्यांवर प्रभाव जाणवतो. ही लेणी एक मजली असून ती आतून एकमेकांना जोडली आहेत. विशाल आकाराचा हत्ती आणि कलापूर्ण स्तंभासह सूक्ष्म कलाकुसर, आकर्षक तोरणे अशी शिल्पकला येथे पहायला मिळते. २३ वे जैन तीर्थंकर पार्श्वनाथ यांची विशाल मूर्ती हे येथील वैशिष्ट्य आहे. याशिवाय इंद्र, गोमटेश्वर बाहुबली भगवानयांची शिल्पेही येथे पाहावयास मिळतात.

हे सुद्धा पहा

[संपादन]

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "स्थापत्यकलेतील आश्चर्य". Loksatta. 2017-10-20. 2018-03-31 रोजी पाहिले.
  2. ^ Centre, UNESCO World Heritage. "Ellora Caves". whc.unesco.org (इंग्रजी भाषेत). 2018-03-31 रोजी पाहिले.
  3. ^ "एलोरा की गुफ़ाएं - भारतकोश, ज्ञान का हिंदी महासागर". bharatdiscovery.org (हिंदी भाषेत). 2018-03-31 रोजी पाहिले.
  4. ^ Deepak Kannal, p. 101. Lisa Owen 2012, p. 135. भाषा=इंग्लिश
  5. ^ H. Goetz, p. 89.भाषा=इंग्लिश
  6. ^ a b "Ellora Caves, Maharashtra - Archaeological Survey of India". asi.nic.in. 2018-03-31 रोजी पाहिले.
  7. ^ https://en.wikipedia.org/wiki/Ellora_Caves#cite_ref-FOOTNOTEGeri_Hockfield_Malandra199353-60,_64-65_34-0
  8. ^ https://en.wikipedia.org/wiki/Ellora_Caves#CITEREFDhavalikar2003
  9. ^ Gopal, Madan (1990). K.S. Gautam, ed. India through the ages. Publication Division, Ministry of Information and Broadcasting, Government of India. p. 178. Pandit 2013.
  10. ^ Christopher Tadgell (2015). The East: Buddhists, Hindus and the Sons of Heaven. Routledge. pp. 78–82. ISBN 978-1-136-75384-8.
  11. ^ M. K. Dhavalikar 1982, p. 33. भाषा =इंग्लिश
  12. ^ Deepak Kannal, p. 102.भाषा=इंग्लिश

बाह्य दुवे

[संपादन]